मुंबई, 3 डिसेंबर : डिसेंबर महिन्यातील अपेक्षेपेक्षा चांगल्या विक्रीच्या आकड्यांच्या आधारे, 3 जानेवारी रोजी, म्हणजे आजच्या ट्रे़डमध्ये ऑटो शेअर्समध्ये वाढ दिसून येत आहे. दुपारी 12 वाजेच्या सुमारास, निफ्टी ऑटो इंडेक्स (Nifty Auto Index) 1.5 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहे, तर सेन्सेक्स 583.6 अंक किंवा 1 टक्क्यांच्या वाढीसह 58,837.42 वर व्यवहार करत आहे. दुसरीकडे, निफ्टी 168.40 अंक किंवा 0.97 टक्क्यांच्या मजबूतीसह 17,522.45 च्या पातळीवर दिसत आहे.
आजच्या सुरुवातीच्या व्यवहारात, आयशर मोटर्स लिमिटेड (Eicher Motors) 4 टक्के, टाटा मोटर्स (Tata Motors) सुमारे 2.2 टक्के, अशोक लेलँड (Ashok Layland) 1.6 टक्के, हीरो मोटोकॉर्प (Hero Motocorp) 1.2 टक्के आणि बजाज ऑटो (Bajaj Auto), टीव्हीएस मोटर्स (TVS Motors), मारुती सुझुकी इंडिया (Maruti Suzuki) सुमारे 1 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत होते.
मोतीलाल ओसवाल यांनी ऑटो क्षेत्राबाबत म्हटले आहे की, सेमी-कंडक्टरच्या पुरवठ्यात सुधारणा झाल्यामुळे प्रवासी वाहन विभागाला पाठिंबा मिळाला आहे, परंतु वाढत्या खर्चामुळे दुचाकी विभाग अद्याप सावरलेला नाही. हे लक्षात घेऊन, वाढती मागणी आणि स्थिर स्पर्धात्मक वातावरण लक्षात घेऊन आम्ही दुचाकी वाहनांपेक्षा चारचाकी वाहनांना अधिक प्राधान्य देत आहोत. व्यावसायिक वाहन सायकलमध्ये ही गती कायम राहण्याची अपेक्षा आहे. उच्च वाढीची क्षमता असलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणुकीची शिफारस करतो, ज्यांना वाढत्या मागणीचा सर्वाधिक फायदा होईल आणि सर्वात मजबूत बॅलेन्सशीट आहे.
घरगुती सिलेंडरवर लिहिलेल्या नंबर्समध्ये दडलंय मोठं सिक्रेट, अर्थ समजून घ्या नक्कीच फायदा होईल
डिसेंबरमध्ये रॉयल एनफिल्डने 74,000 युनिट्सची विक्री केली आहे, जी मागील महिन्याच्या तुलनेत 43 टक्के अधिक आहे. कंपनीच्या विक्रीतील ही वाढ अशा परिस्थितीत दिसून आली जेव्हा कंपनीच्या नवीन लाँचमध्ये सेमीकंडक्टरच्या पुरवठ्यात अडचणी आल्याने त्याचा परिणाम झाला.
डिसेंबर महिन्यात, आयशर मोटर्सच्या 350cc मोटरसायकलची विक्री तिमाही आधारावर 44 टक्क्यांनी वाढली आणि 62.5 हजार युनिट्सवर पोहोचली. या काळात कंपनीच्या निर्यातीत 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
Credit Card चा वापर करताना सावधान! या गोष्टी लक्षात ठेवा अन्यथा होईल मोठं नुकसान
डिसेंबर महिन्यात, टाटा मोटर्स, Hyundai Motors India ला मागे टाकत भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी प्रवासी वाहन विक्रेता बनली आहे. जवळपास दशकभरात पहिल्यांदाच असे घडले आहे. इलेक्ट्रिक वाहन सेगमेंटमध्येही टाटा मोटर्सच्या विक्रीत वार्षिक आधारावर सुमारे 44 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
ऑटो अॅनालिस्ट्सना विश्वास आहे की टिगोर ईव्हीच्या (Tigor EV) नवीन लॉन्चमुळे कंपनीच्या ईव्ही विक्रीत आणखी वाढ होऊ शकते. याशिवाय, नुकत्याच लाँच झालेल्या SUV टाटा पंचमुळे (Tata Punch) कंपनीचा ICE (इंटर्नल कम्बशन इंजिन) मार्केट शेअर वाढेल.
मारुती सुझुकीने डिसेंबर महिन्यात मासिक आधारावर डिस्पॅचमध्ये 10 टक्के वाढ केली आहे. चिपचा तुटवडा असतानाही डिसेंबर महिन्यात कंपनीचे उत्पादन वाढले आहे. त्याचप्रमाणे डिसेंबरमध्ये Hero MotoCorp च्या विक्रीत 13 टक्क्यांनी वाढ झाली आहे तर TVS Motors च्या विक्रीत 8 टक्क्यांनी घट झाली आहे. डिसेंबर महिन्यात TVS मोटर्सच्या देशांतर्गत विक्रीत 17 टक्क्यांनी घट झाली तर निर्यात 8 टक्क्यांनी वाढली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.