जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Repo Rate Hike : RBI च्या रेपो दरवाढीचा परिणाम; 'या' बँकांनी व्याजदर वाढवले

Repo Rate Hike : RBI च्या रेपो दरवाढीचा परिणाम; 'या' बँकांनी व्याजदर वाढवले

Repo Rate Hike : RBI च्या रेपो दरवाढीचा परिणाम; 'या' बँकांनी व्याजदर वाढवले

RBI ने गेल्या 36 दिवसात दुसऱ्यांदा रेपो दरात वाढ केली आहे. यानंतर ICICI, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बँकेने आपल्या कर्जाच्या व्याजदरात वाढ केली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 9 जून : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने रेपो रेट 0.50 टक्क्यांनी वाढवल्याच्या एका दिवसानंतर, अनेक बँकांनी एक्सटर्नल बेंचमार्क लिंक्ड (EBLR) होम लोनचे व्याजदर वाढवले ​​आहेत. म्हणजे घर घेण्यासाठी या बँकांकडून कर्ज घेणे महाग झाले आहे. RBI ने गेल्या 36 दिवसात दुसऱ्यांदा रेपो दरात वाढ केली आहे. यानंतर ICICI, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बँकेने आपल्या कर्जाच्या व्याजदरात वाढ केली आहे. ICICI बँक (ICICI Bank) खाजगी क्षेत्रातील ICICI बँकेने EBLR मध्ये सुधारणा केली आहे. बँकेने दरात केलेली सुधारणा 8 जून 2022 पासून लागू झाली आहे. याचे कारण म्हणजे RBI चा रेपो दर आता 4.90 टक्क्यांवर पोहोचला आहे. बँकेने सांगितले की आता त्यांचा EBLR 8.60 टक्के झाला आहे. Bank Strike: बँकेची कामं आधीच करुन घ्या; कर्माचारी ‘या’ दिवशी जाणार संपावर बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) बँक ऑफ बडोदाच्या रेपो लिंक्ड लेंडिंग रेट (BRLLR) शी जोडलेल्या विविध कर्जाच्या व्याजदरात वाढ झाली आहे. व्याजदरांमधील ही सुधारणा 9 जून 2022 पासून प्रभावी झाली आहेत. बँकेने म्हटले आहे की 9 जून 2022 पासून किरकोळ कर्जासाठी प्रभावी BRLLR 7.40 टक्के झाला आहे. पंजाब नॅशनल बँक (PNB) पंजाब नॅशनल बँकेने देखील व्याजदर सुधारित केले आहेत. पीएनबीचा रेपो लिंक्ड लेंडिंग रेट 7.40 टक्क्यांवर गेला आहे. नवीन दर 9 जून 2022 पासून लागू झाले आहेत. पॅनकार्डच्या मदतीने TDS Status चेक करा; पगारातून कापलेले पैसे रिफंड मिळण्यास होईल मदत बँक ऑफ इंडिया (Bank of India) बँक ऑफ इंडियानेही दर वाढवले आहेत. सुधारित रेपो दरानुसार RBLR 8 जून 2020 पासून 7.75 टक्के झाला आहे. महिनाभरात दुसरी वाढ RBI ने 36 दिवसात दुसऱ्यांदा रेपो दरात वाढ केली आहे. गेल्या महिन्यात आरबीआयने रेपो दरात 0.40 टक्क्यांची वाढ केली होती. त्यानंतर काल RBI रेपो दरात 0.50 टक्क्यांची वाढ केली आहे. अशा प्रकारे रेपो रेट आता 4.90 टक्क्यांवर पोहोचला आहे. आरबीआयने गेल्या महिन्यात व्याजदर वाढवल्यानंतर बहुतांश बँकांनी व्याजदरात वाढ केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात