मराठी बातम्या /बातम्या /मनी /Bank Alert : या मेसेजकडे दुर्लक्ष करणं पडेल महागात, आर्थिक नुकसानासोबतच होईल मोठा तोटा

Bank Alert : या मेसेजकडे दुर्लक्ष करणं पडेल महागात, आर्थिक नुकसानासोबतच होईल मोठा तोटा

बँक सध्या आपल्या ग्राहकांना अलर्ट मेसेज (Bank Alert SMS) पाठवत आहे. जेणेकरुन 30 जूनआधी ग्राहकांनी आपलं पॅनकार्ड आधारसोबत लिंक करून घ्यावं.

बँक सध्या आपल्या ग्राहकांना अलर्ट मेसेज (Bank Alert SMS) पाठवत आहे. जेणेकरुन 30 जूनआधी ग्राहकांनी आपलं पॅनकार्ड आधारसोबत लिंक करून घ्यावं.

बँक सध्या आपल्या ग्राहकांना अलर्ट मेसेज (Bank Alert SMS) पाठवत आहे. जेणेकरुन 30 जूनआधी ग्राहकांनी आपलं पॅनकार्ड आधारसोबत लिंक करून घ्यावं.

नवी दिल्ली 06 जून : तुम्ही तुमचं पॅनकार्ड (PAN Card) आधारकार्डसोबत (AADHAAR Card) लिंक केलं आहे का? जर नसेल तर लगेचच पॅनकार्ड आधारसोबत लिंक करून घ्या, कारण यावेळी तारीख वाढवून मिळणार नाही आणि तुम्हाला आर्थिक नुकसानाला सामोरे जावं लागेल. याच पार्श्वभूमीवर बँक सध्या आपल्या ग्राहकांना अलर्ट मेसेज (Bank Alert SMS) पाठवत आहे. जेणेकरुन 30 जूनआधी ग्राहकांनी आपलं पॅनकार्ड आधारसोबत लिंक करून घ्यावं. इनकम टॅक्स डिपार्टमेंटनं (Income Tax Department) पॅनकार्ड आधारसोबत लिंक करण्यासाठीची अंतिम तारीख 30 जून 2021 ठरवली आहे. 30 जूनपर्यंत आपण हे काम न केल्यास तुमचं पॅनकार्ड निष्क्रीय होईल. याशिवाय आयकर नियमानुसार तुम्हाला 1000 रुपये दंडही भरावा लागेल.

SBI च्या 44 कोटी खातेधारकांना अलर्ट

देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेनं (SBI) आपल्या ग्राहकांना एक नोटीस पाठवली आहे. बँकेच्या खातेधारकांना या महिन्याच्या अखेरपर्यंत म्हणजेच 30 जूनपर्यंत आपलं पॅनकार्ड आधारसोबत लिंक करण्यास सांगण्यात आलं आहे.

घर खरेदीचा विचार करत असाल तर हे वाचा; सर्वात स्वस्त झालंय Home loan

पॅनकार्ड होणार निष्क्रीय -

State Bank Of India नं असाही इशारा दिला आहे, की या सुचनेचं पालन न केल्यास चालू सुविधा प्रभावित होतील. बँकेनं खातेधारकांना इशारा दिला आहे, की पॅनकार्ड आधारसोबत लिंक करण्यास त्यांनी उशीर केल्यास त्यांचं पॅनकार्ड निष्क्रीय केलं जाईल.

बँकेनं याबाबतची माहिती आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन दिली आहे. बँकेनं आपल्या ग्राहकांना विना अडथळा बँकींग सुविधा सुरू ठेवण्यासाठी पॅनकार्ड आधारसोबत लिंक करून घेण्याचा सल्ला दिला आहे. बँकेनं आपल्या नोटीससोबत एक ग्राफिक्सही शेअर केलं आहे. या माध्यमातून त्यांनी सांगितलं आहे, की पॅनकार्ड आधारसोबत जोडणं का गरजेचं आहे.

SBI शिवाय HDFC बँकेनंही आपल्या ग्राहकांना पॅनकार्ड आधारसोबत लिंक करण्यास सांगितलं आहे. पॅनकार्ड आधारसोबत SMS च्या माध्यमातून लिंक केलं जाऊ शकतं. यासाठी तुम्हाला तुमच्या फोनवर UIDPAN टाइप करावं लागेल. यानंतर 12 अंकी आधार नंबर लिहा आणि यानंतर 10 अंकांचा पॅन नंबर लिहा. आता स्टेप 1मध्ये सांगितलेला मेसेज 567678 किंवा 56161 वर पाठवा.

First published:

Tags: Bank, Money debt, Pan card