मराठी बातम्या /बातम्या /मनी /

'ही' बॅंक तुम्हाला देतेय बचत खात्यातील रकमेवर दर महिन्याला व्याज, त्यासोबतच भरघोस सुविधा; सविस्तर जाऊन घ्या Process

'ही' बॅंक तुम्हाला देतेय बचत खात्यातील रकमेवर दर महिन्याला व्याज, त्यासोबतच भरघोस सुविधा; सविस्तर जाऊन घ्या Process

What is Salary Overdraft?

What is Salary Overdraft?

जर तुम्हाला बचत खात्यातील रकमेवर दर महिन्याला व्याज (Interest) हवे असेल तर ही तुमच्यासाठी संधी ठरु शकते.

नवी दिल्ली, 26 ऑगस्ट: जर तुम्हाला बचत खात्यातील रकमेवर दर महिन्याला व्याज (Interest) हवे असेल तर ही तुमच्यासाठी संधी ठरु शकते. या बचत खात्यातील रकमेवर तुम्हाला व्याज तर मिळेलच, परंतु, अनेक सुविधा नि:शुल्क (Free Services) मिळतील. खासगी क्षेत्रातील अग्रणी बँक आयडीएफसी फर्स्ट बॅंक (IDFC First Bank) तुम्हाला या सर्व सुविधा देत आहे. अशा प्रकारच्या सुविधा देणारी आयडीएफसी फर्स्ट बॅंक ही बॅंकिंग क्षेत्रातील (Banking Sector) पहिली बॅंक ठरली आहे. ही बॅंक तुम्हाला बचत खात्यातील रकमेवर दर महिन्याला व्याज देईल. इतकेच नाही तर व्याजावर व्याजदेखील देईल. आयडीएफसी फर्स्ट बॅंकेने हा नवा नियम 1 जुलैपासून लागू केला आहे. अनेक बॅंका ग्राहकांना बचत खात्यातील (Savings Account) रकमेवर दर तीन महिन्यांनी व्याज देतात. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) नियमानुसार या बॅंकेला दर महिन्याला व्याज देण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. या सुविधेसाठी रिझर्व्ह बॅंकेकडून कोणताही आक्षेप घेण्यात आलेला नाही. तुम्ही देखील सुरु करु शकता अकाउंट आयडीएफसी फर्स्ट बॅंकेत तुम्ही घरबसल्या ऑनलाइन (Online) पध्दतीने अकाउंट सुरू करु शकता. बॅंकेकडून अकाउंट सुरु करण्यासाठी सर्व प्रक्रिया ऑनलाइनच पुर्ण करण्यात येते. आयडीएफसी फर्स्ट बॅंकेने बचत खात्यावर 6 लाख रुपयांची खरेदी मर्यादा ठेवली आहे. तसेच एटीएमच्या माध्यमातून दररोज 2 लाखांपर्यंत रक्कम काढण्याची सुविधा देखील दिली आहे.

तुमचंही 'या' बँकेत खातं आहे का? अशाप्रकारे मिळेल 2 लाख आणि 4 लाखांचा फायदा

बॅंक देत आहे 5 टक्के व्याज आयडीएफसी फर्स्ट बॅंक आपल्या खातेदारांना एक वर्षात कमाल 5 टक्के व्याजदर देते. व्याजाचा दर हा अकाउंटमध्ये जमा असलेल्या रकमेच्या आधारे ठरवला जातो. अनेक बॅंका बचत खात्यातील रकमेवर 3 टक्के व्याज देतात. मात्र आयडीएफसी फर्स्ट बँक 1 लाखांपर्यंत रक्कम जमा केल्यास 4 टक्के व्याज देत आहे. 1 ते 10 लाखांपर्यंत रक्कम जमा केल्यास 4.5 टक्के तर 10 लाख किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम जमा केल्यास 5 टक्के व्याज देत आहे. एटीएम सुविधा नि:शुल्क आयडीएफसी फर्स्ट बॅंकेच्या वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, जर बॅंकेचा कोणीही ग्राहक एटीएमच्या (ATM) क्रेडिट कार्डद्वारे (Credit Card) पैसे काढत असेल, तर त्यास 48 दिवसांसाठी ही सुविधा नि:शुल्क दिली जाईल. याचाच अर्थ क्रेडिट कार्डाच्या पेमेंटच्या तारखेपर्यंत या सुविधेसाठी शुल्क आकारणी केली जाणार नाही. क्रेडिट कार्ड वापरल्यास दरमहिना 0.75 ते 2.99 टक्क्यांपर्यंत व्याज घेण्यात येणार असल्याचे बॅंकेने स्पष्ट केले आहे.

Gold-Silver Price Today: आजही महागलं सोनंचांदी, खरेदीपूर्वी इथे वाचा प्रति तोळा सोन्याचा भाव

1 कोटींचा विमा (Insurance) फ्री आयडीएफसी फर्स्ट बॅंक आपल्या खातेदारांना 1 कोटी रुपयांचा विमा नि:शुल्क उपलब्ध करुन देत आहे. जर खातेदाराचा मृत्यू विमान अपघातात झाला तर त्याच्या वारसदाराला ही 1 कोटी रुपयांची रक्कम दिली जाईल, असे बॅंकेने सांगितले आहे.
First published:

Tags: Rate of interest, Saving bank account

पुढील बातम्या