मराठी बातम्या /बातम्या /मनी /30 जूनपूर्वी अवश्य करुन घ्या ही कामं, बँकाही वारंवार पाठवताय मॅसेज; होईल तुमचाच फायदा

30 जूनपूर्वी अवश्य करुन घ्या ही कामं, बँकाही वारंवार पाठवताय मॅसेज; होईल तुमचाच फायदा

एसबीआय बँक

एसबीआय बँक

अवघ्या तीन चार दिवसांमध्ये मे महिना संपणार आहे. यानंतर नवा महिना सुरु होईल. हा महिना संपण्यापूर्वी बँकेतील काही कामं पूर्ण करणं गरजेचं आहे. अन्यथाला तुम्हाला नुकसान होऊ शकतं.

मुंबई, 27 मे : तुमचं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये लॉकर असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण बँक अ‍ॅडव्हायझरीद्वारे इंटरनेटवर लॉकरधारकांना 30 जून 2023 पर्यंत रिवाइज्ड लॉकर अ‍ॅग्रीमेंटवर स्वाक्षरी करण्याचे आवाहन करतेय. गेल्या काही दिवसांपासून बँक आपल्या ग्राहकांना अपडेटेड लॉकर अ‍ॅग्रीमेंटवर स्वाक्षरी करण्यासाठी मॅसेज पाठवतेय.

एसबीआयने मॅसेजमध्ये काय म्हटलंय?

एसबीआय आपल्या ग्राहकांना मॅसेज पाठवत आहे. यामध्ये त्यांनी लिहिलंय की, 'डियर कस्टमर, रिवाइज्ड लॉकर अ‍ॅग्रीमेंटच्या सेटलमेंटसाठी कृपया आपल्या ब्रांचमध्ये जा. तुम्ही आधीच अपडेटेड अ‍ॅग्रीमेंटवर साइन केलं असेल तर तुम्हाला अजनही सप्लीमेंट्री अ‍ॅग्रीमेंटची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.' यासोबतच बँक ऑफ बडोदा देखील आपल्या ग्राहकांकडून निर्धारित तारीखेपर्यंत रिवाइज्ड लॉकर अ‍ॅग्रीमेंटवर सही करण्याच्या सूचना देत आहे.

RBI जारी केलं होतं सर्कुलर

ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने 23 जानेवारी 2023 रोजी एक सर्कुलर जारी केलं होतं. या सर्कुलरनुसार, बँकांना 30 एप्रिल 2023 पर्यंत लॉकर करारांचे नूतनीकरण करण्याबद्दल ग्राहकांना सूचित करावे लागेल. यासोबतच 50 टक्के ग्राहक करार 30 जूनपर्यंत आणि 75 टक्के 30 सप्टेंबरपर्यंत सुधारित केले जातील याची खात्री करावी लागेल. त्यामुळे, ही तारीख जवळ आल्यास, बँका ग्राहकांना त्यांच्या कराराला रिन्यू करण्यास सांगू शकतात.

सुधारित लॉकर नियमांनुसार, बँकांना आग, चोरी, घरफोडी, दरोडा, इमारत कोसळणे, बँकेचे निष्काळजीपणा किंवा तिच्या कर्मचार्‍यांकडून फसवणूक यांसारख्या घटनांच्या बाबतीत आणि वार्षिक भाड्याच्या 100 पट नुकसान भरपाई द्यावी लागेल.

RBI कडे पोहोचल्यावर 2,000 च्या नोटांचं काय होणार? जाळणार की फाडणार?

ग्राहकाने लॉकर सरेंडर केले आणि भाडे आगाऊ भरले तर बँकेला त्या प्रमाणात रक्कम परत करावी लागेल. परंतु भाडे नियमितपणे भरले जात असले आणि लॉकर 7 वर्षे निष्क्रिय राहिले तरीही हाच नियम लागू होतो. इतर मार्गदर्शक तत्त्वांमध्ये हे देखील समाविष्ट आहे की करार स्टॅम्प पेपरवर असावा, ज्याची बँकांनी ग्राहकांना कराराची प्रत नि: शुक्ल दिली पाहिजे.

Income Tax डिपार्टमेंटने जारी केले फॉर्म, जाणून तुम्हाला कशाची गरज पडेल?

लॉकर्सच्या वाटपा वेळी, RBI ने बँकांना 3 वर्षांचे भाडे भरण्यासाठी मुदत ठेवी (FDs) घेण्याची परवानगी दिली आहे. यामध्ये आवश्यक असल्यास लॉकर तोडण्याचे शुल्क देखील समाविष्ट असेल. बँकांना लॉकर ऑपरेशन क्रियाकलापांबद्दल माहिती देण्यासाठी बँकेकडे तुमचा ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर रजिस्टर्ड करणे आवश्यक आहे.

First published:
top videos

    Tags: Bank details, Money, Money18, SBI