मराठी बातम्या /बातम्या /मनी /

या टेलिकॉम कंपनीत काम करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! 1500 लोकांची नोकरी जाण्याची शक्यता

या टेलिकॉम कंपनीत काम करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! 1500 लोकांची नोकरी जाण्याची शक्यता

टेलिकॉम सेक्टरमधील महत्त्वाची कंपनी वोडाफोन-आयडियामध्ये (Vodafone Idea Telecom Company) सध्या कठीण प्रसंग सुरू आहे.

टेलिकॉम सेक्टरमधील महत्त्वाची कंपनी वोडाफोन-आयडियामध्ये (Vodafone Idea Telecom Company) सध्या कठीण प्रसंग सुरू आहे.

टेलिकॉम सेक्टरमधील महत्त्वाची कंपनी वोडाफोन-आयडियामध्ये (Vodafone Idea Telecom Company) सध्या कठीण प्रसंग सुरू आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar
नवी दिल्ली, 05 ऑगस्ट : टेलिकॉम सेक्टरमधील महत्त्वाची कंपनी वोडाफोन-आयडियामध्ये (Vodafone Idea Telecom Company) सध्या कठीण प्रसंग सुरू आहे. टेलिकॉम उपकरणे बनवणाऱ्या नोकिया, एरिकसॉन, हुवेई आणि झेडटीई (ZTE) यांसारख्या कंपन्यांनी वोडाफोन-आयडियाकडून 4G उपकरणांचा ऑर्डर घेणे  बंद केले आहे. टेलिकॉम उपकरणे बनवणाऱ्या या कंपन्यांचे असे मत आहे की, आर्थिक संकटाशी लढणाऱ्या वोडाफोन-आयडियाकडून त्यांना पैसे मिळण्यामध्ये समस्या येऊ शकतात. यामुळे वोडाफोन-आयडियाचा एक्सपेंशन प्लॅन देखील प्रभावित होत आहे. वोडाफोन-आयडियाचा वापर घटला सर्व्हिसच्या कमतरतेमुळे वोडाफोन-आयडियाचा युजर दिवसेंदिवस कमी होऊ लागला आहे. आर्थिक संकटांचा सामना करणाऱ्या या कंपनीमधून 1500 कर्मचाऱ्यांची कपात केली जाण्याची शक्यता आहे. ET ने यासंदर्भात वृत्त दिले आहे. आर्थिक संकटांचा सामना करणाऱ्या या कंपनीने त्यांचे 22 सर्कलमधील काम 10 सर्कलमध्ये सीमित केले आहे. (हे वाचा-UPSC: पंढरपूरची उंच भरारी, एकाच दमात तालुक्यातून झाले IAS आणि IPS अधिकारी) या प्रकरणाशी संबंधित एका अधिकाऱ्याने ETला दिलेल्या माहितीमध्ये असे म्हटले आहे की, वोडाफोन-आयडिया त्यांचे व्यवहार रिस्ट्रक्चर करण्याच्या प्रयत्नात आहेत. टेलिकॉम उपकरणे बनवणाऱ्या युरोपमधील एका वेंडरने नवीन ऑर्डरआधी सिक्युरिटी स्वरुपात काही रक्कम घेण्याचा निर्णय घेतला. चिनी वेंडरची पेमेंट योजना काहीशी फ्लेक्सिबल होती, मात्र त्यांनी देखील नवीन ऑर्डर घेणे बंद केले आहे. नोकिया आणि एरिकसॉनसारखी युरोपिय कंपनी देखील याप्रकारे सिक्युरिटी पेमेंटची मागणी करत आहे. कोणतीही बँक गॅरंटी देण्यासाठी तयार नाही वोडाफोन-आयडियासाठी हे अत्यंत जोखमीचे काम आहे. नुकतेच वोडाफोन आयडियाने सर्वोच्च न्यायालयाला अशी माहिती दिली होती की, कोणतीही बँक गॅरंटी देण्यासाठी तयार नाही आहे कारण मार्च अखेरपर्यंत त्यांचे कर्ज 1,12,520 कोटी पर्यंत पोहोचले आहे. वोडाफोन आयडियाला सरकारला अजून अॅडजस्टेट ग्रॉस रेव्हेन्यू (AGR) च्या स्वरूपात 50,000 कोटींपेक्षा अधिक रक्कम चुकती करायची आहे
First published:

Tags: Vodafone

पुढील बातम्या