मराठी बातम्या /बातम्या /मनी /वातावरणातल्या बदलांचा आंब्याच्या झाडांना धोका! नुकसान टाळण्यासाठी 'ही' घ्या काळजी, Video

वातावरणातल्या बदलांचा आंब्याच्या झाडांना धोका! नुकसान टाळण्यासाठी 'ही' घ्या काळजी, Video

X
शेतकऱ्यांनी

शेतकऱ्यांनी आंब्याच्या झाडांची काळजी कशी घ्यावी याबाबत फळ संशोधन केंद्राच्या अधिकाऱ्यांनी काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत.

शेतकऱ्यांनी आंब्याच्या झाडांची काळजी कशी घ्यावी याबाबत फळ संशोधन केंद्राच्या अधिकाऱ्यांनी काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत.

 • News18 Lokmat
 • Last Updated :
 • Aurangabad [Aurangabad], India

  सुशील राऊत, प्रतिनिधी 

  औरंगाबाद, 23 फेब्रुवारी :  हिवाळ्याच्या शेवटी आंब्याच्या झाडांना मोहर यायला सुरुवात होते यंदा अनेक झाडांना मोहर चांगला आला आहे. पण, वातावरणातील बदलांमुळे या झाडांची काळजी घेणं ही तितकंच महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांनी आंब्याच्या झाडांची काळजी कशी घ्यावी याबाबत औरंगाबाद येथील फळ संशोधन केंद्राच्या अधिकाऱ्यांनी काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत. त्याचा उपयोग करून शेतकरी चांगलं उत्पन्न मिळवू शकतात.

  वातावरणातील बदलांचा परिणाम

  उन्हाळ्याला सुरुवात झाली की प्रत्येकाला आंब्याचे वेध लागतात. पुणे-मुंबईच्या बाजारात काही प्रमाणात आंबा दाखलही झालाय. एप्रिल आणि मे महिन्यामध्ये आंब्याचा मुख्य सिझन असतो. या कालावधीमध्ये आंबा मिळावा यासाठी सध्या या झाडांची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे.

  वातावरणातील बदलांमुळे काही झाडांना मोहर लवकर आलाय. तर काहींना उशीरा येत आहे. दिवसेंदिवस वाढत असलेली उष्णता आंब्याच्या झाडांसाठी धोकादायक आहे यामुळे फळ कमी होऊ शकतात. या संदर्भात अनेक शेतकऱ्यांनी माहिती दिली असल्याचं फळ संशोधन केंद्राच्या अधिकाऱ्यांनी सांगितलय. अनेक शेतकऱ्यांना भविष्यात झाडांना आंबे टिकून ठेवण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. आंब्याची नेमकी कशी काळजी घ्यावी असा शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे.

  नाशिकच्या तरुणानं केली आधुनिक ड्रोनची निर्मिती, शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा, Video

  काय काळजी घेणार?

  - फळ संशोधन केंद्राच्या अधिकारी आर. व्ही. नैनवाड यांनी या विषयावर काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत. त्याचा वापर करून शेतकरी आंब्याचं उत्पन्न चांगलं मिळवू शकतात.

  - शेतकऱ्यांनी वाढत्या उष्णतेसाठी आंब्याच्या झाडांना चांगलं सिंचन आवश्यक आहे. या सिंचनानंतर झाडांची गळती रोखता येऊ शकते.

  - मोहर लागलेल्या झाडांना त्यांच्यावर पडलेल्या किड्यांपासून संरक्षण करावे

  - शेतकरी हायर मॉलिक्युल्स म्हणजे नवीन औषधांचा वापर करत असतात. या औषधांमुळे परपरागसिंचन करणाऱ्या मधमाशांना याचा फटका बसू शकतो.

  दुष्काळी भागात फुलली स्ट्रॉबेरीची शेती, पाहा कशी झाली कमाल! Video

   शेतकऱ्यांनी झाडांसाठी कडुलिंब आणि लिंबोल्या यांचा वापर केला तर आंब्याचं नुकसान होणार नाही. यंदा वातावरणात होत असलेल्या बदलांमुळे आंब्याला मोहर येण्याचं प्रमाण बदललं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त नैसर्गिक औषधांचा वापर करावा, असं आवाहन नैनवाड यांनी केलंय.

  First published:
  top videos

   Tags: Agriculture, Aurangabad, Local18