16 मार्चपासून बंद होणार ATM चे हे व्यवहार, हे आहे कारण

16 मार्चपासून बंद होणार ATM चे हे व्यवहार, हे आहे कारण

ATM कार्डमधून पैसे काढण्याचे नियम बदलणार आहेत. RBI ने दिलेल्या माहितीनुसार, ATM कार्डने केले जाणारे व्यवहार सोपे करण्यासाठी हे नियम करण्यात आले आहेत.

  • Share this:

मुंबई,12 फेब्रुवारी : ATM कार्डमधून पैसे काढण्याचे (RBI allows card holders to enable disable cards for online)नियम बदलणार आहेत. RBI ने दिलेल्या माहितीनुसार, ATM कार्डने केले जाणारे व्यवहार सोपे करण्यासाठी हे नियम करण्यात आले आहेत. त्याचबरोबर खात्यामधले पैसे सुरक्षित राहावे हाही यामागचा उद्देश आहे.

याआधी 1 जानेवारी 2020 पासून SBI ने ATM मधून पैसे काढण्याचे नवे नियम जारी केले होते. आता SBI ने वनटाइम पासवर्ड म्हणजेच OTP वर आधारित कॅश विथड्रॉल सिस्टीम सुरू केली आहे. यानुसार सकाळी 8 पासून रात्री 8 वाजेपर्यंत पैसे काढायचे असतील तर OTP द्यावा लागेल.

हे आहेत नवे नियम

1. ज्या लोकांना परदेशात जावं लागत नाही त्यांच्या कार्डवर ओव्हरसीजची सुविधा मिळणार नाही.

2. ज्या लोकांकडे सध्या हे कार्ड आहे त्यांनी त्यांच्या कार्डचं काय करायचं हे त्यांनी ठरवायचं आहे.

(हेही वाचा : तुमचा PF खात्यातून काढण्याचे नियम बदलले,आता घरबसल्या अपडेट करा 'Date of Exit')

3. ग्राहक 24 तासांत कधीही त्यांचं कार्ड ऑन/ ऑफ करू शकतात. यासाठी ते मोबाइल अॅप, इंटरनेट बँकिंगचा वापर करू शकतात.

4. बँक आपल्या ग्राहकांसाठी ट्रान्झॅक्शन लिमिटमध्ये बदल करण्याची सुविधा देणार आहे.

5. हे नवे नियम प्रिपेड गिफ्ट कार्ड आणि मेट्रो कार्डवर लागू होणार नाही.

(हेही वाचा : सुवर्णसंधी ! सोनं-चांदीच्या किंमतीत झाली मोठी घसरण)

=============================================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: ATMmoney
First Published: Feb 12, 2020 08:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading