जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Bank Holidays: सप्टेंबरमध्ये 12 दिवस बंद राहणार बँका, खोळंबा टाळण्यासाठी इथे तपासा सुट्ट्यांची यादी

Bank Holidays: सप्टेंबरमध्ये 12 दिवस बंद राहणार बँका, खोळंबा टाळण्यासाठी इथे तपासा सुट्ट्यांची यादी

Bank Holidays in September 2021

Bank Holidays in September 2021

Bank Holidays in September 2021: बँकिंग संबंधित कामांसाठी तुम्हाला पुढील महिन्यात जर बँकेत जाण्याची आवश्यकता असेल, तर त्याआधी कोणत्या दिवशी सुट्ट्या आहेत हे जाणून घ्या

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 28 ऑगस्ट: बँकिंग संबंधित कामांसाठी तुम्हाला पुढील महिन्यात जर बँकेत जाण्याची आवश्यकता असेल, तर लवकरात लवकर ते पूर्ण करून घ्या. कारण पुढील महिन्यात एकूण 12 सुट्ट्या असणार आहेत. नेमके तुम्ही जर सुट्टीच्या दिवशी बँकेत गेलात तर तुमच्या कामाचा खोळंबा होऊ शकतो. त्यामुळे त्याआधी कोणत्या दिवशी बँकांना सुट्ट्या आहेत हे जाणून घ्या. या बँक हॉलिडेमुळे (Bank Holiday) तुमच्या बँकिंगविषयीच्या कामात अडथळा येऊ शकतो. अर्थात प्रत्येक राज्यानुसार बँकांच्या सुट्ट्या वेगवेगळ्या असू शकतात. बँक हॉलिडे प्रत्येक राज्यामध्ये (upcoming bank holidays list) वेगवेगळे असतात. कारण काही सण-समारंभ असे असतात की जे ठराविक राज्यातच साजरे केले जातात. ज्या राज्यात सुट्ट्या निश्चित करण्यात आल्या आहेत त्याठिकाणी बँकांचे कामकाज बंद राहील. त्यामुळे त्यानुसार योजना आखूनच तुम्ही बँकेमध्ये जा. इथे तपासा सुट्ट्यांची यादी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून बँक सुट्ट्यांची यादी (Bank Holiday List) जारी केली जाते. https://rbi.org.in/Scripts/HolidayMatrixDisplay.aspx या वेबसाइटला भेट देऊन तुम्ही सुट्ट्यांची यादी तपासू शकता. प्रत्येत महिन्याची यादी याठिकाणी पाहता येईल. आरबीआयच्या वेबसाइटवर सप्टेंबर महिन्यातील सुट्ट्यांची (Bank Holidays List September 2021) यादी तुम्हाला तपासता येईल. सप्टेंबर महिन्यात एकूण 12 दिवस बँका बंद असणार आहेत. यामध्ये साप्ताहिक सुट्ट्या देखील आहेत. हे वाचा- जालन्याच्या डॉक्टरची कमाल! सोलर कुकीज करत महिलांना दिला रोजगार, लाखोंची उलाढाल शक्य असेल तिथे ऑनलाइन व्यवहार करा कोरोना काळात (Coronavirus Pandemic) विविध बँकांची कामं सध्या ऑनलाइन सुरू आहे. ग्राहकांनी देखील ऑनलाइन प्रणालीचा वापर त्यांच्या दैनंदिन बँकिंग कामासाठी करण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाचा धोका लक्षात घेता तुम्ही देखील शक्य असेल तिथे ऑनलाइन व्यवहार करा. दरम्यान असं असून देखील तुम्हाला काही आवश्यक कामासाठी बँकेत जाण्याची आवश्यकता असेल तर बँकाच्या सुट्ट्या तपासूनच बँकेला भेट द्या. अन्यथा तुमच्या कामाचा खोळंबा होऊ शकतो. हे वाचा- बचत खात्यातील रकमेवर दर महिना व्याज हवंय?, मग ही खास बातमी तुमच्यासाठी सप्टेंबर महिन्यातील सुट्ट्यांची यादी सप्टेंबर – रविवार असल्याने साप्ताहिक सुट्टी 8 सप्टेंबर – श्रीमंत शंकरदेवा तिथी (गुवाहाटी) 9 सप्टेंबर – तीज हरितालिका (गंगटोक) 10 सप्टेंबर – गणेश चतुर्थी/संवत्सरी (चतुर्थी पक्ष)/विनायक चतुर्थी/वरसिद्धि विनायक व्रत (अहमदाबाद, बेलापूर, बंगळुरू, भुवनेश्वर, चेन्नई, हैदराबाद, मुंबई, नागपूर, पणजी) 11 सप्टेंबर – महिन्यातील दुसरा शनिवार/गणेश चतुर्थीचा दुसरा दिवस (पणजी) 12 सप्टेंबर – रविवार असल्याने साप्ताहिक सुट्टी 17 सप्टेंबर – कर्मा पूजा (रांची) 19 सप्टेंबर – रविवार असल्याने साप्ताहिक सुट्टी 20 सप्टेंबर – इंद्रजात्रा (गंगटोक) 21 सप्टेंबर – श्री नारायण गुरू समाधी दिवस (कोची, तिरुवंतपुरम) 25 सप्टेंबर – महिन्यातील चौथा शनिवार 26 सप्टेंबर - रविवार असल्याने साप्ताहिक सुट्टी

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात