जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Amazon Great Indian Festival: फ्लिपकार्टनंतर अ‍ॅमेझॉननेही बदलली तारीख, एकाच दिवशी दोन्ही प्लॅटफॉर्मवर सुरू होणार सेल

Amazon Great Indian Festival: फ्लिपकार्टनंतर अ‍ॅमेझॉननेही बदलली तारीख, एकाच दिवशी दोन्ही प्लॅटफॉर्मवर सुरू होणार सेल

Amazon Great Indian Festival: फ्लिपकार्टनंतर अ‍ॅमेझॉननेही बदलली तारीख, एकाच दिवशी दोन्ही प्लॅटफॉर्मवर सुरू होणार सेल

दिग्गज ई-कॉमर्स कंपनी असणाऱ्या अ‍ॅमेझॉनने (Amazon Great Indian Festival Date) फेस्टिव्ह सेल ‘ग्रेट इंडियन फेस्टिव्हल’ (Great Indian Festival 2021) च्या तारखांमध्ये बदल केला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 26 सप्टेंबर: दिग्गज ई-कॉमर्स कंपनी असणाऱ्या अ‍ॅमेझॉनने (Amazon Great Indian Festival Date)  फेस्टिव्ह सेल ‘ग्रेट इंडियन फेस्टिव्हल’ (Great Indian Festival 2021) च्या तारखांमध्ये बदल केला आहे. आता हा सेल 4 ऑक्टोबर ऐवजी 3 ऑक्टोबर रोजी सुरू होणार आहे. जवळपास महिनाभर हा सेल सुरू असणार आहे. याआधी कंपनीने 4 ऑक्टोबर रोजी सेल सुरू होईल असे जाही केले होते. दरम्यान वॉलमार्टचा मालकी हक्क असणारी महत्त्वाची ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने (Flipkart Big Billion Days Sale Date change) ने त्यांच्या Big Billion Days सेलच्या तारखेत बदल केला आहे. आता 3 ऑक्टोबरपासून हा सेल सुरू होणार आहे. याआधी सेलची तारीख 7 ऑक्टोबर जाहीर करण्यात आली होती. परंतु आता Flipkart Big Billion Days 7 ऑक्टोबरऐवजी 3 ऑक्टोबरपासून सुरू होणार असून 10 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. त्यामुळे अ‍ॅमेझॉनच्या सेलच्या एक दिवस आधी फ्लिपकार्टचा सेल सुरू होणार असल्याने ई-कॉमर्स विश्वात मोठी चर्चा सुरू झाली होती. पण आता अ‍ॅमेझॉनचा सेल देखील 3 ऑक्टोबर रोजी सुरू होत आहे. हे वाचा- Flipkart Xtra: फेस्टिव्ह सीजनआधी Flipkart मध्ये नोकरीची संधी, 4000 लोकांना मिळेल जॉब महिनाभर चालणाल अ‍ॅमेझॉनचा सेल गेल्यावर्षी प्रमाणे दोन्ही कंपन्यांमध्ये तगडी स्पर्धा पाहायला मिळणार आहे. दरम्यान फ्लिपकार्टचा सेल आठच दिवस आहे तर अ‍ॅमेझॉनचे ‘ग्रेट इंडियन फेस्टिव्हल’ जवळपास महिनाभर असणार आहे. हे वाचा- गुंतवणुकीसाठी व्हा सज्ज! आता ही कंपनी देखील बाजारात IPO आणण्याच्या तयारीत अ‍ॅमेझॉनच्या प्रवक्त्याने अशी माहिती दिली आहे की, ‘आमचे सर्वोच्च प्राधान्य ग्राहकांच्या विश्वासाला आणि विक्रेते खास करून छोटे विक्रेते आणि देशभरातील स्थानिक दुकादारांच्या भल्यासाठी असणार आहे. आम्ही आमचे भागीदार, लघू व्यवसाय आणि ग्राहकांसाठी नवीन प्रयोग करत राहू. आम्ही आगामी फेस्टिव्ह सीझनसाठी तयार आहोत.’ त्यांनी दिलेल्या माहितीनुसार अॅमेझॉन प्राइम सदस्यांना सर्वप्रथम सेलचा लाभ मिळेल. कंपनी लवकरच याबद्दल अधिक माहिती शेअर करणार आहे. Myntra वर देखील आहे फॅशन सेल फ्लिपकार्ट समूहाची कंपनी मिंत्रा देखील 3-10 ऑक्टोबर दरम्यान आपला बिग फॅशन फेस्टिव्हल आयोजित करत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात