मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Akshaya Tritiya 2021: प्रत्यक्ष सोनं विकत घेणं चांगलं की डिजीटल gold, ETF? त्यावर कसा आकारला जातो कर?

Akshaya Tritiya 2021: प्रत्यक्ष सोनं विकत घेणं चांगलं की डिजीटल gold, ETF? त्यावर कसा आकारला जातो कर?

अक्षय तृतीयेच्या निमित्ताने सोनं खरेदी करण्याची परंपरा आपल्या देशात आहे. सोन्यात गुंतवणूक चांगली असं सल्लागार सांगतात. पण ती कशी? प्रत्यक्ष सोनं घ्यावं की Gold bond आणि ETF? काय असेल फायद्याचं?

अक्षय तृतीयेच्या निमित्ताने सोनं खरेदी करण्याची परंपरा आपल्या देशात आहे. सोन्यात गुंतवणूक चांगली असं सल्लागार सांगतात. पण ती कशी? प्रत्यक्ष सोनं घ्यावं की Gold bond आणि ETF? काय असेल फायद्याचं?

अक्षय तृतीयेच्या निमित्ताने सोनं खरेदी करण्याची परंपरा आपल्या देशात आहे. सोन्यात गुंतवणूक चांगली असं सल्लागार सांगतात. पण ती कशी? प्रत्यक्ष सोनं घ्यावं की Gold bond आणि ETF? काय असेल फायद्याचं?

मुंबई, 13 मे: आपल्या देशात (culture of gold in India) शुभमुहूर्तावर खरेदी करण्याची परंपरा आहे. त्यासाठी दसरा, गुढीपाडवा, अक्षय्य तृतीया (Akshaya Tritiya 2021) हे पूर्ण तर दिवाळीतील पाडवा हा अर्धा असे साडे तीन शुभमुहूर्त प्रसिद्ध आहेत. या मुहूर्तावर सोनं खरेदी करण्याची पूर्वापार परंपरा आहे. तसंच भारतीय मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये सोनं ही सुरक्षित मालमत्ता किंवा गुंतवणूक मानली जाते. त्यामुळं आजही लोक आवर्जून या शुभमूहूर्तावर सोनं खरेदी करतात.

या काळात सोन्याची मागणी वाढते. पूर्वी सोनं फक्त दागिने किंवा नाणी, वळी किंवा बिस्कीट या स्वरूपात येत असे. आता ते डिजिटल स्वरूपातही मिळते. त्यामुळे सुरक्षित ठेवण्याची जोखीम कमी होते आणि व्यवहार करणंही सोपं होतं. तसंच सरकारनं आता सुवर्णरोखेही आणले आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष सोनं घेऊन ते लॉकरमध्ये नुसतं ठेवण्यापेक्षा तेच पैसे सुवर्ण रोख्यात गुंतवून त्यावर व्याजही मिळतं आणि सांभाळण्याच्या जोखामीतूनही सुटका होते. अर्थात सोन्याच्या या सर्व गुंतवणुकीवर कर द्यावा लागतो. त्यामुळंअक्षय्य तृतीयेच्या (Akshaya Tritiya 2021) मुहूर्तावर सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर त्यावर किती कर असतो याची माहिती घेणं महत्त्वाचं ठरेल.

प्रत्यक्ष सोन्यातील गुंतवणूक

फिजिकल स्वरूपातीलम्हणजे प्रत्यक्ष स्वरूपातील सोने (Physical Gold) खरेदी करणेहा सोन्याच्या गुंतवणूकीचा सर्वात लोकप्रिय प्रकार आहे. दागदागिने असो किंवा सोन्याची नाणी, बिस्कीट अशा कोणत्याही स्वरूपातील सोनं खरेदी करताना त्यावर 3 टक्के GST अर्थात वस्तू व सेवा कर (GST on Gold) आकारला जातो. तीन वर्षापेक्षा कमी कालावधीत अशा स्वरूपातील सोनं विकल्यास त्यावरअल्प-मुदत भांडवलकर आकाराला जातो.  ‘तीन वर्षापेक्षा जास्त काळ सोनं ठेवलं असेल आणि त्या नंतर ते विकल्यास त्यावर 20 टक्केदीर्घ मुदतीसाठी भांडवली नफा करआणि 4 टक्केअधिभार आकारला जाऊ शकतो,’ असं एम.व्ही. किणी लॉ फर्मचे प्रिन्सिपल असोसिएट प्रतीक गोयल यांनी सांगितलं.

