Amazon, Flipkartसह ई कॉमर्स कंपन्यांनी 6 दिवसांत विकलं 21 हजार कोटींचं सामान

Amazon, Flipkartसह ई कॉमर्स कंपन्यांनी 6 दिवसांत विकलं  21 हजार कोटींचं सामान

याOnline व्यवहारात सर्वात जास्त विक्री ही स्मार्टफोन'ची झालीय. मागच्या वर्षीच्या तुलनेत 15 ते 18 टक्क्यांची वाढ झाल्याचं स्पष्ट झालंय.

  • Share this:

नवी दिल्ली 09 ऑक्टोंबर : देशात आर्थिक विकासाची गती मंदावलेली असल्याने वाहन निर्मितीसह अनेक उद्योगांना मोठा फटका बसलाय. अनेक उद्योगांची उलाढलही घसरलीय. असं असताना ई-कॉमर्स (E commerce Companies) कंपन्यांनी मात्र सणांच्या दिवसांमध्ये बक्कळ कमाई केल्याचं एका पाहणी अहवालात आढळून आलंय. Amazon आणि Flipkartसह काही दिग्गज कंपन्यांनी दसरा आणि नवरात्रीच्या सहा दिवसांमध्ये तब्बल 300 कोटी डॉलर्स म्हणजेच 21 हजार कोटी रुपयांचा व्यवसाय केल्याचं आढळून आलंय. रेडसीर या सल्लागार कंपनीने(Consulting firm RedSeer)  केलेल्या एका अभ्यासात ही माहिती बाहेर आलीय. रेडसीरच्या अहवालानुसार मागच्या वर्षीच्या तुलनेत ही वाढ 30 टक्के जास्त आहे. जागतिक मंदीसदृश्य स्थिती (Global Slowdown) असताना ही ई कॉमर्स कंपन्यांची ही कामगिरी दिलासा देणारी ठरणार आहे.

खुशखबर...50 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना मोदी सरकारने दिलं 'हे' दिवाळीचं गिफ्ट

काही अहवालांमध्ये यावर्षी  370-380 कोटी डॉलर्सच्या विक्रीचा अंदाच व्यक्त करण्यात आला होता. आर्थिक सुस्ती असताना सणांमुळे लोकांनी वस्तुंची जोरदार खरेदी केली त्यामुळे चांगली आर्थिक उलाढाल झालीय.

या हंगामात सर्वात जास्त विक्री Flipkart ने केलीय. मार्केटमध्ये Flipkartचा हिस्सा तब्बल 60 टक्के आहे. तर Amazonचा हिस्सा त्याच्या अर्धा म्हणजे 30 टक्के आहे. सणांच्या दिवसांमुळे लोक Online Shopingला प्राधान्य देत असून दुकानाच्या तुलनेत घसघशीत सुट मिळत असल्याने लोकांचा कल Online Shopingकडे वाढतोय. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी Flipkartच्या विक्रीत 58 टक्क्यांची वाढ नोंदली गेलीय.

सरकार देतंय सोनं खरेदी करण्याची 'सुवर्णसंधी'! हे मिळणार फायदे

मागच्या वर्षी याच काळात Amazonच्या विक्रीत 22 टक्क्यांची वाढ झाली होती. Amazonने मात्र हा रिपोर्ट फेटाळून लावलाय. Amazonने पत्रक काढून यावर आली प्रतिक्रीया व्यक्त केलीय. Amazon विश्वसनीय गोष्टींवर आधारीत नसलेल्या अहवालावर आम्ही प्रतिक्रीया व्यक्त करत नाही असं Amazonने म्हटलं आहे. मागच्या आढवड्यातच Amazon आणि Flipkart या दोन्ही कंपन्यांनी आपण Online Shopingमध्ये अग्रभागी असल्याचा दावा केला होता. छोट्या शहरांमध्ये ग्राहकांची संख्या वाढल्याने व्यवसायवृद्धी झाल्याचा दावा या कंपन्यांनी केला होता.

RBI चा मोठा निर्णय; ATMमधून नाही निघणार 2000 रुपयांची नोट, कारण...!

याOnline व्यवहारात सर्वात जास्त विक्री ही स्मार्टफोन'ची झालीय. लोकांचा फोन्स घेण्याकडे जास्त कल आहे. शाओमी आणि रियलमी याकंपन्यांनी स्वस्त फोनच्या श्रेणीत आघाडी घेतलीय. तर samsung ने मध्यम तर प्रिमियम गटात OnePlus आणि Apple ने बाजी मारलीय.

Published by: Ajay Kautikwar
First published: October 9, 2019, 4:04 PM IST
Tags:

ताज्या बातम्या