Home /News /money /

घरगुती सिलेंडरवर लिहिलेल्या नंबर्समध्ये दडलंय मोठं सिक्रेट, अर्थ समजून घ्या नक्कीच फायदा होईल

घरगुती सिलेंडरवर लिहिलेल्या नंबर्समध्ये दडलंय मोठं सिक्रेट, अर्थ समजून घ्या नक्कीच फायदा होईल

गॅस सिलेंडरवर काही आकडे आणि इंग्रजी वर्णमालेतील अक्षरं दिसतात. हे लेटर्स आणि आकडे एक प्रकारचे सिक्युरिटी कोड (Security code) असतात. सुरक्षेच्या उद्देशानं ते सिलेंडरवर छापले जातात. या कोड्समध्ये काही 'सिक्रेट' लपलेले असतात.

नवी दिल्ली, 3 जानेवारी : प्रत्येकाच्या घरात स्वयंपाकासाठी (Cooking) एलपीजीचा (LPG) वापर केला जातो. एक प्रकारे स्वयंपाकाचा गॅस ही जीवनावश्यक वस्तूच झाली आहे. केंद्र सरकारनेसुद्धा देशातील प्रत्येक महिलेची चुलीच्या धुरापासून सुटका व्हावी, या हेतूनं 'पंतप्रधान उज्ज्वला योजना' (Pradhan Mantri Ujjwala Yojana) सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत देशातील गरीब महिलांना कमी किमतीत गॅस कनेक्शनच (Gas Connection) वाटप करण्यात आलं आहे. मात्र, एलपीजी गॅस जितका उपयुक्त आहे तितकाच घातकही आहे. एलपीजी सिलेंडरमधील (LPG Cylinder) छोटासा बिघाड देखील मोठ्या अपघातास कारणीभूत ठरू शकतो. आतापर्यंत एलपीजी सिलेंडरचे स्फोट (LPG Blast) होऊन हजारो अपघात झालेले आहेत. त्यामुळं गॅस वापरताना काळजीपूर्वक वापरावा, अशा सूचना वारंवार मिळत असतात. एलपीजी सिलेंडरवर तो कसा वापरावा याबाबत सूचना लिहिलेल्या असतात. या सूचनांसोबत इतरही काही आकडे प्रत्येक सिलेंडरवर असतात. ते आकडे नेमके कशाचे असतात याबाबत तुम्ही कधी विचार केला आहे का? सिलेंडरवरील सावधगिरीच्या सूचनांबरोबरच या आकड्यांनासुद्धा खूप महत्त्व आहे. आपल्या देशात एलपीजी सिलेंडरचे दोन प्रकार पडतात. एक घरगुती वापराचे सिलेंडर आणि दुसरा व्यावसायिक वापराचा सिलेंडर (Commercial cylinder). घरगुती वापराचे सिलेंडर लाल रंगाचे असतात, तर व्यावसायिक वापराचे निळ्या रंगाचे. तुम्ही जर कधी या गॅस सिलेंडरचं काळजीपूर्वक निरीक्षण केलं तर त्याच्या वरच्या भागात काही आकडे आणि इंग्रजी वर्णमालेतील अक्षरं दिसतात. A, B, C, D या चार इंग्रजी वर्णांचा उल्लेख सिलेंडरवर असतो. हे लेटर्स आणि आकडे एक प्रकारचे सिक्युरिटी कोड (Security code) असतात. सुरक्षेच्या उद्देशानं ते सिलेंडरवर छापले जातात. या कोड्समध्ये काही 'सिक्रेट' लपलेले असतात. या कोड्सवरून आपल्याला सिलेंडरची एक्सपायरी डेट समजू शकते. सर्वच सिलिंडरवर A, B, C, D नंतर काही अंक छापलेले असतात. इंग्रजी लेटर्स वर्षातील 12 महिने दर्शवण्यासाठी वापरले जातात. म्हणजेच एक लेटर तीन महिने दर्शवतं आणि त्यानंतरचे आकडे सिलेंडरच्या निर्मितीचं वर्ष दर्शवतात. म्हणजेच हा कोड तुमच्या घरात असलेल्या सिलेंडरची एक्सपायरी डेट (Cylinder Expiry Date) काय आहे हे सांगतो.

तुमचे PAN Card नकली तर नाही ना? वाचा कशाप्रकारे माहित करुन घ्याल

'ए'चा वापर जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांसाठी, 'बी'चा वापर एप्रिल, मे आणि जून महिन्यांसाठी, 'सी'चा वापर जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांसाठी, तर 'डी'चा वापर ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांसाठी केला जातो. या लेटर्सनंतर येणारा अंक वर्षाचा उल्लेख दर्शवतो. सोप्या शब्दात सांगायचं झाल्यास, जर एखाद्या एलपीजी सिलिंडरवर 'A.23' असं छापलेलं असेल तर याचा अर्थ असा होतो की 2023 वर्षातील पहिल्या तिमाहीमध्ये सिलेंडर एक्सपायर होणार आहे. जर सिलिंडरवर 'बी.25' असं लिहिलेलं असेल, तर तो सिलेंडर 2025 या वर्षातील एप्रिल, मे किंवा जून महिन्यात एक्सपायर होणार आहे.

कर्जदार व्यक्तीचा मृत्यू झाल्यास कर्ज कोण फेडणार? कर्जानुसार काय आहेत नियम?

सिलेंडर एक्सपायर झाल्यानंतर पूर्णपणे निरुपयोगी होत नाही. मात्र, त्याचं टेस्टिंग (Testing) गरजेचं होतं. सिलेंडरवरील कोडमुळे टेस्टिंग डेटदेखील आपल्याला समजू शकते. ज्याप्रमाणं खाद्यपदार्थ आणि इतर वस्तूंची एक्सपायरी डेट असते, त्याचप्रमाणे या एलपीजी सिलेंडरचीही एक्सपायरी डेट असते. या गोष्टीचा आपण कधी विचार करत नाही. एक सिलेंडर संपला की दुसरा जोडून देतो. या दुर्लक्षामुळंच कधी-कधी अपघात होतात. म्हणून एलपीजी सिलेंडरचा अतिशय काळजीपूर्वक वापर करावा.
First published:

Tags: Gas, LPG Price

पुढील बातम्या