जाहिरात
मराठी बातम्या / मनी / ATM मधून पैसे काढणं महागलं, या पद्धती वापरल्यास द्यावं लागणार नाही शुल्क

ATM मधून पैसे काढणं महागलं, या पद्धती वापरल्यास द्यावं लागणार नाही शुल्क

ATM मधून पैसे काढणं महागलं, या पद्धती वापरल्यास द्यावं लागणार नाही शुल्क

ATM Withdrawal Charges: ग्राहकांना सध्या अन्य बँकेच्या एटीएममध्ये पाच ट्रान्झॅक्शन मोफत असतील. वाढलेलं शुल्क यानंतरच्या ट्रान्झॅक्शनवर आकारण्यात येईल. तुम्ही या शुल्क देखील वाचवू शकता, वाचा काय आहे त्याकरता पद्धती

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 12 जून: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने बँकांना एटीएम (ATM) मधून पैसे काढण्यासाठी आकारकण्यात येणाऱ्या शुल्कात वाढ करण्याची परवानगी दिली आहे. त्यानंतर तुम्ही निश्चित मर्यादेपेक्षा जास्त वेळा एटीएममधून पैसे काढत असाल तर तुम्हाला शुल्क द्यावे लागेल. यामध्ये झालेली वाढ किरकोळ आहे. आधी हे शुल्क 20 रुपये होतं, आता 21 रुपये करण्यात आलं आहे. ग्राहकांना सध्या अन्य बँकेच्या एटीएममध्ये पाच ट्रान्झॅक्शन मोफत असतील. वाढलेलं शुल्क यानंतरच्या ट्रान्झॅक्शनवर आकारण्यात येईल. तुम्ही या शुल्क देखील वाचवू शकता, वाचा काय आहे त्याकरता पद्धती तुमचं बँक खातं अपग्रेड करा अनेक बँका अनलिमिटेड फ्री विड्रॉलची (Unlimited Free Withdrawal) ऑफर देतात, जर ग्राहक अधिक रक्कम डिपॉझिट करण्यासाठी तयार असतील. हे बँकांचे प्रीमियम अकाउंट्स असतात. ज्यामध्ये ग्राहकांना बँक खात्यात कमीत कमी 20 हजार रुपये दर महिन्याला बॅलन्स मेंटेन असणं आवश्यक आहे. कोटक महिंद्रा बँकेचं उदाहरण घेतल्यास, या बँकेच्या अधिकृत वेबसाइटनुसार या बँकेचे प्रो सेव्हिंग अकाउंट व्हीजा एटीएमच्या माध्यमातून मोफत रोखरक्कम काढण्याची अनुमती देते. याकरता तुम्हाला बँक खात्यात दरमहा 20000 रुपये मेंटेन असणं आवश्यक आहे. तसंच प्रत्येक व्यवहाराची मर्यादा 10000 रुपये आहे. हे वाचा- 30 जूनपूर्वी पूर्ण करा ही महत्त्वाची 5 कामं, अन्यथा बसेल मोठा आर्थिक फटका अशाप्रकारे एचडीएफसी बँकेचे मॅक्स खाते आहे. यामध्ये सर्व एटीएम आणि अन्य सुविधांवर मोफत व्यवहार करण्याची अनुमती देतं. याकरता ग्राहकांना बँक खात्यात दर महा 25 हजार रुपये शिल्लक ठेवणं आवश्यक आहे. हे वाचा- नोकरदारांसाठी मोदी सरकारचं गिफ्ट, जुलै महिन्यात PF खात्यात येतील एवढे अधिक पैसे डिजिटल पेमेंटचा करा वापर सध्या अनेक दुकानदार डिजिटल पेमेंटचा पर्याय निवडतात. यूनीफाइड पेमेंट इंटरफेस अर्थात यूपीआय यातील सर्वात सामान्य पद्धत आहे. डिजिटल पेमेंटचा अवलंब करत तुम्ही सहजगत्या तुमच्या खर्चावर नजर ठेवू शकता. शिवाय तुम्हाला फार रोखरक्कम बाळगण्याचीही आवश्यकता भासणार नाही. अधिकतर डिजिटल ट्रान्झॅक्शनवर कोणतंही शुल्क आकारलं जात नाही. सध्या UPI व्यतिरिक्त अन्य देखील काही पर्याय आहेत. UPI व्यतिरिक्त डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा ई-वॉलेटचा देखील वापर करू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: ATM , Bank , money
  • First Published :
जाहिरात
जाहिरात