मराठी बातम्या /बातम्या /मनी /Petrol Price Today: या राज्याने पेट्रोलचे दर 25 रुपयांनी घटवले, महाराष्ट्रात काय आहे इंधनाचा दर?

Petrol Price Today: या राज्याने पेट्रोलचे दर 25 रुपयांनी घटवले, महाराष्ट्रात काय आहे इंधनाचा दर?

झारखंडमधील हेमंत सोरेन सरकारने नववर्षानिमित्त राज्यातील जनतेला मोठी भेट दिली आहे. हेमंत सोरेन सरकारने राज्यात पेट्रोलच्या दरात 25 रुपयांनी (Petrol Price Slashed by 25 rupees in Jharkhand) कपात करण्याची घोषणा केली आहे.

झारखंडमधील हेमंत सोरेन सरकारने नववर्षानिमित्त राज्यातील जनतेला मोठी भेट दिली आहे. हेमंत सोरेन सरकारने राज्यात पेट्रोलच्या दरात 25 रुपयांनी (Petrol Price Slashed by 25 rupees in Jharkhand) कपात करण्याची घोषणा केली आहे.

झारखंडमधील हेमंत सोरेन सरकारने नववर्षानिमित्त राज्यातील जनतेला मोठी भेट दिली आहे. हेमंत सोरेन सरकारने राज्यात पेट्रोलच्या दरात 25 रुपयांनी (Petrol Price Slashed by 25 rupees in Jharkhand) कपात करण्याची घोषणा केली आहे.

मुंबई, 30 डिसेंबर: देशभरात पेट्रोल-डिझेलच्या किमती (Petrol Diesel Price Today 30th Dec 2021) आजही स्थिर आहेत. इंधनाचा भाव कधी कमी होणार याच प्रतीक्षेत सामान्य आहेत. आज मुंबईत पेट्रोलचा भाव 109.98 रुपये तर डिझेलचा भाव 94.14 रुपये प्रति लीटर आहे. महाराष्ट्रातील इतर शहरात काही पैशांनी इंधनाचे दर बदलले आहेत, अर्थात त्यात फार मोठा बदल झालेला नाही. दरम्यान पेट्रोल किमतीच्या बाबतीत एका राज्याने सामान्यांना दिलासा दिला आहे, हे राज्य म्हणजे झारखंड. झारखंडमधील हेमंत सोरेन सरकारने नववर्षानिमित्त राज्यातील जनतेला मोठी भेट दिली आहे. हेमंत सोरेन सरकारने राज्यात पेट्रोलच्या दरात 25 रुपयांनी (Petrol Price Slashed by 25 rupees in Jharkhand) कपात करण्याची घोषणा केली आहे.

झारखंडमधील हेमंत सोरेन सरकारने हा दिलासा केवळ दुचाकी वाहनांसाठी दिला आहे. बुधवारी झारखंड सरकारला 2 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने झारखंडच्या मुख्यमंत्री कार्यालयाच्या (CMO Jharkhand Twitter) ट्विटर हँडलवरून ट्वीट करुन याबाबत माहिती देण्यात आली आहे. या ट्वीटमध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, आता राज्यातील दुचाकी वाहनांना पेट्रोलवर प्रतिलीटर 25 रुपयांची सूट देण्यात येणार आहे. हा फायदा 26 जानेवारी 2022 पासून सुरू होईल, अशी घोषणा करण्यात आली आहे. रांचीमध्ये पेट्रोलचा दर 98.52 रुपये प्रति लीटर आहे, तर या शहरात डिझेल 91.56 रुपये प्रति लीटरवर आहे.

हे वाचा-Home Loan : चांगल्या Credit Score चा होईल फायदा; 6.65 टक्के दराने गृहकर्ज मिळेल

लवकर स्वस्त होणार पेट्रोल-डिझेल

पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी करण्यासाठी सरकार नवीन प्लॅन तयार करत आहे. भारत कच्च्या तेलाच्या किमती कमी करण्यासाठी अन्य प्रमुख अर्थव्यवस्थांसह समन्वयाने भारत धोरणात्मक तेल साठ्यातून तेल काढण्याच्या योजनेवर काम करत आहे.

राज्यात काय आहेत पेट्रोल-डिझलचे दर?

शहरपेट्रोलचा भाव (प्रति लीटर)डिझेलचा भाव (प्रति लीटर)
पुणे110.69 रुपये93.44 रुपये
मुंबई109.98 रुपये94.14 रुपये
नाशिक110.15 रुपये92.92 रुपये
नागपूर110.32 रुपये93.11 रुपये
अहमदनगर110.52 रुपये93.27 रुपये
औरंगाबाद110.14 रुपये92.91 रुपये
रत्नागिरी111.54 रुपये94.28 रुपये
परभणी113.13 रुपये95.78 रुपये
पालघर109.63 रुपये92.39 रुपये
सांगली110.46 रुपये93.24 रुपये
कोल्हापूर109.97 रुपये92.77 रुपये

दररोज सकाळी 6 वाजता बदलते किंमत

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते.

हे वाचा-Ultratech Cement शेअरवर ICICI Securities ची BUY रेटिंग कायम; काय आहे कारण?

अशाप्रकारे घरबसल्या तपासा पेट्रोल-डिझेलचे नवे दर

पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही एसएमएस (SMS)च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. त्याचप्रमाणे देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी करतात. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. तसंच आपण मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. इंडियन ऑइलचे कस्टमर 92249 92249 वर SMS पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल. एचपीसीएल कस्टमर HPPrice लिहून 9222201122 या क्रमांकावर मेसेज पाठवून तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलची किंमत जाणून घेऊ शकतात.

First published:
top videos

    Tags: Petrol, Petrol and diesel, Petrol and diesel price