Home /News /money /

सरकारी पेन्शन योजनेत होणार मोठे बदल, करमुक्तीसोबत हेही फायदे

सरकारी पेन्शन योजनेत होणार मोठे बदल, करमुक्तीसोबत हेही फायदे

सरकारी पेन्शन स्कीम म्हणजेच NPS मध्ये मोठे बदल करण्याची तयारी सरकारने केली आहे. CNBC आवाजच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार NPS मध्ये 1 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करमुक्त केली जाऊ शकते.

    नवी दिल्ली, 1 जानेवारी : सरकारी पेन्शन स्कीम म्हणजेच NPS मध्ये मोठे बदल करण्याची तयारी सरकारने केली आहे. CNBC आवाजच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार NPS मध्ये 1 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करमुक्त केली जाऊ शकते.NPS योजना आकर्षक बनवण्यासाठी सरकार विड्रॉल आणि कॉर्पोरेट बाँड्समध्ये गुंतवणूक करण्याबदद्लचे नियम शिथिल करण्याचा विचार करतंय. NPS ही सरकारची फ्लॅगशिप योजना आहे. या योजनेत सरकार आणखी काही बदल करणार आहे. यामध्ये सिस्टिमॅटिक विड्रॉल प्लॅन (SWP)चा प्रस्ताव मान्य केला जाऊ शकतो. यानुसार, योजनेच्या मॅच्युरिटीच्या वेळेला अॅन्युटी ची रक्कम काढली तर फक्त व्याजावरही कर लागेल. आतापर्यंत सगळ्याच रकमेवर कर लागत होता. केंद्र सरकारतर्फे जे 14 टक्क्यांचं योगदान असतं ते करमुक्त असतं. त्याचबरोबर राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या ज्या स्वायत्त संस्था आहेत त्यांनाही ही सुविधा दिली जाईल. या संस्थांनी जर कर्मचाऱ्यांचं योगदान 14 टक्के ठेवलं तर तेही करमुक्त होऊ शकतं. सध्या 10 टक्के रकमेवर कर नाही. ज्या कॉर्पोरेट बाँडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी सरकारने मागच्या वर्षी परवानगी दिली त्यातही अट होती की फक्त A दर्जाच्या रेटिंगच्या कॉर्पोरेट बाँडमध्येही NPS ची गुंतवणूक होऊ शकते. (हेही वाचा : खूशखबर! सलग दुसऱ्या महिन्यात GST ची वसुली गेली 1 कोटींवर) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आता BBC रेटिंगचे जे कॉर्पोरेट बाँड्स आहेत त्यावरही NPS ची गुंतवणूक करण्याची परवनागी मिळू शकते. NPS च्या मॅच्युरिटीपर्यंत ज्यांना आपले पैसे या योजनेत ठेवायचे नसतील तर त्यांच्यासाठी ही योजना फायदेशीर आहे. व्याजदर कमी असल्यामुळे लोक या योजनेत पैसे ठेवत नाहीत. याच कारणामुळे सरकार आता नवा प्लॅन बनवतं आहे. =======================================================================
    Published by:Arti Kulkarni
    First published:

    Tags: Money, Pension

    पुढील बातम्या