डिजिटल गोल्ड /सोनं :

प्रत्यक्ष सोन्यात गुंतवणूक केली कीनेहमीच त्याची वैधता,साठवणअसे प्रश्न असतात. कोविड साथीच्या काळात सोनं खरेदीकडे लोकांचा कल वाढला आहे. गुंतवणूकदार घरी बसून सुवर्ण रोखे, गोल्ड म्युच्युअल फंड्स आणि गोल्ड ईटीएफद्वारेयातगुंतवणूक करू शकतात, असं इनक्रेड वेल्थमधील गुंतवणूक विभागाचे प्रमुख योगेश काळवाणी यांनी सांगितलं. पेटीएम, अॅमेझॉन पे, गुगल पे आणि फोन पे यालोकप्रिय डिजिटल वॉलेटद्वारेही गुंतवणूकदार डिजिटल स्वरूपातील सोनं खरेदी करू शकतात.

सुवर्णसंधी! अक्षय तृतीयेला घरबसल्या खरेदी करा स्वस्त सोनं, तपासा काय आहेत ऑफर्स

कर आकारणीच्या बाबतीत डिजिटल स्वरूपातील सोन्यासाठीही प्रत्यक्ष स्वरूपातील सोन्याप्रमाणेच कर आकारणी केली जाते, असं प्रतीक गोयल यांनी सांगितलं.डिजिटल सोन्याच्या खरेदीतही किंमतीवर 3 टक्के जीएसटी आकारला जाईल.

गोल्ड ईटीएफ आणि सुवर्ण रोखे :

गेल्या काही वर्षांत गुंतवणूकदारांमध्ये गोल्ड ईटीएफ (Gold ETF)आणि सुवर्ण रोखे (Sovereign Gold Bonds) हे प्रकारही लोकप्रिय झाले आहेत. म्युच्युअल फंडाच्या परताव्यावर (Mutual Fund Return) आणि गोल्ड ईटीएफवर समान पद्धतीनंच कर आकारणी केली जाते. ‘तीन वर्षांहून अधिक काळ ठेवलेल्या गोल्ड ईटीएफवर दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यावरील कर आकारला जातो. तर अल्प मुदतीकरता ही गुंतवणूक केली असेल तर त्यावरील नफा त्या व्यक्तीच्या निव्वळ करपात्र उत्पन्नामध्ये ग्राह्य धरला जातो,असं काळवाणी यांनी सांगितलं.

पैसे कमावण्याचे 10 मार्ग, घरबसल्या मिळतील 50 हजार ते 1 लाख रुपये

सुवर्ण रोख्यांच्या परताव्यावर मात्र वेगळ्या पद्धतीनं कर आकारणी केली जाते. यातील गुंतवणूकीवरील व्याज हे इतर स्रोतांकडून मिळणारे उत्पन्न समजले जाते आणि प्राप्ती कराच्या रचनेनुसार स्लॅब दरानुसार कर आकारला जातो, मात्र आठ वर्षाच्या मुदतपूर्तीनंतर यावर मिळणारा परतावापूर्णपणे करमुक्त असतो. यातील गुंतवणूक पाच वर्षानंतर काढून घेतली तर त्यावर दीर्घकालीन भांडवली नफ्यावरील 20 टक्के कर आणि 4 टक्के अधिभार आकारला जातो,’ अशी माहिती प्रतीक गोयल यांनी दिली.

‘सोन्याच्या डेरिव्हेटिव्ह्जमधील गुंतवणूकीतून मिळणारे उत्पन्न हे व्यावसायिक उत्पन्न मानले जाऊ शकते. या व्यवसायाची एकूण वार्षिक उलाढाल 2 कोटींपेक्षा कमी असेल तर 6 टक्के उलाढाल कर आकाराला जाईल, असंही गोयल यांनी स्पष्ट केलं.

First published:

Tags: Akshaya tritiya, Gold, Gold and silver