सावधान! देशामध्ये डिजिटल हेरगिरी वाढतेय, जाणून घ्या काय घ्याल खबरदारी

सावधान! देशामध्ये डिजिटल हेरगिरी वाढतेय, जाणून घ्या काय घ्याल खबरदारी

मोबाईल फोन, लॅपटॉप संगणकामध्ये आपली बरीच वैयक्तिक माहिती किंवा पेमेंटसंदर्भातील बरीच महत्वाची माहिती असते. या डेटासंदर्भात हेरगिरी वाढल्याची माहिती समोर येत आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 18 सप्टेंबर : कोरोना व्हायरस (Coronavirus) च्या संकटकाळात ऑनलाइन फसवणुकीची आणि डिजिटल हेरगिरीची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. यामुळेच सरकारने अगदी बँकेच्या व्यवहाराबाबतीत देखील सतर्क राहण्यास सांगितले आहे. ऑनलाइन फसवणूकीमुळे बर्‍याच वेळा तुम्हाला मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. मोबाईल फोन, लॅपटॉप संगणकामध्ये आपली बरीच वैयक्तिक माहिती किंवा पेमेंटसंदर्भातील बरीच महत्वाची माहिती असते. टिकटॉक (TikTok), पबजी (PUBG)आणि इतर चिनी अ‍ॅप्स वापरुन 20 लाखाहून अधिक डेटाबेस चोरी झाल्याचा धक्कादायक दावा सायबर क्राइम इन्व्हेस्टिगेशन एक्सपर्ट अमित मल्होत्रा ​​यांनी केला आहे.

डिजिटल हेरगिरी म्हणजे काय?

डेटाची डिजिटल हेरगिरी तीन प्रकारे होते. इंटरनेटद्वारे पब्लिक डोमेनमधील डेटा , लोकांच्या मोबाईल व संगणकांमधून वेगवेगळ्या अ‍ॅप्समधील डेटा आणि तिसरे म्हणजे मोठ्या कंपन्यांचा डेटाबेस चोरण्यासाठी हेरगिरी केली जाते. मोबाईलमध्ये असलेल्या अ‍ॅपमध्ये बर्‍याच वेळा तुमचा डेटा असतो आणि तो डेटा थर्ड पार्टीपर्यंतही पोहोचतो.

(हे वाचा-SBI ATM मधून 10000 रु. पेक्षा अधिक रक्कम काढण्याचा नियम बदलला, वाचा सविस्तर)

डिजिटल हेरगिरीपासून कसे वाचाल?

अनोळखी मेलमधून आलेली कोणतीही अॅटचमेंट उघडू नका. एखादी लिंक ओपन करण्याआधी त्याची URL ठीक आहे का ते तपासा. इनक्रिप्टेड मेलच पाठवा किंवा लिहा. संशयास्पद मेल असेल तर तो लगेच ब्लॉक करा. जर तुमच्या मेल आयडीवर फ्री कोव्हिड-19 टेस्टिंगचा मेल असेल तर तुमचा डेटा हॅक होऊ शकतो. याप्रकराचा मेल उघडू नका. मोबाइलवर कोणतेही App डाऊनलोड करण्याधी त्या App करता आवश्यक नसणाऱ्या permission रद्द करा. तुम्ही दोन मोबाइल आयडी वापरू शकता. बँक कम्यूनिकेशन असणारा मेल आयडी मोबाइलशी कनेक्ट करू नका.

10000 पेक्षा अधिक महत्त्वाच्या व्यक्तींच्या डेटाची झाली चोरी

नुकतेच समोर आलेल्या एका अहवालानुसार चीनकडून भारतातील 10,000 पेक्षा जास्त महत्त्वाच्या व्यक्तींची हेरगिरी सुरू आहे. ही हेरगिरी चीनच्या शेनजेन (Shenzen) स्थित जेनहुआ (Zhenhua) या डेटा इन्फरमेशन टेक कंपनीकडून केली जात आहे.

(हे वाचा-कोरोनामुळे नोकरी गेलेल्यांना आता 30 जून 2021 पर्यंत मिळणार या योजनेचा फायदा)

ही कंपनीचे चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीशी संबंध आहेत. ज्या चिनी कंपनीच्या माध्यमातून ही हेरगिरी केली जात आहे, ती कंपनी भारतात रिअल टाइम सर्व्हिलान्स मोठ्या प्रमाणात करण्यासाठी प्रसिद्ध आहे. यामुळे भारतासमोर हे हेरगिरी रोखण्याचे मोठे आव्हान आहे.

Published by: Janhavi Bhatkar
First published: September 18, 2020, 12:31 PM IST

ताज्या बातम्या