सरकार देतंय सोनं खरेदी करण्याची 'सुवर्णसंधी'! हे मिळणार फायदे

या सणासुदीच्या दिवसात सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा तुमचा विचार असेल तर एक 'सुवर्णसंधी' आहे. सॉव्हरिन गोल्ड बाँड 2019 - 20 च्या पाचव्या मालिकेत सरकारने गुंतवणुकीची संधी दिली आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 7, 2019 06:10 PM IST

सरकार देतंय सोनं खरेदी करण्याची 'सुवर्णसंधी'! हे मिळणार फायदे

नवी दिल्ली, 7 ऑक्टोबर : या सणासुदीच्या दिवसात तुम्ही सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा तुमचा विचार असेल तर एक 'सुवर्णसंधी' आहे. सॉव्हरिन गोल्ड बाँड 2019 - 20 च्या पाचव्या मालिकेत सरकारने गुंतवणुकीची संधी दिली आहे.

या योजनेत तुम्ही 3 हजार 788 प्रतिग्रॅम दराने गुंतवणूक करू शकता. या गोल्ड बाँडमध्ये ऑनलाइन गुंतवणूक केली तर तुम्हाला 50 रुपये प्रतिग्रॅम सूट मिळेल. अर्थमंत्रालायानेच याबदद्लची माहिती दिली आहे.

10 ग्रॅमवर1 हजार 20 रुपयांची बचत

मागच्या महिन्यात सरकारने सॉव्हरिन गोल्ड बाँड सीरिज जारी केली होती. पण मागच्या वेळच्या तुलनेत यावेळी सोन्याच्या बाँडमध्ये 100 रुपयांपेक्षा कमी दराने गुंतवणूक करू शकता. तुम्ही जर एक तोळ्यामध्ये गुंतवणूक केली तर 1 हजार 20 रुपयांची बचत होईल. सरकारने 2015 मध्ये सॉव्हरिन गोल्ड बाँड लाँच केलं. बाजारात सोन्याची मागणी कमी व्हावी हा यामागचा उद्देश होता.

(हेही वाचा : सोन्या-चांदीच्या दरात झाली घट, हे आहेत आजचे दर)

Loading...

सोन्याच्या किंमती वाढल्या तर सॉव्हरिन गोल्ड बाँडमध्ये चांगला फायदा मिळतो. यावर दरवर्षी 2.5 टक्के व्याज मिळतं. हे व्याज आपल्याला 6 महिन्यांनी मिळू शकतं.

या बाँडमध्ये कमीत कमी 1 ग्रॅमची गुंतवणूक करता येते. त्याचवेळी दरवर्षी प्रत्येक व्यक्ती 500 ग्रॅमची गुंतवणूक करू शकते. हिंदू अविभक्त कुटुंबात याची मर्यादा 4 किलोची आहे तर ट्रस्टसाठी गुंतवणुकीची मर्यादा 4 किलोग्रॅम आहे.

================================================================================

VIDEO : कार्यकर्त्यांना चहा पाजायला 20 रुपये लागतात, मनसेच्या माजी महापौरांची भन्नाट माघारी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 7, 2019 06:10 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...