मराठी बातम्या /बातम्या /मनी /

तुमचंही एकापेक्षा अधिक बँकांमध्ये खातं आहे का? होऊ शकतं मोठं नुकसान, वाचा सविस्तर

तुमचंही एकापेक्षा अधिक बँकांमध्ये खातं आहे का? होऊ शकतं मोठं नुकसान, वाचा सविस्तर

तुम्ही एकापेक्षा जास्त बँकांमध्ये खाती (Bank Accounts in More than one Bank) उघडली असतील तर, ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. एकापेक्षा जास्त खाती असल्यानं ग्राहकांना काही अडचणींना तोंड द्यावं लागू शकेल

नवी दिल्ली, 08 जुलै: तुम्ही एकापेक्षा जास्त बँकांमध्ये खाती (Bank Accounts in More than one Bank) उघडली असतील तर, ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. एकापेक्षा जास्त खाती (Bank Account) असल्यानं ग्राहकांना काही अडचणींना तोंड द्यावे लागते तसेच त्यांचा आर्थिक तोटाही होतो. जितकी जास्त खाती असतील तितकी जोखीम जास्त असल्यानं फसवणूकीची शक्यता देखील अधिक असते. जास्त खाती असल्यानं त्यात किमान शिल्लक ठेवण्याच्या अटीमुळे पैसे अडकून पडतात. याशिवाय अन्यही काही तोटे होतात, त्याबाबत जाणून घेऊ या...

- अनेक बँकांमध्ये खाती असल्यास प्राप्तिकर (Income Tax) भरतानाही तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तुम्हाला तुमच्या प्रत्येक बँक खात्याशी संबंधित माहिती द्यावी लागेल.

- विविध बँकांचे सेव्हिंग बँक अकाउंट संदर्भात नियम वेगवेगळे असतात. बचत खात्यात किमान रक्कम ठेवावी लागते आणि ही रक्कम ठेवली नाही तर बँका दंड आकारतात. दंडाची रक्कम खात्यातून वजा केली जाते.

- आजकाल लोक वारंवार नोकर्‍या बदलतात. नवीन कंपनी नवं पगार खातं (Salary Account) उघडत असते. त्यामुळं आधीच्या कंपनीचे पगार खातं निष्क्रिय होते. कोणत्याही पगार खात्यात तीन महिन्यांपर्यंत वेतन जमा न झाल्यास ते आपोआप बचत खात्यात रूपांतरित होते.

- सर्व खात्यांची स्टेटमेंट ठेवणं देखील एक अतिशय कंटाळवाणं काम असतं. निष्क्रिय खातं योग्यप्रकारे न वापरल्यास आपले आर्थिक नुकसानही होतं.

हे वाचा-RBI ने SBI सह या 14 बँकांना ठोठावला दंड, बँक ऑफ महाराष्ट्राचाही समावेश

- समजा तुमची चार बँक खाती आहेत, तर तुम्हाला प्रत्येक खात्यात किमान 10 हजार रुपये शिल्लक (Minimum Balance) ठेवणं आवश्यक आहे. बचत खात्यातील शिलकीवर वार्षिक 4 टक्के दरानं व्याज मिळतं. त्यानुसार तुम्हाला सुमारे चार खात्यांमधील 40 हजार रुपयांवर वार्षिक 1600 रुपयांचे व्याज मिळेल. तुम्ही खाती बंद केली आणि ही रक्कम म्युच्युअल फंडात गुंतवली तर तुम्हाला किमान 10 टक्के परतावा मिळू शकेल.

फसवणूकीची शक्यता वाढते

अनेक बँकांमध्ये खाती असणं हे सुरक्षेच्या दृष्टीनंही चांगलं नाही. आजकाल बहुतांश लोक नेट बँकिंगद्वारे (Net Banking) खातं वापरतात. अशा परिस्थितीत प्रत्येक खात्याचा पासवर्ड (Password) लक्षात ठेवणं खूप कठीण ठरतं. एखादं खातं फार वापरत नसल्यास आपण त्याचा पासवर्ड बदलत नाही, अशावेळी त्या खात्यात गैरव्यवहार, फसवणूक होण्याची शक्यता असते. त्यामुळं फार वापरत नसलेली खाती बंद करा आणि त्याचं नेट बँकिंगही आवर्जून डिलीट करा.

हे वाचा-खूशखबर! सोन्याच्या किंमतीत आज मोठी घसरण, 8750 रुपयांनी स्वस्त आहे सोनं

खातं बंद करण्यासाठी

खातं बंद करताना आपल्याला डी-लिंकिंग फॉर्म भरावा लागू शकतो. या फॉर्ममध्ये खातं बंद करण्याचं कारण दयावं लागतं. तुमचे संयुक्त खाते असेल तर फॉर्मवर सर्व खातेधारकांची सही आवश्यक आहे. खात्यात शिल्लक असलेली रक्कम ज्या खात्यात तुम्हाला जमा करून हवे आहेत त्याची माहिती देणारा आणखी एक फॉर्म भरावा लागेल. खाते बंद करण्यासाठी तुम्हाला स्वतः बँकेच्या शाखेत जावे लागेल.

खाते बंद करण्यासाठी किती शुल्क आहे?

खातं उघडल्यानंतर 14 दिवसांच्या आत ते बंद केल्यास बँका कोणत्याही शुल्काची (Closure Charges) आकारणी करीत नाहीत. 14 दिवसांनंतर आणि एक वर्ष पूर्ण होण्याच्या आत खातं बंद केल्यास शुल्क भरावं लागेल. एका वर्षापेक्षा जास्त जुने खाते बंद करण्यासाठी कोणतंही शुल्क आकारलं जात नाही

First published:

Tags: Bank, Bank details, Saving bank account