Home /News /money /

Mutual funds SIP: कमी जोखिमेतून कशाप्रकारे मिळवाल चांगला रिटर्न? वाचा कमाईचा फॉर्म्युला

Mutual funds SIP: कमी जोखिमेतून कशाप्रकारे मिळवाल चांगला रिटर्न? वाचा कमाईचा फॉर्म्युला

उपलब्ध योजनांमधून सर्वोत्तम योजना निवडण्यासाठी शार्प रेशो फॉर्म्युला (Sharp Ratio Formula) लागू करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. या शार्प रेशो सूत्रामुळे गुंतवणूकदाराला कमी जोखमीत अधिक नफा मिळण्याची संधी मिळते

मुंबई, 23 जानेवारी: उपलब्ध योजनांमधून सर्वोत्तम योजना निवडण्यासाठी शार्प रेशो फॉर्म्युला (Sharp Ratio Formula) लागू करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. या शार्प रेशो सूत्रामुळे गुंतवणूकदाराला कमी जोखमीत अधिक नफा मिळण्याची संधी मिळते. याबाबत अधिक माहिती देताना ऑप्टिमा मनी मॅनेजर्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (MD and CEO of Optima Money Managers, Optima Money Managers) पंकज मठपाल म्हणाले, 'शार्प रेशोचा वापर एखाद्या म्युच्युअल फंड एसआयपी योजनेतली जोखीम आणि परताव्याचा अभ्यास करण्यासाठी केला जातो. जोखीम घेतल्यास किती अतिरिक्त परतावा मिळेल याची माहिती याद्वारे गुंतवणूकदाराला मिळते. एखाद्या नवीन गुंतवणूकदाराला विविध म्युच्युअल फंड योजनांमधून एक निवडायची असेल, तर वर्षानुवर्षं जवळपास समान परतावा दिलेल्या योजनांमधून एक योजना निवडणं सोपं असतं.' म्युच्युअल फंड योजनांमध्ये शार्प रेशो सूत्र कसं वापरावं याबाबात माहिती देताना सेबी (SEBI) नोंदणीकृत कर आणि गुंतवणूक तज्ज्ञ जितेंद्र सोलंकी म्हणाले, 'समान श्रेणीतल्या म्युच्युअल फंड योजनांची तुलना करण्यासाठी हे सूत्र वापरावं. मिड-कॅप विभागातल्या म्युच्युअल फंड योजनांची स्मॉल-कॅप विभागातल्या योजनांशी तुलना करण्यात काही अर्थ नाही. हे सूत्र लागू करण्यापूर्वी, ज्या योजनांची तुलना करायची आहे, त्या सर्व योजना एकाच श्रेणीतल्या असल्याची खात्री करून घ्यावी.' हे वाचा-Adani Wilmar IPO 27 जानेवारीला येणार, गुंतवणूकदारांना कमाईची संधी गुंतवणूकदारांनी योग्य योजना निवडण्यासाठी 'ट्रेयनोर रेशो' (Treynor Ratio Formula) हे सूत्र लागू करण्याचा सल्लाही सोलंकी यांनी दिला आहे. 'शार्प रेशोचं सूत्र गुंतवणूकदाराला जोखीम आधारित परताव्याबद्दल सांगतं, तर ट्रेयनोर रेशो बाजारातली अस्थिरता आणि त्यानुसार मिळणारा परतावा याची माहिती देते. म्युच्युअल फंडातल्या गुंतवणुकीवर शेअर बाजारातल्या चढ-उतारांचा परिणाम होत असल्यानं ही जोखीम लक्षात घेऊन त्यानुसार परतावा तपासणं आवश्यक आहे. त्यामुळे म्युच्युअल फंड योजनांची तुलना करताना शार्प रेशोसह ट्रेयनोर रेशोही तपासणं महत्त्वाचं आहे. एकरकमी (One Time) आणि एसआयपी (SIP) अशा दोन्ही प्रकारच्या गुंतवणुकीसाठी हे सूत्र उत्तम आहे, ' असं सोलंकी यांनी सांगितलं. हे वाचा-दीड लाखांपर्यंत अतिरिक्त टॅक्स सूट मिळू शकते, करावं लागेल 'हे' काम म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांनी एसआयपी किंवा एकरकमी गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंड योजना निश्चित करण्यापूर्वी शार्प रेशो आणि ट्रेयनोर रेशोचं सूत्र लागू केल्यास अनेक योजनांमधून सर्वोत्तम योजना निवडणं सोपं जाईल.
First published:

Tags: Money, Savings and investments

पुढील बातम्या