जाहिरात
मराठी बातम्या / मनी / कमी भांडवल अधिक नफा; फक्त 50 हजार खर्चून वर्षाला कमवा अडीच लाख रुपये

कमी भांडवल अधिक नफा; फक्त 50 हजार खर्चून वर्षाला कमवा अडीच लाख रुपये

कमी भांडवल अधिक नफा; फक्त 50 हजार खर्चून वर्षाला कमवा अडीच लाख रुपये

तुम्हाला बिझनेस सुरू करायचा आहे पण जास्त भांडवल नाही तर तुमच्यासाठी हा उत्तम असा बिझनेस आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 02 फेब्रुवारी: देशाच्या मातीशी जोडलेले असे अनेक उच्चशिक्षित तरुण आहेत जे शेती व्यवसायाकडे वळले आहेत. चांगल्या पगाराची नोकरी सोडून त्यांनी उत्पन्नाचं साधन म्हणून शेतीकडे पाहिलं आहे. हे तरुण शेतकरी शेतीच्या माध्यमातून लाखो रुपयांचे उत्पादन घेत आहेत. तुम्हाला देखील शेतीची आवड असेल तर अशा पिकाचं उत्पादन घ्या जे भरघोस पैसे मिळवून देतील. यापैकी एक पिक म्हणजे बटन मशरुम (Button Mushroom). आजकाल बटन मशरूमची मागणी खूप वाढली आहे. यामध्ये भरपूर प्रमाणात खजिनं (Minerals) आणि जीवनसत्त्वं (Vitamins) असतात. त्यामुळे याच्या सेवनाकडे लोकांचा कल अधिक आहे. किरकोळ बाजारात बटन मशरूमची किंमत 300 ते 350 रुपये किलो तर घाऊक बाजारात यापेक्षा 40 टक्क्यांनी कमी असते. बटन मशरूमची मोठ्या प्रमाणात मागणी असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पारंपारिक शेती सोडून मशरूमचं उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे.

null

कमीत कमी जागेवर होते मशरुमची शेती प्रति चौरस मीटरमध्ये 10 किलोग्रॅम मशरूमचं आरामात उत्पादन घेतलं जाऊ शकतं. कमीत कमी 40X30 फूटाच्या जागेवर तीन-तीन फूटांचे रुंद रॅक तयार करुन मशरूमची शेती केली जाऊ शकते. 50 हजारांच्या लागवडीवर कमवा 2.50 लाख रुपये बटन मशरूमच्या लागवडीसाठी कंपोस्ट तयार केलं जातं. एक क्विंटल कंपोस्टमध्ये दीड किलो बियाणं लावली जातात. 4 ते 5 कंपोस्ट तयार करून 2 हजार किलो मशरूमचं उत्पादन घेतलं जातं. 2 हजार किलो मशरूम जवळजवळ 150 रुपये किलोच्या हिशोबाने विकले तर 3 लाख रुपये मिळतात. यामधून 50 हजार रुपये लागवडीचा खर्च काढला तर जवळपास अडीच हजार रुपये शेतकऱ्याला उत्पन्न मिळतं. तसं पाहायला गेलं तर मशरुमच्या लागवडीसाठी 50 हजारांपेक्षा कमीच खर्च येतो. कंपोस्ट तयार करण्याची पद्धत कंपोस्ट तयार करण्यासाठी भाताचा पेंढा भिजवावा लागतो. एक दिवसानंतर यामध्ये डीएपी, युरिया, पोटाश, गव्हाचा कोंडा, जिप्सम आणि किटकनाशक कार्बोफ्यूरान मिसळून त्याला सडण्यासाठी ठेवलं जाते. जवळपास दीड महिन्यानंतर कंपोस्ट तयार होतं. आता शेण आणि मातीला समान प्रमाणात एकत्र मिक्स करून दीड इंचाचा जाडा थर लावला जातो. त्यावर कंपोस्टचा दोन ते तीन इंच जाडीचा मोठा थर लावला जातो. यामध्ये ओलावा टिकवून ठेवण्यासाठी स्प्रेच्या सहाय्याने मशरुमवर दिवसामध्ये दोन ते तीन वेळा पाण्याची फवारणी केली जाते. त्यावर पुन्हा एक ते दोन इंच कंपोस्टचा थर लावला जातो. अशापद्धतीने मशरुमचे उत्पादन घेतले जाते. हे वाचा - अचानक वाऱ्याबरोबर उडत आल्या अर्धवट जळलेल्या नोटा! हायवेवर घडलं अजब नाट्य सर्व कृषी विद्यापीठं आणि कृषी संशोधन केंद्रामध्ये मशरूमची शेती कशी करायची याचं प्रशिक्षण दिले जाते. जर तुम्हाला मशरुमची शेती करुन मोठ्या प्रमाणात उत्पादन घ्यायचं असेल तर याठिकाणी जाऊन योग्य प्रकारचे प्रशिक्षण घेतले तर चांगले होईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात