स्वप्नील एरंडोलीकर, प्रतिनिधी सांगली, 18 जून: आजकाल शेती परवडत नाही, घातलेला खर्चही निघत नाही, अशी अनेक शेतकऱ्यांची व्यथा असते. पण या सर्व समस्येवर एका गावानं फार वर्षांपूर्वी एक उपाय शोधला आहे. सांगली जिल्ह्यातील बेडग येथे पिढ्यानपिढ्या पानमळ्यांची शेती केली जातेय. खाऊच्या पानांची शेती करणारा शेतकरी समाधानी असून लखपती झाल्याचे दुर्मिळ चित्र गावात दिसते. विशेष म्हणजे बेडगमधील खाऊच्या पानांना देशभर मागणी आहे. भारतात खाऊच्या पानांना मोठी मागणी भारतात खाऊच्या पानांना प्रचंड मागणी असते. एकतर खाण्यासाठी त्याचा देशभर वापर होतोच, पण त्याचबरोबर खाऊच्या पानांना धार्मिक महत्त्व ही आहे. भारतातील कोणताही धार्मिक विधी खाऊच्या पानाशिवाय संपन्न होत नाही. अगदी बारशाच्या सोहळ्यापासून ते अगदी अंत्यसंस्कार विधिपर्यंतच्या पूजा अर्चना करताना खाऊच्या पानांची गरज असते. म्हणून ही खाऊच्या पानांची शेती करणे अत्यंत फायदेशीर ठरते आहे.
बेडग गावात बहुतांश शेतकऱ्यांचा पानमळा या शेतीचे महत्त्व सांगली जिल्ह्यातील बेडग गावच्या शेतकऱ्यांनी आधीच ओळखले होते. म्हणून या गावात बहुसंख्य शेतकरी हे खाऊच्या पानमळ्यांची शेती करतात. खाऊचे पान म्हणजे नागवेलीचे पान होय. या पानांचे अनेक औषधी उपयोग ही आहेत. अनेकदा वैद्यांकडून आयुर्वेदिक औषधेही खाऊच्या पानातून घ्यायला सांगितली जातात. त्यामुळे या पानांना व्यावसायिक दृष्ट्या महत्त्व आहे. रोज उत्पन्न देणारं पीक पानमळ्याची शेती ही दुग्धव्यवसायाप्रमाणे आहे. खाऊच्या पानांची तोडणी रोजच्या रोज करावी लागते. त्यामुळे पानमळा हा रोज उत्पन्न देणारा आहे. योग्य काळजी घेतल्यास पानमळ्याच्या शेतीतून चांगले उत्पन्न मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पानमळ्याच्या शेतीकडे वळावे, असे आवाहन बेडगमधील शेतकरी करतात. सेंद्रिय शेतीतून समृद्धी, महिला शेतकरी करतेय लाखोंची उलाढाल, Video दुहेरी उत्पन्नाची संधी पानमळ्याची शेती करताना नागवेलीसोबत इतर आंतरपिके घेता येतात. कारण ही नागवेलीची पाने फाटू नयेत, ऊन लागून पिवळी पडू नयेत म्हणून या मळ्यांना गर्द झाडांचे कुंपण घातलेले असते. ही झाडे शक्यतो शेवगा, लवंगी मिरची अशा प्रकारची असतात. त्यामुळे नागवेली उंच वाढून तिची पाने पुरेशी पक्व होईपर्यंत शेवग्याच्या शेंगांचे उत्पन्न मिळवता येते आणि शेतकर्यांचा दुहेरी नफा होतो. शेतकरी ठरवतो दर व्यावसायिक दृष्टीने जर या नागवेलीच्या म्हणजेच खाऊच्या पानांच्या शेतीकडे बघायचे म्हटले तर या पानांना देशभर बाजारपेठ उपलब्ध आहे. इथे दर व्यापारी नाही तर शेतकरी ठरवू शकतो. कारण ती पाने खरेदी करण्यासाठी व्यापारी स्वतः शेतकऱ्यांच्या शेतात येऊन पाने खरेदी करतात. पानांना राज्यातील तसेच पूर्ण भारतात मोठी मागणी असते. प्रामुख्याने राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश या भागात या गावच्या पानांची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. शेतकऱ्याचा आवळा शेतीचा यशस्वी प्रयोग, घरीच बनवली आवळा कँडी, अमृत रस, लाखोंची कमाई Video हमखास उत्पन्नाचा स्त्रोत खाऊच्या पानांच्या शेतीतून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मती होते. बेडगमध्ये पानमळ्यात काम करण्यासाठी लागणारा मजुरवर्ग उपलब्ध आहे. कारण ही पाने खुडण्यासाठी कुशल मजूर लागतो. आता ताकारी - म्हैसाळ योजनेचे पाणी आल्यामुळे या परिसरातील शेतकरी जास्त प्रमाणात पानमळ्यांची लागवड करू लागले आहेत. या शेतीत कष्ट जरी असले तरी फायदेशीर असल्याने शेतकऱ्यांना ही शेती हमखास उत्पन्न देणारी ठरत आहे.