मुंबई, 30 जानेवारी : 2020 च्या नव्या वर्षात पहिल्याच जानेवारी महिन्यात एकूण 16 दिवस बँका बंद राहणार आहेत. रिझर्व्ह बँकेने बँकांच्या राज्यवार सुट्या जाहीर केल्या आहेत. बँका नेहमीच रविवारी आणि महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद असतात. त्यामुळे या सुट्यांमध्ये याचाही समावेश करण्यात आला आहे.यावर्षी 26 जानेवारी रविवारी आल्यामुळे ती राष्ट्रीय स्तरावरची सुटी नसेल. नाहीतर बँकांच्या सुट्यांमध्ये आणखी एक भर पडली असती. अशा असतील सुट्या 1 जानेवारीचा नव्या वर्षाचा पहिला दिवस, 2 जानेवारीला गुरु गोविंद सिंग यांची जयंती, 14 जानेवारीची मकर सक्रांत अशा सुट्यांचा या सुट्यांमध्ये समावेश आहे. 23 जानेवारीला सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्तही बँका बंद असतील. वेगवेगळ्या कारणांमुळे बँकांना या महिन्यात 10 दिवस सुट्या आहेत. त्यामुळे तुमची बँकेची कामं उद्या मंगळवारच्या दिवशीच निपटून घ्या. सरत्या वर्षाला निरोप आणि उगवत्या वर्षाचं स्वागत यामुळे सगळीकडे सेलिब्रेशनचं वातावरण आहे. सुट्यांचा हंगाम असल्यामुळे ATM सेंटर्सवरही रीघ असेल. त्यातच बँकांना सुट्या असल्यामुळे तिथेही मोठी गर्दी असणार आहे. त्यामुळे आर्थिक कामं लवकर करून घ्यावी लागतील. ATM बद्दल बदलणार नियम देशातील सर्वात मोठी सरकारी बँक म्हणून एसबीआय ओळखली जाते. आयसीआयसीआय नंतर आता SBI बँकेनं ATMबाबत नवीन नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नव्या नियमानुसार तुम्हाला जर रात्री 8 ते सकाळी 8 म्हणजेच या 12 तासांत केव्हाही पैसे एटीएमद्वारे काढायचे असतील तर तुमच्या बँकेत रजिस्टर केलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP पासवर्ड येईल. पासवर्ड एकदाच वापरा हा पासवर्ड तुम्ही एकदाच वापरू शकता. हा ओटीपी तुम्हाला टाकून तुमच्या खात्यातून पैसे काढता येऊ शकतात. हा नियम 10 हजार रुपयांपेक्षा अधिक पैसे काढणाऱ्यांसाठी बंधनकारक असणार आहे. याची अंमलबजावणी 1 जानेवारी 2020 पासून करण्यात येणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे. =============================================================================================
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.