सिडनी, 5 एप्रिल : भारतात फास्टॅग (Fastag) प्रणालीमुळे टोलनाक्यांवर आपोआप टोल टॅक्स (Toll Tax) कट होतो. गाडी फार वेळ थांबवून रोख पैसे देण्याची गरजही लागत नाही. मात्र ऑस्ट्रेलियातील एका ट्रक चालकाला (Australian Truck Driver) या टोल टॅक्समुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. टोलवसुली करणाऱ्या कंपनीच्या चुकीमुळे ट्रक चालकाच्या खात्यातून सुमारे 43 लाख रुपये कापण्यात आले. आपल्या खात्यातून एवढी मोठी रक्कम कापल्याबद्दल चालकाने कंपनीकडे तक्रार केली. यावेळी तेव्हा कंपनीने आपली चूक मान्य केली, परंतु त्याचे पैसे परत करण्यास नकार दिला. याबदल्यात त्याला 'क्रेडिट' देण्याची ऑफर दिली. मात्र चालकाने ही ऑफर नाकारल्याने त्याच्यावर इकडे तिकडे भटकण्याची वेळ आली आहे.
ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्स येथील ही घटना आहे. जेसन क्लिंटन असं या व्यक्तीचं नाव असून तो त्याचा ट्रक न्यू साउथ वेल्सच्या टोल रोडवरून घेऊन जात असे तेव्हा त्यांच्या खात्यातून 75 हजार रुपये ($1000) टोल टॅक्स म्हणून कापले जातात. सोमवारी, कंपनीने टोल रस्त्यावरून गेल्यावर त्याच्या खात्यातून तब्बल 43 लाख रुपये ($17,000) कापले.
खिशाला परवडणाऱ्या Health Insurance ची वाट पाहताय? मोदी सरकारची मोठी माहिती
जेसन क्लिंटन यांनी तक्रार केल्यावर टोल कंपनी त्यांना पैसे परत करू शकली नाही. त्याऐवजी, कंपनीने क्लिंटन यांना क्रेडिट नोट ऑफर केली. क्रेडिट नोट म्हणजे हे 43 लाख रुपयांचे कूपन असेल, जे जेसन फक्त त्या टोल रोडवर कर भरण्यासाठी वापरू शकेल. जर जेसन कधीच त्या टोल रस्त्यावरून गेला नाही, तर त्याच्या कुपनमध्ये ठेवलेले 43 लाख रुपये वाया जातील. मात्र क्रेडिट नोटचा मला काही उपयोग नाही. मला माझे पैसे परत हवेत अशी मागणी जेसन याने केली आहे.
45,000 लोकांकडून अधिक टोल वसूली
जेसन क्लिंटन एकटा नाही जो त्रासाला सामोरं गेला आहे. डेलीमेलच्या वृत्तानुसार, त्या टोल रस्त्यावरून जाणाऱ्या सुमारे 45,000 लोकांकडून सामान्य टोल शुल्काच्या दुप्पट शुल्क आकारण्यात आले आहे. मात्र, जेसनच्या बाबतीत ही रक्कम कित्येक पट अधिक आहे.
Axis बँक ग्राहकांना झटका! तुमचंही खातं असेल तर बदललेले नियम समजून घ्या नाहीतर भरावा लागेल दंड
वाहतूक मंत्र्यांनी कडक भूमिका
न्यू साउथ वेल्सचे वाहतूक मंत्री नताली वार्ड यांनी या प्रकरणावर कठोर भूमिका घेत म्हणाल्या, अशी चूक व्हायला नको होती. ज्या खात्यातून पैसे कापले गेले आहेत त्याच खात्यात पैसे परत केले पाहिजेत. टोल कंपनी ट्रान्सपोर्ट एनएसडब्ल्यू सर्व ड्रायव्हर्सना पैसे परत करेल हे सुनिश्चित करेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.