What is PM PRANAM scheme : कॅबिनेटच्या बैठकीत पीएम प्रणाम स्किमला मंजुरी मिळाली आहे. या योजनेच्या माध्यमातून रासायनिक खतांचे अनुदान कमी करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. शेती मध्ये रासायनिक खतांचा वापर कमी करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. यामुळे एकीकडे कमी रसायनयुक्त खतांमुळे जमिनीचा दर्जा सुधारेल, तर दुसरीकडे कमी रसायनयुक्त अन्नपदार्थांचे सेवन करून लोकांना निरोगी जीवन जगण्याची संधी मिळणार आहे. यासोबतच सरकारचा खर्चही कमी होणार आहे. पीएम प्रणाम योजनेबाबत अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात घोषणा केली होती. प्रणाम योजना ही प्रत्यक्षात प्रमोशन ऑफ अल्टरनेट न्यूट्रिएंट्स फॉर अॅग्रीकल्चर मॅनेजमेंट आहे. काय आहे प्रणाम योजना रासायनिक खतांचा वापर कमी करण्यासाठी सरकारने पीएम प्रणाम योजना सुरू केली आहे. यासाठी शासनाने कृषी व्यवस्थापनासाठी पर्यायी पोषक तत्वांच्या प्रचारासाठी एक स्किम आणली आहे.त्याचा उद्देश रासायनिक खते आणि सेंद्रिय खतांच्या मिश्रणासह खतांचा संतुलित वापर करणे हा आहे. ‘पैशांचं गवत’! एकदा लावलं की 5 वर्षे कमाई; प्रत्येक वर्षाला लाखो रुपये मिळतील काय आहे या योजनेचे उद्दिष्ट ही योजना राबवण्यामागील सरकारचे एक उद्दिष्ट म्हणजे रासायनिक खतांवरील अनुदानाचा बोजा कमी करणे. 2022-23 मध्ये हा बोजा 2.25 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. हे 2021 च्या 1.62 लाख कोटी रुपयांच्या आकडेवारीपेक्षा 39 टक्के अधिक आहे. Sangli News: तोट्यात जाणाऱ्या शेतीवर रामबाण उपाय, हा पर्याय देतोय हमखास उत्पन्न, Video पीएम प्रणाम योजनेचे आहेत अनेक फायदे - हे नैसर्गिक खतांसह पर्यायी पोषक आणि खतांचा वापर करण्यास प्रोत्साहित करते. - रासायनिक खतांचा वापर कमी केल्यास जमिनीची गुणवत्ता सुधारेल. - भारतातील कृषी उत्पन्न आणि उत्पादकता वाढवते. - कॉम्प्रेस्ड बायो गॅसच्या वापरासही प्रोत्साहन दिले जाईल. ज्यामुळे कचरा कमी होण्यास आणि स्वच्छ ऊर्जा निर्मिती करण्यात मदत होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.