मराठी बातम्या /बातम्या /मनी /बँका बुडण्याचं प्रमाण वाढतंय तुमच्या कष्टाचे पैसे बँकेत किती सुरक्षित?

बँका बुडण्याचं प्रमाण वाढतंय तुमच्या कष्टाचे पैसे बँकेत किती सुरक्षित?

bank 2

bank 2

फेडरल डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पोरेशन (FDIC) नुसार, 2001 पासून 563 यूएस बँक अपयशी ठरल्या आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई : आतापर्यंत सहकारी बँकांच बुडत होत्या असं वाटायचं पण परिस्थिती अधिक भयंकर आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर दोन बँका दिवाळखोरीत निघाल्या आहेत. त्या बुडल्या आहेत. त्यामुळे त्या बँकांमध्ये ज्यांचे खाते आहेत अशा लोकांच्या घामाचे पैसे बुडाले आहेत. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही ज्या बँकेत पैसे ठेवले आहेत ते किती सुरक्षित आहेत याबाबत आज जाणून घेऊया.

अमेरिकेत गेल्या काही आठवड्यात 3 मोठ्या बँका बुडाल्या आहेत. SVB Financial Group आणि Silvergate Capital Corp नंतर आता सिग्नेचर बँक देखील न्यूयॉर्क स्टेट फायनान्शियल रेग्युलेटर्सनी बंद केली आहे. फेडरल डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पोरेशन (FDIC) नुसार, 2001 पासून 563 यूएस बँक अपयशी ठरल्या आहेत.

बँक लुटायला गेला अन् चोरले 82 रूपये; मग स्वतःच पोलिसांना फोन करून अटकेसाठी केली विनंती, कारण...

अचानक बुडलेल्या बँकांनी 2008 च्या आर्थिक संकटाची आठवण करून दिली आहे. बँकिंग व्यवस्थेबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे. एखादी बँक जरी बुडली तरी त्याचा ग्राहकांवर काय परिणाम होणार आणि त्यांना काय मिळणार? तुम्हाला माहिती आहे का की बँक बुडाली तरी तुमचे पैसे एका मर्यादेपर्यंत सुरक्षित राहतात. कोणत्या देशात बँक ठेवींवर किती सुरक्षा उपलब्ध आहे ते जाणून घ्या.

भारतातील नियम काय सांगतो?

भारतातील बँकांवर जर अशी परिस्थिती आली तर टेन्शन घेऊ नका. एका ठराविक मर्यादेपर्यंत तुमचे पैसे सुरक्षित राहतात. मात्र त्यावरील पैसे तुम्हाला मिळतीलच याची खात्री सरकारही देत नाही. डिपॉझिट इन्शुरन्स आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन म्हणजेच डीआयसीजीसी (डिपॉझिट इन्शुरन्स आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन) द्वारे प्रदान केलेले विमा संरक्षण.

गुढीपाडव्याला बायकोला सोनं घेताय सावधान! तुमचीही होऊ शकते फसवणूक

आता DICGC अंतर्गत विमा संरक्षण 1 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये करण्यात आले आहे. ज्या बँक खात्यात तुमचे पैसे जमा झाले आहेत ते जर बुडले तर तुम्हाला 5 लाख रुपयांपर्यंत पैसे परत मिळू शकतात, जरी खात्यात जमा केलेली रक्कम 5 लाख रुपयांपेक्षा जास्त असली तरीही.

त्यामुळे तुम्ही याचा विचार करूनच बँकेत पैसे ठेवणं आवश्यक आहे. शक्य असेल तर 5 लाखांपेक्षा जास्त रकमेचे पैसे हे दुसऱ्या बँकेत ठेवा. ज्यामुळे तुम्हाला दोन्ही बँकांमध्ये 5 लाखांपर्यंतचं इन्शुरन्स कव्हर मिळू शकतं आणि तुमचे पैसेही सुरक्षित राहातील.

First published:

Tags: Bank services, Bank statement, Money, Rbi