गोल्ड लोन घेणे हे इतर कर्जांपेक्षा स्वस्त आणि चांगले मानले जाते. कारण त्यावर इतर बँकांच्या कर्जापेक्षा कमी व्याज आकारले जाते. तसेच तुमचे दागिने देखील सुरक्षित राहतात. तुम्ही सोनं दिल्यावरच तुम्हाला त्या बदल्यात लोन मिळू शकतं. सोन्याचे प्रमाण आणि शुद्धता पाहूनच बँक तुम्हाला लोन देतात. बँकेकडून या प्रकारचे कर्ज घेणे ही अत्यंत सोपी आणि कमी कागदपत्रांची प्रक्रिया आहे. यावर कमी व्याजासह, अॅडजेस्टबल टेन्योर देखील ऑफर केला जातो. जर तुम्ही सोन्यावर कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर आज आपण अशा 10 बँकांविषयी जाणून घेणार आहोत. ज्या कमी व्याजदरात गोल्ड लोन ऑफर करत आहेत.
तुमचं पॅन आधारशी लिंक आहे की नाही? विसरला असाल तर असं करा चेकगोल्ड लोनवर सर्वात कमी व्याज देणारे बँक
-HDFC बँक 7.20 टक्के ते 11.35 टक्के व्याज आणि 1 टक्के प्रोसेसिंग फीस घेते. -कोटक महिंद्रा बँकेत गोल्ड लोनवर 8% ते 17% पर्यंत व्याज आहे, ज्यावर 2% प्रोसेसिंग फीस GST सह आहे. -युनियन बँक 8.40 टक्के ते 9.65 टक्के व्याज आकारत आहे. -सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे व्याज 8.45% ते 8.55% आणि कर्जाच्या रकमेच्या 0.5% पर्यंत प्रोसेसिंग चार्ज आहे. -Uco बँक 8.50 टक्के व्याज आणि प्रोसेसिंग फीस 250 ते 5000 रुपयांपर्यंत आहे. -SBI गोल्ड लोनवर व्याज 8.55% आहे आणि प्रोसेसिंग 0.50% + GST आहे. -इंडसइंड बँक गोल्ड लोनवर 8.75% ते 16% पर्यंत व्याज आकारेल आणि प्रोसेसिंग चार्ज 1% आहे. -पंजाब आणि सिंध बँकेचे व्याज 8.85 टक्के आहे आणि प्रोसेसिंग चार्ज 500 ते 10,000 रुपयांपर्यंत आहे. -फेडरल बँकेचे व्याज 8.89 टक्के आहे. -पंजाब नॅशनल बँक 9 टक्के व्याज आणि 0.75 टक्के प्रोसेसिंग चार्ज आकारत आहे.
गोल्ड लोन किती दिवसांसाठी घेता येते?
या प्रकारच्या कर्जाची परतफेड करण्याची मुदत ग्राहक आणि बँकेवर अवलंबून असते. तर गोल्ड लोनची किंमत सोन्याच्या शुद्धतेवर अवलंबून असते. कोटक महिंद्रा बँकेच्या वेबसाइटनुसार, गोल्डवर किमान 20,000 रुपयांपासून कमाल 1,50,00,000 रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते. 25 लाखांपेक्षा जास्त रकमेसाठी आयटीआर आवश्यक आहे. दुसरीकडे, 5 लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्नासाठी पॅन कार्ड आवश्यक आहे. जर तुमच्याकडे पॅन कार्ड नसेल तर तुम्हाला गोल्ड लोन मिळणे कठीण होईल.