मराठी बातम्या /बातम्या /मनी /नवीन वर्षात ATM मधून पैसे काढणं महागणार, वाचा किती द्यावे लागणार अतिरिक्त शुल्क

नवीन वर्षात ATM मधून पैसे काढणं महागणार, वाचा किती द्यावे लागणार अतिरिक्त शुल्क

बँक खातं वापरणारे खातेधारक सर्रास पैसे कढण्यासाठी एटीएमचा (ATM rules Changing from 1st January 2022) वापर करतात. तुम्ही देखील एटीएम वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे

बँक खातं वापरणारे खातेधारक सर्रास पैसे कढण्यासाठी एटीएमचा (ATM rules Changing from 1st January 2022) वापर करतात. तुम्ही देखील एटीएम वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे

बँक खातं वापरणारे खातेधारक सर्रास पैसे कढण्यासाठी एटीएमचा (ATM rules Changing from 1st January 2022) वापर करतात. तुम्ही देखील एटीएम वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे

मुंबई, 30 डिसेंबर: बँक खातं वापरणारे खातेधारक सर्रास पैसे कढण्यासाठी एटीएमचा (ATM rules Changing from 1st January 2022) वापर करतात. तुम्ही देखील एटीएम वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. 1 जानेवारी 2022 पासून ATM मधून पैसे काढणे देखील महागणार आहे. आरबीआयच्या नियमांअंतर्गत आता ग्राहकांना निश्चित मर्यादेनंतर एटीएम ट्रान्झॅक्शनसाठी (ATM transaction limit) अधिक पैसे मोजावे लागतील. 1 जानेवारीपासून देशातील सर्व बँकांनी एटीएम चार्जेस 5 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थात ठराविक मर्यादेनंतर एटीएममधून पैसे काढल्यानंतर तुम्हाला दरवेळी 21 रुपये मोजावे लागतील. याशिवाय ग्राहकांना जीएसटी द्यावा लागेल. सध्या ही रक्कम 20 रुपये आहे, जी पुढील महिन्यापासून वाढून 21 रुपये करण्यात आली आहे.

हे आहे नवे अतिरिक्त शुल्क

पुढील महिन्यापासून, ग्राहकांनी मोफत व्यवहारांची मासिक मर्यादा ओलांडल्यास 20 रुपयांऐवजी 21 रुपये प्रति व्यवहार द्यावे लागतील. आरबीआयने सांगितले होते की, जास्त इंटरचेंज चार्ज आणि सामान्य खर्चात वाढ झाल्यामुळे RBI ने व्यवहारावरील शुल्क 21 रुपयांपर्यंत वाढवण्याची परवानगी दिली आहे.

हे वाचा-या राज्याने पेट्रोलचे दर 25 रुपयांनी घटवले, महाराष्ट्रात काय आहे इंधनाचा दर?

5 व्यवहार मोफत

ग्राहक त्यांच्या स्वत:च्या बँकेच्या एटीएममधून दर महिन्याला 5 मोफत व्यवहार (आर्थिक आणि गैर-आर्थिक व्यवहार) करू शकतील. ते मेट्रो शहरांमधील इतर बँकांच्या एटीएममधून तीन आणि नॉन-मेट्रो शहरांमध्ये पाच विनामूल्य व्यवहार करू शकतील. याशिवाय, आरबीआयने बँकांना सर्व केंद्रांमधील आर्थिक व्यवहारांसाठी प्रत्येक व्यवहारासाठी इंटरचेंज शुल्क 15 रुपयांवरून 17 रुपये आणि गैर-आर्थिक व्यवहारांसाठी 5 रुपयांवरून 6 रुपये करण्याची परवानगी दिली आहे.

हे वाचा-शॉर्ट टर्ममध्ये 'या' शेअर्समध्ये डबल डिजिट कमाईची संधी, चेक करा लिस्ट

1 जानेवारीपासून बदलणार डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड संदर्भातील नियम

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 1 जानेवारीपासून डेबिट क्रेडिट कार्ड संदर्भातील नियम लागू करणार आहे. तुम्ही जर डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरत असाल तर नवीन वर्षात ऑनलाइन कार्ड पेमेंटबाबत नियम बदलत आहेत. डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या सुरक्षेबाबत हा नियम लागू केला जाणार आहे.  RBI ने ऑनलाइन पेमेंट अधिक सुरक्षित बनवण्यासाठी सर्व वेबसाइट्स आणि पेमेंट गेटवे (payment gateways) द्वारे स्टोअर करण्यात आलेल्या ग्राहकांच्या डेटाला हटवण्यास आणि याजागी व्यवहारासाठी एन्क्रिप्टेड टोकन (encrypted tokens) चा वापर करण्यास सांगितले आहे.

First published:
top videos

    Tags: ATM, Money, Sbi ATM, बँक