जाहिरात
मराठी बातम्या / मनी / मोदी सरकार कर्मचाऱ्यांना देणार नव्या वर्षाची भेट,10 हजार रुपयांपर्यंत वाढणार पगार

मोदी सरकार कर्मचाऱ्यांना देणार नव्या वर्षाची भेट,10 हजार रुपयांपर्यंत वाढणार पगार

मोदी सरकार कर्मचाऱ्यांना देणार नव्या वर्षाची भेट,10 हजार रुपयांपर्यंत वाढणार पगार

नव्या वर्षाच्या मुहूर्तावर केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा आनंद दुप्पट होणार आहे. मोदी सरकार या कर्मचाऱ्यांना मोठी भेट देणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 30 डिसेंबर : नव्या वर्षाच्या मुहूर्तावर केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा आनंद दुप्पट होणार आहे. मोदी सरकार या कर्मचाऱ्यांना मोठी भेट देणार आहे. मोदी सरकार जानेवारीपासून कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांचा पगार 10 हजार रुपयांनी वाढेल. या निर्णयाचा 50 लाख कर्मचाऱ्यांना फायदा होईल. त्याचेवळी 62 लाख पेन्शनधारकांनाही याचा लाभ मिळेल. 4 टक्क्यांनी वाढणार महागाई भत्ता ‘झी बिझनेस’ ने दिलेल्या वृत्तानुसार केंद्र सरकार जानेवारी ते जून 2020 या काळात कर्मचाऱ्यांच्या महाभाई भत्त्यात 4 टक्के वाढ करू शकतं. महागाई भत्त्यात वाढ केल्यानंतर केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा पगार 720 रुपयांपासून 10 हजार रुपयांपर्यंत वाढेल. एका वर्षात केंद्र सरकार दोन वेळा कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करू शकतं. आता 17 टक्के मिळणार महागाई भत्ता सध्याच्या काळात केंद्रीय कर्मचाऱ्यांना 17 टक्के महागाई भत्ता मिळतो. मोदी सरकारने यात 4 टक्क्यांची वाढ केली तर हा भत्ता 21 टक्के होईल. (हेही वाचा :  SBI ग्राहकांसाठी मोठी बातमी, 1 जानेवारीपासून ATM संदर्भातील नवा नियम लागू) वेतनवाढीबदद्ल सरकारचं स्पष्टीकरण अर्थ मंत्रालयाने केंद्रीय कर्मचाऱ्यांची बढती आणि वेतनवाढीबद्दल एक नियम जारी केला आहे. या नियमानुसार कर्मचाऱ्यांच्या 1 जानेवारी किंवा 1 जुलैच्या नेमणुकीवर वेतनवाढ करायची आहे. याच नियमानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना बढती आणि वेतनवाढीची सुविधा मिळते. केद्रीय कर्मचाऱ्यांना या नियमानुसार वेतनवाढ मिळाली तर नव्या वर्षाची ही सगळ्यात मोठी भेट असणार आहे. =======================================================================================

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात