मुंबई, 23 फेब्रुवारी : जानेवारीच्या शेवटी महाराष्ट्रात ढगाळ वातावरण झाल्याने काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहिले. दरम्यान फेब्रुवारीच्या सुरूवातील काही अंशी थंडी पडल्यानंतर अचानक वातावरणात उकाडा जाणवू लागला आहे. दरम्यान राज्यात फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात 37 अंशांपर्यंत तापमान जाऊन पोहोचले आहे. यामुळे नागरिकांनी याबाबत काळजी घेणे गरजेचे आहे.
बहुतांश जिल्ह्यात कमाल तापमानाचा पारा 37 अंशांच्या वर गेला आहे. राज्यातील सर्वाधिक तापमान सध्या विदर्भात जाणवत असल्याचे दिसून येत आहे. विदर्भातील अनेक राज्यात 37 अंश तापमान नोंदवले जात आहे. तर उर्वरित राज्यातही उन्हाचा चटका कायम आहे. राज्याच्या किमान तापमानात सातत्याने वाढ होत आहे. कमाल तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
हे ही वाचा : नाशिकच्या तरुणानं केली आधुनिक ड्रोनची निर्मिती, शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा, Video
सूर्य तळपू लागल्याने राज्यात उन्हाचा झळा वाढत आहेत. दरम्यान मागच्या 24 तासांमध्ये अकोला येथे राज्यातील उच्चांकी 38.5अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. अनेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा 37 अंशांवर तर बुहतांश ठिकाणी 35 अंशांच्यावर आहे. मागच्या दोन दिवसांत वाशीम येथे 38 अंश, वर्धा, नागपूर, सोलापूर, यवतमाळ आणि नांदेड येथे 37 अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली.
राज्याच्या किमान तापमानात सातत्याने वाढ होत आहे. मागच्या दोन दिवसांपूर्वी निफाड गहू संशोधन केंद्रात नीचांकी 808 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले होते. तर धुळे येथे 9.7 अंश तापमान होते. तर उर्वरित राज्यात किमान तापमान 12 अंशांच्या पुढे गेले आहे. राज्याच्या कमाल तापमानातील चढ-उतार सुरूच राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
हे ही वाचा : वातावरणातल्या बदलांचा आंब्याच्या झाडांना धोका! नुकसान टाळण्यासाठी 'ही' घ्या काळजी, Video
मुंबईकरांना दोन दिवसांपासून उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत. मुंबईत मागच्या 24 तासांत कमाल तापमान 36 अंशांवर गेले होते. मुंबईसह महाराष्ट्रात उष्णतेची लाट पसरली आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी उन्हात फिरताना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे. मुंबईतील तापमान गेल्या एक दोन दिवसांपासून वाढ होत असून मुंबईतील कमाल तापमान देखील 36 अंशांवर गेले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Kolhapur, Mumbai, Pune (City/Town/Village), Weather Forecast, Weather Warnings