मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Bank Strike: बँकेची कामं आधीच करुन घ्या; कर्माचारी 'या' दिवशी जाणार संपावर

Bank Strike: बँकेची कामं आधीच करुन घ्या; कर्माचारी 'या' दिवशी जाणार संपावर

जून महिन्यात देशातील सर्व सरकारी आणि खासगी बँका आठ दिवस बंद (Bank Holidays) राहणार आहेत. या सुट्ट्यांमध्ये सहा नियमित साप्ताहिक सुट्ट्यांचा समावेश आहे.

जून महिन्यात देशातील सर्व सरकारी आणि खासगी बँका आठ दिवस बंद (Bank Holidays) राहणार आहेत. या सुट्ट्यांमध्ये सहा नियमित साप्ताहिक सुट्ट्यांचा समावेश आहे.

जून महिन्यात देशातील सर्व सरकारी आणि खासगी बँका आठ दिवस बंद (Bank Holidays) राहणार आहेत. या सुट्ट्यांमध्ये सहा नियमित साप्ताहिक सुट्ट्यांचा समावेश आहे.

मुंबई, 9 जून : सध्या जवळपास सर्व आर्थिक व्यवहार ऑनलाईन पद्धतीनं केले जात असले तरी काहीनाकाही कारणास्तव आपल्याला बँकेमध्ये (Bank) पाऊल ठेवावंच लागतं. अशा परिस्थितीमध्ये बँकांना केव्हा सुट्ट्या आहेत किंवा बँक कर्मचाऱ्यांनी केव्हा संप करण्याचे जाहीर केलं आहे याची आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. येत्या 27 जून रोजी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU), ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फेडरेशन (AIBOC), ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन (AIBEA) आणि नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक वर्कर्स (NOBW) या कर्मचारी संघटनांसह एकूण नऊ बँक संघटनांनी संपावर (Bank Strike) जाण्याचा निर्णय घेतला आहे. टीव्ही 9 भारतवर्षने याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. आठवड्यात कामकाजाचे पाच दिवस आणि पेन्शनशी (Pension) संबंधित समस्यांचं निराकरण करण्याच्या प्रमुख मागण्यांसाठी बँक कर्मचारी संघटना (Bank Employees Union) संपावर जाणार आहेत. एआयबीईएचे महासचिव सी.एच. वेंकटचलम यांनी यूएफबीयूच्या बैठकीनंतर सांगितलं की, 'सर्व पेन्शनधारकांसाठी पेन्शन योजनेत सुधारणा करणं, राष्ट्रीय पेन्शन योजना (National Pension Scheme) रद्द करणं आणि सर्व बँक कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी हा संप केला जाणार आहे.' Post Office Schemes: पैसे बुडण्याची भीती नाही आणि बँकेपेक्षा जास्त व्याज; गुंतवणूकदारांना फायदा जून महिन्यात देशातील सर्व सरकारी आणि खासगी बँका आठ दिवस बंद (Bank Holidays) राहणार आहेत. या सुट्ट्यांमध्ये सहा नियमित साप्ताहिक सुट्ट्यांचा समावेश आहे तर प्रादेशिक सणांच्या निमित्ताने दोन दिवस बँका बंद असणार आहेत. देशातील सर्व बँकांसाठी नियम आणि सुट्ट्या ठरवण्याचा अधिकार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला आहे. जून 2022 मध्ये देशातील सर्व बँका 5, 12, 19 आणि 26 जून रोजी रविवार असल्यामुळे बंद राहतील. तर 11 आणि 25 जून रोजी महिन्यातील दुसरा आणि चौथा शनिवार असल्याने देशातील सर्व बँकांना सुट्टी असेल. याशिवाय 2 जून रोजी महाराणा प्रताप जयंतीनिमित्त शिमल्यात बँका बंद राहणार आहेत. LIC ची आधार स्तंभ पॉलिसी, 30 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळेल लाखोंचा परतावा या व्यतिरिक्त मिझोराम, भुवनेश्वर, जम्मू आणि काश्मीरमधील बँका 15 जून रोजी वायएमए दिन, गुरु हरगोविंद जयंती आणि राजा संक्रांतीच्या निमित्ताने बंद राहतील. तर, दिल्ली, मुंबई, कोलकत्ता, चेन्नई, बंगळुरू, लखनौ, पाटणा, रांची, चंडीगड, जयपूर, रायपूर, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, आसाम, त्रिपुरा या भागातील बँका फक्त सहा दिवस बंद राहणार आहेत. बँकांना सुट्ट्या असूनही पूर्ण होतील काही महत्त्वाचे व्यवहार सुट्टीच्या दिवशी बँका बंद असल्या तरी तुम्ही अनेक महत्त्वाची कामं करू शकता. बँकांच्या सर्व ऑनलाइन सेवा (Bank Online Services) महिनाभर सुरू असतात. या काळात तुम्ही तुमची सर्व कामं ऑनलाइन माध्यमातून पूर्ण करू शकता. बँकेच्या सुट्टीच्या दिवशी फक्त बँक शाखा बंद असतात. बँकेची एटीएम(ATM), कॅश डिपॉझिट मशीन, पासबुक प्रिंटिंग मशिन सुरू असतात. याशिवाय, सर्व बँकांच्या मोबाईल बँकिंग आणि नेट बँकिंग सेवादेखील बँक सुट्टीच्या दिवशी पूर्णपणे सक्रिय असतात. त्यामुळे मोबाईल बँकिंग आणि नेट बँकिंगच्या मदतीने तुम्ही फंड ट्रान्सफरसारखी सर्व महत्त्वाची कामं पूर्ण करू शकता. जून महिन्यातील बँक सुट्ट्यांची यादी >> 2 जून - महाराणा प्रताप जयंती (शिमला) >> 5 जून - रविवार >> 11 जून - दुसरा शनिवार >> 12 जून - रविवार >> 15 जून - वायएमए दिवस, गुरु हरगोविंद जयंती, राजा संक्रांत (मिझोरम, भुवनेश्वर, जम्मू आणि काश्मीर) >> 19 जून - रविवार >> 25 जून - चौथा शनिवार >> 26 जून - रविवार
First published:

Tags: Bank services, Bank strike

पुढील बातम्या