Home /News /money /

अर्थसंकल्प समजावून सांगण्यासाठी अर्थ मंत्रालयातर्फे आजपासून 'अर्थशास्त्री' उपक्रम; सोशल मीडियावर होणार क्लास?

अर्थसंकल्प समजावून सांगण्यासाठी अर्थ मंत्रालयातर्फे आजपासून 'अर्थशास्त्री' उपक्रम; सोशल मीडियावर होणार क्लास?

अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी रोजी त्यांच्या कार्यकाळातला चौथा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. संसदेचं (Parliament) अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget Session) 31 जानेवारीपासून सुरू होणार आहे.

मुंबई, 23 जानेवारी : अर्थसंकल्पाविषयी (Budget) सगळ्यांनाच उत्सुकता असते; मात्र सर्वसामान्य नागरिकांपैकी फार कमी जणांना अर्थसंकल्प समजून घेण्यात रस असतो. बहुतांश जणांसाठी काय महागणार, काय स्वस्त होणार, करसवलत किती मिळणार इतकाच अर्थसंकल्पाचा अर्थ असतो. अर्थसंकल्पाविषयी असलेल्या उत्सुकतेपोटी तो सादर होत असताना अनेक नागरिक टीव्हीवर तो पाहत असतात; पण अनेक शब्दांचा अर्थ त्यांना कळत नाही. त्यामुळे अनेकांना अर्थसंकल्प दुर्बोध वाटतो. खरंतर, अर्थसंकल्पात देशातल्या अनेक घटकांच्या विकासासाठीच्या योजना, संपूर्ण वर्षाच्या जमाखर्चाचा अंदाज असतो. योजनांसाठी सरकार किती खर्च करणार आहे, त्यासाठी पैसा कुठून उभा करणार आहे, अशा अनेक गोष्टी यात सांगितल्या जातात. सर्वसामान्य नागरिकांशी या सगळ्याचा जवळचा संबंध असतो; पण अर्थसंकल्पाच्या दुर्बोधातेमुळे फार कमी जण तो संपूर्ण ऐकतात किंवा समजून घेण्याचा प्रयत्न करतात. कृषी, रेल्वे, विविध उद्योग, कर आकारणी इत्यादी क्षेत्रांतली तज्ज्ञ मंडळी अर्थमंत्र्यांचं भाषण ऐकतात आणि त्यातल्या बाबी स्पष्ट करून सांगतात. तरीही त्यातील अनेक बाबी सर्वसामान्य जनतेला समजत नाहीत. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता सर्वसामान्य नागरिकांनादेखील अर्थसंकल्प समजून घेता यावा यासाठी अर्थमंत्रालयानेच (Finance Ministry) पुढाकार घेतला असून, यासाठी एक अभिनव उपक्रम सुरू केला आहे. अर्थशास्त्री (Arthshastri) असं या उपक्रमाचं नाव असून, याद्वारे सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून अॅनिमेशनपटांतून (Animated Video) अर्थसंकल्पातल्या विविध बाबी सोप्या भाषेत समजून सांगण्यात येणार आहेत. 22 जानेवारीपासून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. 'झी न्यूज'नं याबाबतचं वृत्त दिलं आहे. शेअर बाजाराची चाल 'या' आठवड्यात कशी असेल? कोणते घटक ठरतील महत्त्वाचे? अर्थ मंत्रालयानं एका ट्विटर संदेशाद्वारे याबाबत माहिती दिली आहे. 'सरकारची धोरणं आणि आर्थिक बाबी समजावून सांगण्यासाठी प्रोफेसर शास्त्री (Professor Shastri) आणि विद्यार्थी 'अर्थ ' (Student Arth) आर्थिक सर्वेक्षण 2021-22 पूर्वी परत येत आहेत. हे वर्ग अजिबात चुकवू नका,' असं या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. एक तज्ज्ञ आणि एक विद्यार्थी अर्थसंकल्पातले विविध शब्द, त्यांचे अर्थ याबाबत चर्चा करत आहेत, अशा पद्धतीचे अॅनिमेटेड स्वरूपातले हे व्हिडीओ 31 जानेवारीपर्यंत दररोज सकाळी 11 वाजता सोशल मीडियावर प्रसारित केले जाणार आहेत. Mutual funds SIP: कमी जोखिमेतून कशाप्रकारे मिळवाल चांगला रिटर्न? वाचा कमाईचा फॉर्म्युला अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी रोजी त्यांच्या कार्यकाळातला चौथा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. संसदेचं (Parliament) अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget Session) 31 जानेवारीपासून सुरू होणार आहे. आर्थिक सर्वेक्षणही 31 जानेवारी रोजी संसदेच्या पटलावर मांडलं जाणार आहे. यातून देशातल्या आर्थिक स्थितीचा अंदाज येतो. विविध वर्गाच्या अपेक्षा यात मांडलेल्या असतात. आर्थिक सर्वेक्षण (Economic Survey) मांडण्यापूर्वी अर्थमंत्रालयाचा हा 'अर्थशास्त्री' उपक्रम पूर्ण होणार आहे. यामुळे अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी त्यातले क्लिष्ट शब्द, संकल्पना स्पष्ट झालेल्या असतील. त्यामुळे अर्थसंकल्पीय भाषण ऐकताना ते समजून घेणं सर्वसामान्य नागरिकांनाही सोपं जाईल.
First published:

Tags: Budget, Money, Union budget

पुढील बातम्या