मुंबई, 24 फेब्रुवारी : मार्च (March) हा आर्थिक वर्षातला शेवटचा महिना असतो. या महिन्यात बँकांची कामं जास्त वाढतात. मात्र यावर्षी मार्च महिन्यात 11 दिवस बँका बंद (Bank Holidays) राहणार आहेत. त्यामुळे बँकेची कामं करण्यासाठी आजच योग्य वेळापत्रक तयार करणे आवश्यक आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या निर्देशानुसार (RBI) महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद असतात. त्याचबरोबर मार्च महिन्यात काही अतिरिक्त सुट्ट्या आणि स्थानिक सण देखील आहेत. त्यामुळे त्या दिवशी देखील बँक बंद असतील. मार्च महिन्यात रविवार सोडून कोणत्या प्रमुख दिवशी बँका बंद असतील पाहूया 11 मार्च – 11 मार्चला महाशिवरात्री (Mahashivratri) आहे. त्यामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये बँकांचं कामकाज बंद असेल. 13 मार्च – महिन्याचा दुसरा शनिवार असल्यानं बँकेला सुट्टी असेल 15 मार्च – 15 मार्चला सोमवारी काही बँक युनियननं संपाची घोषणा केली आहे. 27 मार्च – महिन्यातील चौथा शनिवार असल्यानं त्या दिवशी बँकांना सुट्टी असेल 29 आणि 30 मार्च – होळीमुळे या दोन दिवशी बँका बंद असतील. या शिवाय महिन्यातील चार रविवारी बँका बंद असतील. 5 मार्च रोजी Chapchar Cut असल्यानं त्या दिवशी मिझोराममधील बँका बंद असतील. तर 22 मार्च रोजी बिहार दिवस आहे. त्यामुळे बिहार राज्यात सलग दोन दिवस बँकांना सुट्टी आहे. 27 मार्चला महिन्याचा दुसरा शनिवार, 28 मार्च रोजी रविवार आणि त्यानंतर सलग दोन दिवस होळीची सुट्टी या सर्व कारणांमुळे काही राज्यांमध्ये सलग चार दिवस बँका बंद असतील. ( वाचा : Explainer : पैसे चुकीच्या बँक खात्यात पाठवले गेले तर काय कराल? जाणून घ्या नेमकी प्रक्रिया सोप्या शब्दात ) ग्राहकांवर काय होणार परिणाम**?** बँका बंद असल्याच्या दिवशी ग्राहकांना फक्त ऑनलाईन सेवेचा लाभ घेता येणार आहे. ग्राहकांचे डीडी आणि चेक क्लीअर होणार नाही. त्यामुळे पैशांसाठी ATM सेवा मोठ्या प्रमाणात वापरली जाऊ शकते. या सेवेवरील ताण यामुळे वाढू शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.