मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Arihant Superstructures : वर्षभरात 700 टक्के रिटर्न्स, 20 रुपयांचा स्टॉक 161 रुपयांवर

Arihant Superstructures : वर्षभरात 700 टक्के रिटर्न्स, 20 रुपयांचा स्टॉक 161 रुपयांवर

रिअल्टी फर्म अरिहंत सुपरस्ट्रक्चर्सच्या (Arihant Superstructures) शेअरची किंमत गेल्या एका वर्षात 700 टक्क्यांहून अधिक वाढली आहे.

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 26 ऑक्टोबर : भारतीय शेअर बाजार  (Share Market) सध्या विक्रमी पातळीवर आहे. गेल्या वर्षभरात काही शेअर्समुळे गुंतवणूकदार मालामाल झाले आहे. दुप्पट-तिप्पट नाही तर कित्येक पट्टीने गुंतवणूकदारांना रिटर्न्स मिळाले आहेत. तुम्हीही तुमच्या पोर्टफोलिओसाठी उत्तम रिटर्न देणारा मल्टीबॅगर स्टॉक (Multibaggr Stock)  शोधत असाल, तर एक स्टॉक आहे ज्याने एका वर्षात गुंतवणूकदारांना 700 टक्के रिटर्न्स दिले आहे.

रिअल्टी फर्म अरिहंत सुपरस्ट्रक्चर्सच्या (Arihant Superstructures) शेअरची किंमत गेल्या एका वर्षात 700 टक्क्यांहून अधिक वाढली आहे.

शेअरची किंमत 20 वरून 161 रुपयांपर्यंत वाढली

ऑक्टोबर 2020 मध्ये या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअर्सची किंमत 20 रुपये होती, जी आता 161 रुपये झाली आहे. या कालावधीत कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 704 टक्के रिटर्न्स दिले आहे.

Elon Musk यांची मोठी झेप; एका दिवसात संपत्तीत 27,15,00,00,00,000 रुपयांची वाढ

निफ्टी रियल्टी इंडेक्सशी तुलना केल्यास, या कालावधीत निफ्टीने 117 टक्के रिटर्न दिला आहे, तर निफ्टी स्मॉलकॅप इंडेक्स 83 टक्के वाढला आहे. अशा प्रकारे या रिअॅल्टी स्टॉकने त्याच्या दोन्ही बेंचमार्क इंडेक्सना मागे टाकले आहे. निफ्टी 50 ने गेल्या एका वर्षात 51 टक्के रिटर्न दिले आहे.

एका वर्षात लाखाचे 8 लाख

एखाद्या गुंतवणूकदाराने वर्षभरापूर्वी अरिहंत सुपरस्ट्रक्चर्सच्या स्टॉकमध्ये 1 लाख गुंतवले असते, तर आज त्याचे 8 लाख झाले असते. अरिहंत सुपरस्ट्रक्चर्स ही एक स्मॉलकॅप रिअल इस्टेट कंपनी आहे ज्याचा मुख्य भर परवडणारी घरे बांधण्यावर आहे.

रिक्षा चालकाला भरावे लागणार 3 कोटी रुपये, INCOME TAX ने पाठवली नोटीस; वाचा सविस्तर

अरिहंत सुपरस्ट्रक्चर्सने चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत म्हणजे जुलै-सप्टेंबर 2021 या कालावधीत 11.63 कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला आहे, जो मागील वर्षीच्या याच कालावधीत 4.15 कोटी रुपये होता. कंपनीची निव्वळ विक्री देखील 38 टक्क्यांनी वाढून 87.80 कोटी झाली आहे, जी मागील वर्षी याच तिमाहीत 63.60 कोटी होती. बहुतेक ब्रोकरेज या स्टॉकवर BUY रेटिंग देत आहेत

First published:

Tags: Investment, Money, Share market