मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Reliance Industries-Sanmina Corporation मध्ये महत्त्वाचा करार, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणं निर्मितीत 'आत्मनिर्भरते'कडे वाटचाल

Reliance Industries-Sanmina Corporation मध्ये महत्त्वाचा करार, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणं निर्मितीत 'आत्मनिर्भरते'कडे वाटचाल

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) ची संपूर्ण मालकी असलेली उपकंपनी रिलायन्स स्ट्रॅटेजिक बिझनेस व्हेंचर्स लिमिटेडनं  सॅनमिना कॉर्पोरेशनशी (RSBVL-Sanmina Corporation) करार केला आहे

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) ची संपूर्ण मालकी असलेली उपकंपनी रिलायन्स स्ट्रॅटेजिक बिझनेस व्हेंचर्स लिमिटेडनं सॅनमिना कॉर्पोरेशनशी (RSBVL-Sanmina Corporation) करार केला आहे

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) ची संपूर्ण मालकी असलेली उपकंपनी रिलायन्स स्ट्रॅटेजिक बिझनेस व्हेंचर्स लिमिटेडनं सॅनमिना कॉर्पोरेशनशी (RSBVL-Sanmina Corporation) करार केला आहे

मुंबई, 03 मार्च: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) ची संपूर्ण मालकी असलेली उपकंपनी रिलायन्स स्ट्रॅटेजिक बिझनेस व्हेंचर्स लिमिटेडनं  सॅनमिना कॉर्पोरेशनशी (RSBVL-Sanmina Corporation) करार केला आहे. भारतात जागतिक दर्जाचं इलेक्ट्रॉनिक वस्तू उत्पादन केंद्र उभारण्यासाठी आता या दोघांमध्ये संयुक्त भागीदारीचा (Joint Venture) करार झाला आहे.

या संयुक्त भागीदारीमध्ये RSBVL आपल्याकडे 50.1% शेअर्स ठेवणार आहे तर उर्वरित 49.9% शेअर्स सॅनमिनाकडे राहतील, असं RIL ने 3 मार्च रोजी दाखल केलेल्या अधिकृत कागदपत्रांत म्हटलं आहे. 'RSBVL ही मालकी मुख्यत: सॅनमिनाच्या सध्या भारतात असलेल्या कंपनीमध्ये नवीन शेअर्समध्ये 1,670 कोटी रुपयांची गुंतवणूक करुन मिळवेल, तर सॅनमिना (Sanmina Corporation) त्यांच्या सध्याच्या अस्तिवात असलेल्या उत्पादन व्यवसायात योगदान देईल. या गुंतवणुकीचा परिणाम म्हणजे, निधी वाढण्यासाठी संयुक्त भागीदारीला जवळपस 200 मिलियन डॉलर्स रोखीपेक्षाही जास्त भांडवल मिळू शकेल.'

हे वाचा-2022 मध्ये तुम्ही तुमच्या गुंतवणुकीत अतिरिक्त उत्पन्नाच्या प्रवाहात विविधता कशी

या व्यवहाराची पूर्तता नियामक मंजुरींसह पारंपरिक अटींच्या अधीन असेल. सप्टेंबर 2022 आधीच हा व्यवहार पूर्ण होण्याची अपेक्षा आहे असं RIL च्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे.

'भारतात उच्च तंत्रज्ञान उत्पादनासाठी भारतातील मार्केटमध्ये संधीसाठी सॅनमिनासोबत काम करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. आपण नवीन डिजिटल अर्थव्यवस्थेच्या मार्गावर जात असताना, प्रगती आणि सुरक्षेच्या दृष्टीने भारताला टेलिकॉम, आयटी, डेटा सेंटर्स, क्लाउड , 5G, न्यू एनर्जी आणि अन्य उद्योगक्षेत्रांमध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या उत्पादनात जास्तीत जास्त स्वयंपूर्ण होण्याची आवश्यकता आहे, ' असं रिलायन्स जिओचे (Reliance Jio) संचालक आकाश अंबानी (Akash Ambani) म्हणाले. 'भारतीय आणि जागतिक स्तरावरील मागणी पुरवतानाच या भागीदारीच्या माध्यमातून भारतातील संशोधन आणि गुणवत्तेला अधिक संधी देण्याची आमची योजना आहे', असंही ते म्हणाले.

हे वाचा-पीएम मानधन योजनेत सरकार दर महिना देतंय 1800 रुपये? वाचा काय आहे प्रकरण

वाढणाऱ्या बाजारपेठा आणि संपर्कजाल म्हणजेच कम्युनिकेशन नेटवर्किंग (5G, क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर, हायपरस्केल डेटास्केल), वैद्यकीय आणि आरोग्यसेवा, उद्योगक्षेत्र आणि क्लिनटेक आणि संरक्षण आणि अवकाशविज्ञान यांच्यासाठी उच्च तंत्रज्ञान असलेलं हार्डवेअर पुरवणं याला या संयुक्त भागीदारीतून प्राधान्य दिलं जाणार आहे, असं तेलापासून ते टेलिकॉम सर्वच क्षेत्रांत कार्यरत असलेल्या रिलायन्स कंपनीने आपल्या पत्रकात म्हटलं आहे.

संयुक्त भागीदारीमुळे सॅनमिनाच्या सध्याच्या ग्राहकाला पाठिंबा देण्याबरोबरच अत्याधुनिक ‘मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी सेंटर फॉर एक्सलन्स’ही निर्माण करण्यात येणार आहे. हे केंद्र भारतातील उत्पादन विकास आणि हार्डवेअर स्टार्टअप इकोसिस्टीमचे निर्मिती केंद्र म्हणून काम करेल. तसंच सध्याच्या काळातील संशोधन आणि नवकल्पनांना प्रोत्साहनही देण्यात येईल, असंही अधिकृत पत्रकात म्हटलं आहे.

या घोषणेचा परिणाम शेअर मार्केटवर लगेचच दिसून आला. ही घोषणा झाल्यानंतर लगेचच RIL चे शेअर्स 0.32 टक्क्यांनी वाढून BSE मध्ये 2406 प्रति शेअर इतके झाले होते. तर बेंचमार्क सेन्सेक्स 53.52 पॉईंट्सनं किंवा 0.64 टक्क्यांनी वाढून 55,822.42 वर गेला होता.

First published:

Tags: Reliance, Reliance group, Reliance Industries, Reliance Industries Limited