मराठी बातम्या /बातम्या /मनी /

सुवर्णसंधी! अक्षय तृतीयेला घरबसल्या खरेदी करा स्वस्त सोनं, तपासा काय आहेत ऑफर्स

सुवर्णसंधी! अक्षय तृतीयेला घरबसल्या खरेदी करा स्वस्त सोनं, तपासा काय आहेत ऑफर्स

यावर्षी 14 मे रोजी अक्षय तृतीया आहे, मात्र अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन असल्याने याहीवर्षी सोनेखरेदी मंदावली आहे. अनेकांना बाहेर जाऊन सोनेखरेदी शक्य नसली तरीही ऑनलाइन सोनेखरेदी (Buying Gold Online) करता येणार आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 13 मे: भारतामध्ये सोनेखरेदीला विशेष महत्त्व आहे. सणासुदीच्या काळात सोनेखरेदी केली जाते. अक्षय तृतीया या साडेतीन मुहूर्तापैकी एक असणाऱ्या सणाच्या दिवशी तर सोनेखरेदी (Buying Gold on Akshay Tritiya) शुभ मानली जाते. यावर्षी 14 मे रोजी अक्षय तृतीया आहे, मात्र अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन असल्याने याहीवर्षी सोनेखरेदी मंदावली आहे. अनेकांना बाहेर जाऊन सोनेखरेदी शक्य नसली तरीही ऑनलाइन सोनेखरेदी (Buying Gold Online) करता येणार आहे. अनेक ज्वेलर्स ही ऑफर देत आहेत.

काय आहेत सोन्याचे भाव?

तसं पाहिलं गेलं तर अक्षय तृतीयेच्या (Akshay Tritiya 2021) आधी सोन्यावर दबाव आहे. मंगळवारी देखील सोन्याच्या किंमती (Gold Rates) घसरल्या होत्या, तर बुधवारी देखील सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं दिसलं होतं. सध्या दिल्लीमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा 46,110 रुपये आहे आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 50,110 रुपये आहे. तर मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याचे दर 44,920 रुपये प्रति तोळा आणि 24 कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळा 45,920 रुपये आहेत. दिल्लीमध्ये चांदीचे दर प्रति किलो 71,500 रुपये आहेत.

हे वाचा-या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना कोरोना काळात दिलासा, 6 महिन्यात 2 वेळा वाढला पगार

यावेळी अक्षय तृतीयेला प्रत्यक्ष दुकानात जाऊन जरी तुम्हाला सोनं खरेदी करता येणार नसलं तरी तुम्ही ऑनलाइन सोनं खरेदी करू शकता. अनेक मोठ्या कंपन्या ऑनलाइन विक्री करत आहेत. त्याशिवाय ग्राहकांसाठी त्यांनी काही खास ऑफर्सही आणल्या आहेत.

काय आहेत ऑफर्स?

टाटा ग्रुपच्या प्रसिद्ध तनिष्क या ज्वेलरी ब्रँडकडून तुम्ही ऑनलाइन दागिने खरेदी करू शकता. यावेळी अक्षय तृतीयेला तुम्हाला सोनं आणि डायमंड ज्वेलरीच्या घडणावळीवर (Making Charges) 25 टक्क्यापर्यंत डिस्काउंट मिळेल. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्ही www.tanishq.co.in या वेबसाइटला भेट देऊ शकता. याशिवाय आणखी एक मोठं ज्वेलर्समधील नाव म्हणडे कल्याण ज्लेलर्स. त्यांच्या वेबसाइटवर तुम्ही सोनेखरेदी करू शकता. अक्षय तृतीयेनिमित्त कल्याण ज्वेलर्स 15 हजारांपेक्षा अधिक किंमतीचे दागिने खरेदी केल्यानंतर आणि बँक कार्ड्सद्वारे पेमेंट केल्यानंतर 5 टक्के सूट देत आहेत.

First published:

Tags: Gold