मराठी बातम्या /बातम्या /मनी /

पैसे कमावण्याचे 10 मार्ग, घरबसल्या मिळतील 50 हजार ते 1 लाख रुपये

पैसे कमावण्याचे 10 मार्ग, घरबसल्या मिळतील 50 हजार ते 1 लाख रुपये

तुम्हालाही स्वतंत्र व्यवसाय (Business) करायचा असेल विशेषत: घरबसल्या करता येण्याजोगा काही व्यवसाय करायचा असेल तर आम्ही तुम्हाला दहा असे व्यवसाय सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही दरमहा लाखो रुपये कमावू शकता.

तुम्हालाही स्वतंत्र व्यवसाय (Business) करायचा असेल विशेषत: घरबसल्या करता येण्याजोगा काही व्यवसाय करायचा असेल तर आम्ही तुम्हाला दहा असे व्यवसाय सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही दरमहा लाखो रुपये कमावू शकता.

तुम्हालाही स्वतंत्र व्यवसाय (Business) करायचा असेल विशेषत: घरबसल्या करता येण्याजोगा काही व्यवसाय करायचा असेल तर आम्ही तुम्हाला दहा असे व्यवसाय सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही दरमहा लाखो रुपये कमावू शकता.

नवी दिल्ली, 12 मे: लॉकडाऊन काळात (Coronavirus Lockdown) नोकऱ्या गेल्याने अनेकांनी स्वतंत्र व्यवसाय करण्याचा पर्याय निवडला आहे. ऑनलाइन स्कील्स, सोशल मीडिया, टेक्नॉलॉजी वापरून काहींनी यात नफाही कमावला आहे. तुम्हालाही स्वतंत्र व्यवसाय (Business) करायचा असेल विशेषत: घरबसल्या करता येण्याजोगा काही व्यवसाय करायचा असेल तर आम्ही तुम्हाला दहा असे व्यवसाय सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही दरमहा लाखो रुपये कमावू शकता. सुरुवातीला यात तुम्ही 50 हजार किंवा एक लाख रुपये भांडवल गुंतवून हे व्यवसाय सुरू करू शकता. विशेष म्हणजे या सर्व व्यवसायांसाठी आपल्याला कोणत्याही विशेष किंवा तांत्रिक ज्ञानाची आवश्यकता नाही.

हे आहेत हे दहा व्यवसाय :

1.दुधाचा व्यवसाय:

तुमच्याकडे गाय किंवा म्हैस असल्यास तुम्ही दुधाचा व्यवसाय (Milk Production) सुरू करू शकता. गाय, म्हैस नसेल तर विकत घेऊन असा व्यवसाय करू शकता. साधारण 30 हजार रुपये किंमतीत गायतर 50 ते 60 हजार रुपयांपर्यंत म्हैस मिळू शकते. एक किंवा दोन गायी, म्हशी घेऊन तुम्ही हा व्यवसाय करू शकता. यामध्ये तुम्ही दुग्ध विक्रीसाठी कंपन्यांशी करारही करू शकता.

2. फुलांचा व्यवसाय:

तुम्ही फुलांचा (Flowers) व्यवसाय देखील सुरू करू शकता. आजच्या काळात लग्नापासून ते अगदी छोट्या कार्यक्रमांमध्येही फुलांची गरज भासते. चांगल्या फुलांना नेहमीच मोठी मागणी असते. ऑनलाइन फुलं विक्रीही करता येते. सूर्यफूल, गुलाब, झेंडूची लागवड खूपच फायदेशीर ठरेल.

हे वाचा-निवडणुका संपल्या की इंधन दरवाढ ठरलेलीच, जयंत पाटलांचा अर्थमंत्र्यांना टोला

3.झाडे लावून पैसे मिळवा:

तुमच्याकडे जमीन असल्यास तुम्ही शीसव, सागवान अशी मौल्यवान झाडे (Tree Plantation) लावू शकता. ही झाडे 8 ते 10 वर्षानंतर आपल्याला चांगली कमाई करून देतात. आजच्या काळात शीसवचं झाड 40 हजारांपर्यंत विकले जाते, तर सागवानचे झाड त्यापेक्षा अधिक महाग आहे.

4.मध व्यवसाय:

मधमाश्या (Honey Bee) पालनाचा व्यवसाय देखील चांगला फायदा देणारा आहे. केवळ एक ते दीड लाख रुपये खर्च करून तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता, यासाठी थोड्या प्रशिक्षणाची गरज आहे.

5.भाजीपाला लागवड:

भाजीपाला (Vegetable Farming) पिकवूनही तुम्ही चांगले उत्पन्न मिळवू शकता. यासाठी खूप मोठ्या जागेची देखील आवश्यकता नाही. या प्रकारच्या शेतीसाठी शासनाकडूनही मदत दिली जाते.या शेतीत तुम्ही उत्तम कमाई करू शकता.

हे वाचा-आताच करा चांदीमध्ये गुंतवणूक, सोन्यापेक्षा मिळेल अधिक फायदा; वाचा कसा होईल नफा

6.पोल्ट्री व्यवसाय:

कुक्कुटपालन (Poultry Farm) व्यवसायही अतिशय फायदेशीर असून यासाठी थोडी गुंतवणूक करावी लागते. सध्या मुद्रा कर्ज योजनेद्वारे सरकारकडूनही याकरता कर्ज दिले जाते. अंडी आणि कोंबड्या विक्रीतून चांगला फायदा मिळतो.

7.बांबू लागवड:

बांबू लागवडीद्वारेही (Cane Farming) तुम्ही चांगली कमाई करू शकता. आजच्या काळात पर्यावरणपूरक उत्पादनांना मागणी वाढत असल्यानं बांबू उत्पादनांनाही खूप मागणी असते. ऑनलाइन साइट तयार करुन तुम्ही बांबूपासून बनवलेली विविध उत्पादनं विकू शकता. याद्वारे घरबसल्या चांगली कमाई होऊ शकते.

8.मशरूम लागवड:

तुम्ही तुमच्या घराभोवतीच्या बागेतच मशरूमची लागवड (Mushroom Cultivation) करू शकता. अगदी कमी गुंतवणूक आणि कमी मेहनतीत या व्यवसायातून तुम्ही दरमहा 50 हजारांपर्यंत आरामात कमाई करू शकता.

9.मत्स्य व्यवसाय:

मत्स्य पालनाचा (Fish Farming) व्यवसाय आपल्याला लाखो रुपयांची कमाई करून देऊ शकतो.

10. कोरफडीची लागवड :

कोरफडीची लागवड करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. केवळ 10 हजार रुपये खर्च करून सुमारे 2500 रोपे लावू शकता. ही झाडे विकून किंवा कोरफड जेल (Alovera Gel) बनवूनही चांगले पैसे कमवू शकता.

First published:

Tags: Business News, Small business