विठ्ठल भाडमुखे, प्रतिनिधी नाशिक, 20 फेब्रुवारी : नाशिक च्या सारंग माने या तरुणाने आधुनिक ड्रोनची निर्मिती केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सारंग यासंदर्भात काम करत होता. या ड्रोनमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना शेतमाल फवारण्यासाठी फायदा होणार आहे. सारंगने तयार केलेल्या या ड्रोनला शेतकऱ्यांकडून चांगली मागणी आहे. ड्रोन निर्मिती करायचं कसं ठरवलं? पुण्याच्या एमआयटी कॉलेजमधून सारंगने एरोस्पेस इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे. माध्यमिक शिक्षण घेत असतानाच आपण शेतकऱ्यांसाठी काहीतरी करायचं असं वारंवार त्याच्या मनात येत होतं. त्यामुळे त्याने ड्रोन निर्मिती करायचं ठरवलं. खरंतर अनेक शेतकरी हे हातपंपाने आपल्या पिकांची फवारणी करत असतात मोठे कष्ट त्यांना उपसावे लागतात. आपण जर ड्रोन तयार केलं तर या शेतकऱ्यांचे कष्ट वाचू शकतात. आधुनिक पद्धतीने ते आपल्या पिकांची फवारणी करू शकतात. यामुळे आधुनिक ड्रोनची निर्मिती करून ते विकसित केलं असल्याची माहिती सारंग माने याने दिली आहे.
काय आहेत ड्रोनची वैशिष्ट्ये? 1.या ड्रोनची 16 लिटर कॅपिसिटी आहे. 2. हा ड्रोन वीस फूट उंचीवर जाऊ शकतो. 3. दोन ते पाच किलोमीटर पर्यंत ड्रोनची रेंज आहे. म्हणजे इतकं क्षेत्र तुम्ही फवारणी करू शकतात. 4. या ड्रोनला ऑटो सिस्टीम आहे. एकदा तुम्ही तुमचं फवारणी करण्याचं क्षेत्र रिमोट वरती निश्चित केल्यानंतर ड्रोन ऑटोमॅटिक पूर्ण क्षेत्र फवारणी करेल. 5. या ड्रोनची बॅटरी तुम्ही 900 वेळा रिचार्ज करू शकता इतकी तिची कॅपिसिटी आहे. 6. या ड्रोनच वजन हलकं असल्यामुळे तुम्ही सहज दुचाकी वरती देखील ड्रोन तुमच्या शेतात घेऊन जाऊ शकता. 7. ड्रोन पूर्णपणे रिमोट कंट्रोल आहे. तुम्ही एका जागेवर बसून सर्व ऑपरेटिंग करू शकता. 8. विशेष म्हणजे कोणत्याही लिक्विडची फवारणी तुम्ही या ड्रोनद्वारे करू शकता. 9. तुम्ही दिवसभरात तुमचं कितीही पीक असेल तरी फवारणी करू शकता. 10. चांगल्या प्रतीचा शेतकऱ्यांना फायदेशीर असा हा ड्रोन आहे. शेतकऱ्यांसाठी खास सूट शेतकऱ्यांच हित लक्षात घेता हा ड्रोन तयार केला आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना ड्रोन कसा परवडेल हे लक्षात घेऊनच किंमत कमी करण्यात आली आहे. साधारण 8 लाख रुपयांचा ड्रोन शेतकऱ्यांना फक्त 2 लाख रुपयांमध्ये विक्री केला जाणार आहे. त्यात शेतकरी गट असेल तर त्यावर 50 ते 75 टक्के सबसिडी दिली जाणार आहे.
Bamboo Farming : आयटी क्षेत्रातील तरुणानं बांबू शेतीमध्ये केला जागतिक रेकॉर्ड! पाहा Video
जास्त ड्रोन निर्मिती करण्याचे व्हिजन कृषी उड्डाणमार्फत जास्तीत जास्त ड्रोन निर्मिती करण्याचं आमचं व्हिजन आहे. त्या संदर्भात आम्ही प्रयत्न करत आहोत. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून हा ड्रोन आम्ही विकसित केला आहे. यामुळे शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होणार आहे. या ड्रोनने फवारणी केल्यामुळे तुमच्या औषधांची देखील बचत होईल. तसेच हा ड्रोन तुम्ही घेतल्यानंतर तुमचा शेत माल फवारणी झाला तर तुम्ही इतरांना देखील हा ड्रोन फवारणी करण्यासाठी देऊ शकता. यामुळे तुम्हाला देखील दोन पैसे मिळू शकतात, असं सारंग माने याने सांगितले. सारंग माने फोन नं : 9595597583