ग्राहकांच्या सुरक्षेसाठी एसबीआयची आणखी एक महत्त्वाची योजना आजपासून सुरू होत आहे. 18 सप्टेंबरपासून जर तुम्हाला एसबीआय एटीएमधून 10 हजार किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम काढायची असेल तर तुमच्या रजिस्टर्ड नंबरवर आलेला ओटीपी द्यावा लागेल
रात्रीच्या वेळी एटीएममधून पैसे काढताना अनेकदा ग्राहकांना फसवणुकीला सामोरे जावे लागते. अशावेळी एटीएम फसवणुकीपासून (ATM Fraud) वाचण्यासाठी देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने ग्राहकांसाठी ओटीपी आधारित टीएम विड्रॉल (SBI OTP Based ATM Withdrawal) सुविधा 1 जानेवारी 2020 पासून सुरू केली होती.
याअंतर्गत रात्री 8 ते सकाळी 8 वाजेपर्यंत जर तुम्ही 10 हजार किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम काढणार असाल तर ओटीपी (OTP) द्यावा लागत होता.
आता ही सुविधा संपूर्ण दिवसभरामध्ये 10 हजार किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम काढण्यासाठी करण्यात आली आहे. आजपासून हा नियम लागू होईल.
याचा अर्थ असा की 24x7 ओटीपी-आधारित एटीएम विड्रॉल असणार आहे. या सुविधेमुळे एसबीआय एटीएममधून पैसे काढणे अधिक सुरक्षित होईल.
यामुळे एसबीआय डेबिटकार्डधारक ग्राहक फसवणूक, अनधिकृतपणे पैसे काढणे, कार्ड स्किमिंग, कार्ड क्लोनिंग आणि अन्य फसवणुकीपासून वाचू शकतात.
एसबीआय एटीएममध्ये ही सुविधा मिळेल. दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून पैसे तुम्ही नेहमीप्रमाणे काढू शकता. एसबीआय एटीएममधून 10 हजार किंवा त्यापेक्षा जास्त पैसे काढण्यासाठी तुमच्या रजिस्टर्ड मोबाइलवर ओटीपी येईल.
एकदा ग्राहकांनी एटीएममध्ये पैसे काढण्याची रक्कम प्रविष्ट केली की एटीएम स्क्रीन ओटीपी विचारेल. जिथे तुम्हाला नोंदणीकृत मोबाइल नंबरवर आलेला ओटीपी टाकावा लागेल.
एसबीआय एटीएममधून रक्कम काढण्यासाठी ग्राहकांना पिन क्रमांकासह ओटीपी द्यावा लागेल. हा ओटीपी एसबीआयमार्फत त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर पाठवला जाईल.
एसबीआयने ही सुविधा सुरू केली आहे जेणेकरून एसबीआय डेबिट कार्ड धारकांना कोणत्याही संभाव्य स्किमिंग किंवा कार्ड क्लोनिंगपासून संरक्षण मिळू शकेल. अशा प्रकारे, ते फसवणूकीपासून वाचू शकतील