कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (Employees' Provident Fund)सब्सक्रायबर्ससाठी मोदी सरकारकडून एक आनंदाची बातमी मिळणार आहे. जुलै महिन्यात तुमच्या पीएफ खात्यात जास्त पैसे येऊ शकतात.
एम्प्लाइज प्रोव्हिडेंट फंड ऑर्गेनायझेशनकडून (employees provident fund organisation -EPFO)कर्मचाऱ्यांना लवकरच आनंदाची बातमी मिळू शकते. कर्मचाऱ्यांना आर्थिक वर्ष 2020-21 साठी देण्यात येणारे 8.5 टक्के व्याज जुलै अखेरी देण्याची घोषणा केली जाऊ शकते.
याकरता EPFO ला कामगार मंत्रालयाची परवानगी मिळाली आहे. ही प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.
6 कोटी पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना मिळेल फायदा- कामगार मंत्रालयाकडून (labor Ministry) मंजुरी मिळाल्यानंतर पीएफच्या कक्षात येणाऱ्या सहा कोटी कर्मचाऱ्यांसाठी हा मोठा दिलासा ठरेल.
EPFO कडून फिक्सल इयर 2020-21 साी 8.5 टक्के व्याज जुलै अखेरपर्यंत दिले जाऊ शकते. मीडिया अहवालांच्या मते, व्याजाचे पैसे कर्मचाऱ्यांच्या अकाउंटमध्ये थेट क्रेडिट केले जातील.
गेल्यावर्षी करावी लागली होती प्रतीक्षा- गेल्यावर्षी 2019-20 चं व्याज मिळण्यासाठी अनेक EPFO खातेधारकांना दहा महिन्यांसाठी वाट पाहावी लागली होती.
EPFO ने फिक्सल इयर 2020-21 साठी व्याजदरात बदल न करण्याचा निर्णय घेत दर 8.5 टक्के कायम ठेवले होते. शिवाय EPFO देशभरात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे खातेधारकांना नॉन रिफंडेबल कोव्हिड-19 अॅडव्हान्स पैसे काढण्याची देखील मंजुरी देत आहे.