मराठी बातम्या /बातम्या /मनी /Axis बँक ग्राहकांना झटका! तुमचंही खातं असेल तर बदललेले नियम समजून घ्या नाहीतर भरावा लागेल दंड

Axis बँक ग्राहकांना झटका! तुमचंही खातं असेल तर बदललेले नियम समजून घ्या नाहीतर भरावा लागेल दंड

Axis Bank News Rule: अॅक्सिस बँकेच्या ग्राहकांनी हे लक्षात घ्यावे की आवश्यक मासिक शिलकीत बदल फक्त त्या खात्यांसाठी करण्यात आला आहे ज्यांना सरासरी 10,000 रुपये शिल्लक असणे आवश्यक आहे.

Axis Bank News Rule: अॅक्सिस बँकेच्या ग्राहकांनी हे लक्षात घ्यावे की आवश्यक मासिक शिलकीत बदल फक्त त्या खात्यांसाठी करण्यात आला आहे ज्यांना सरासरी 10,000 रुपये शिल्लक असणे आवश्यक आहे.

Axis Bank News Rule: अॅक्सिस बँकेच्या ग्राहकांनी हे लक्षात घ्यावे की आवश्यक मासिक शिलकीत बदल फक्त त्या खात्यांसाठी करण्यात आला आहे ज्यांना सरासरी 10,000 रुपये शिल्लक असणे आवश्यक आहे.

मुंबई, 5 एप्रिल : अॅक्सिस बँक खातेधारकांची (Axis Bank) संख्या मोठी आहे. यातील अनेक ग्राहकांना बँकेने बदललेल्या नव्या नियमाचं फटका बसू शकतो. अॅक्सिस बँकेने विविध बचत खात्यांसाठी (Saving Accounts) किमान शिल्लक मर्यादा (Minimum Balanced Limit) वाढवली आहे. याचा अर्थ दंड टाळण्यासाठी आता तुम्हाला तुमच्या बचत खात्यात जास्त रक्कम ठेवावी लागेल. एवढेच नाही तर बँकेने मोफत रोख व्यवहारांची मर्यादा 2 लाखांवरून 1.5 लाख रुपये केली आहे. हे बदल 1 एप्रिल 2022 पासून लागू झाले आहेत.

शहरी भागात बचत खात्यातील किमान शिल्लक रकमेची मर्यादा 10,000 रुपयांवरून 12,000 रुपये करण्यात आली आहे. अॅक्सिस बँकेच्या ग्राहकांनी हे लक्षात घ्यावे की आवश्यक मासिक शिलकीत बदल फक्त त्या खात्यांसाठी करण्यात आला आहे ज्यांना सरासरी 10,000 रुपये शिल्लक असणे आवश्यक आहे.

Multibagger Stock: बँकेत 10-12 वर्ष लागली असती, 'या' शेअरमुळे गुंतवणूकदारांचे पैसे सहा महिन्यात डबल!

ग्राहकांना त्यांच्या बँक खात्यात किमान रक्कम ठेवावी लागेल. ही शिल्लक न ठेवल्याने बहुतांश बँका दंड आकारतात. ही शिल्लक मर्यादा बँकेनुसार बदलते. अॅक्सिस बँकेच्या वेबसाइटनुसार, मेट्रो किंवा शहरी भागात सुलभ बचत आणि तत्सम योजनांसाठी किमान सरासरी शिल्लक मर्यादा 10,000 रुपयांवरून 12,000 रुपये करण्यात आली आहे.

तुमच्या जवळपास स्वस्त पेट्रोल-डिझेल कसं शोधणार; 'या' अ‍ॅप्सद्वारे एका क्लिकवर कळेल

थर्ड पार्टी कॅश ट्र्रान्झॅक्शनमध्ये बदल नाही

बचत आणि त्यासारख्या खात्यांसाठी मासिक मोफत रोख व्यवहार मर्यादा 2 लाख रुपयांवरून 1.5 लाख रुपये करण्यात आली आहे. पहिल्या मासिक रोख व्यवहारासाठी मोफत मर्यादा पहिले चार व्यवहार किंवा 2 लाख, यापैकी जे आधी येईल ते होते. आता, मोफत रोख व्यवहार मर्यादा पहिल्या चार व्यवहारांसाठी किंवा 1.5 लाख, यापैकी जे आधी असेल ते असेल. नॉन-होम आणि थर्ड पार्टी कॅश ट्रान्झॅक्शन मर्यादेत कोणताही बदल झालेला नाही.

First published:
top videos