जाहिरात
मराठी बातम्या / मनी / मोदी सरकारला गुंतवणूकदार मिळाला नाही तर Air India 6 महिन्यात होणार बंद

मोदी सरकारला गुंतवणूकदार मिळाला नाही तर Air India 6 महिन्यात होणार बंद

मोदी सरकारला गुंतवणूकदार मिळाला नाही तर Air India 6 महिन्यात होणार बंद

येत्या वर्षाच्या जून महिन्यापर्यंत एअर इंडिया विकत घेण्याची कुणाचीही तयारी नसेल तर मोदी सरकारला एअर इंडिया बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागेल. एअर इंडियाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, ‘एअर इंडिया’वर मोठं कर्ज आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 30 डिसेंबर : येत्या वर्षाच्या जून महिन्यापर्यंत एअर इंडिया विकत घेण्याची कुणाचीही तयारी नसेल तर मोदी सरकारला एअर इंडिया बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागेल. एअर इंडियाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, ‘एअर इंडिया’वर मोठं कर्ज आहे. त्यामुळे या एअरलाइन कंपनीवर संकट ओढवलंय. निधीच्या अभावी एअर इंडिया चालवणंही कठीण झालं आहे. 60 हजार कोटींचं कर्ज एअर इंडियाच्या भवितव्यावर यामुळे चांगलीच टांगती तलवार आहे. सध्या 12 छोटी विमानं सुरू करण्यासाठीही आणखी निधीची आवश्यकता आहे. या सरकारी विमान कंपनीवर 60 हजार कोटींचं कर्ज आहे आणि सरकारने एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीची तयारी सुरू केली आहे. एअर इंडियाच्या खराब आर्थिक स्थितीबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं की, येत्या वर्षातल्या जून महिन्यात एअर इंडिया विकत घेणारं कुणी मिळालं नाही तर एअर इंडियाची अवस्थाही जेट एअरवेजसारखीच होईल. सरकार एअर इंडियाला अतिरिक्त निधी देऊ शकत नाही, असं सरकारने आधीच स्पष्ट केलं आहे. 2011 - 12 या आर्थिक वर्षापासून ते आतापर्यंत सरकारने एअर इंडियाला 30 हजार 520.21 कोटी रुपयांची निधी दिला आहे. (हेही वाचा : नव्या वर्षाच्या पहिल्या महिन्यात 16 दिवस बँका बंद, लवकर करून घ्या तुमची कामं) गुंतवणूकदार मिळण्याची शक्यता कमी एअर इंडिया विकत घेण्याची तयारी कुणी दाखवली तरी सगळे आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी कमीत कमी 6 महिने लागतील, असंही या अधिकाऱ्याने सांगितलं. असं असलं तरी एअऱ इंडियाची आर्थिक स्थिती ढासळली असल्याने गुंतवणूकदार मिळण्याची चिन्हं कमी आहेत, असंही या अधिकाऱ्याचं म्हणणं आहे. आम्ही सॉव्हरिन गॅरंटी फंडच्या माध्यमातून एअर इंडियासाठी 2400 कोटी रुपये जमवण्याची मागणी केली होती. या रकमेतून एअरलाइन कंपनी चालवण्यासाठीचा खर्च निघणार होता पण सरकारने 500 कोटी रुपयांचीच मंजुरी दिली होती,असंही या अधिकाऱ्याने म्हटलं आहे.

(हेही वाचा : मोदी सरकारची कर्मचाऱ्यांना नव्या वर्षाची भेट, 10 हजार रुपयांपर्यंत वाढणार पगार)

जेट एअरवेज पडली बंद एअर इंडिया गेली काही वर्षं आर्थिक संकटाला तोंड देते आहे. याआधीच जेट एअरवेज ही कंपनीही हालाखीच्या आर्थिक स्थितीमुळे बंद पडली आणि हजारो कर्मचारी बेकार झाले. आता एअर इंडिया बंद पडली तर या एअरलाइनच्या कर्मचाऱ्यांवरही बेकारीची टांगती तलवार आहे. ===========================================================================================

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात