PMC बँकेनंतर आणखी एका बँकेवर RBI ची कारवाई

PMC बँकेनंतर आणखी एका बँकेवर RBI ची कारवाई

लक्ष्मी विलास बँकेच्या संचालकांवर आर्थिक फसवणुकीचे आरोप आहेत.या संचालकांच्या विरुद्ध तक्रारी करण्यात आल्यानंतर पोलिसांनी खटला दाखल केला होता.

  • Share this:

मुंबई, 28 सप्टेंबर : रिझर्व्ह बँकेने लक्ष्मी विलास बँकेवर कडक कारवाई केली आहे. या बँकेला PCA यादीत टाकण्यात आलं आहे. PCA म्हणजेच प्रॉम्प्ट करेक्टिव्ह अॅक्शन. या श्रेणीतल्या बँकांची आर्थिक स्थिती जोपर्यंत सुधारत नाही तोपर्यंत बँक नवं कर्ज देऊ शकत नाही. याआधीही आणखी काही सहकारी बँका PCA मध्ये आल्या आहेत.

लक्ष्मी विलास बँकेच्या संचालकांवर आर्थिक फसवणुकीचे आरोप आहेत.या संचालकांच्या विरुद्ध तक्रारी करण्यात आल्यानंतर पोलिसांनी खटला दाखल केला होता.

या बँकेत 790 कोटी रुपयांची एफडी करण्यात आली होती. त्यामध्ये गैरव्यवहार करण्यात आले आहेत. हा रिपोर्ट शुक्रवारी समोर आला. बँकेच्या संचालकांवर खटला दाखल झाल्यानंतर बँकेचा शेअर घसरला.

(हेही वाचा : वडील करू शकतात मुलीशी लग्न, या देशातल्या संसदेने मंजूर केलं विधेयक!)

ज्या बँकेकडे पुरेसा निधी नाही, ज्या बँकांचे NPA वाढलेले आहेत म्हणजे नुकसानीतली मालमत्ता आहे त्या बँकांचा समावेश PCA यादीत होतो. या बँका नव्या शाखाही उघडू शकत नाहीत. याचबरोबर लक्ष्मी विलास बँकेवर आणखी प्रतिबंध आहेत का याबद्दल अधिक माहिती कळू शकली नाही.

बँकेच्या ग्राहकांवर मात्र याचा फारसा परिणाम होणार नाही. त्यामुळे त्यांनी चिंता करण्याचं कारण नाही, असंही सांगण्यात येत आहे. बँकेमधली नोकरभरती मात्र बंद आहे. याआधी RBI ने देना बँकेवरही नवं कर्ज देण्यावर निर्बंध घातले आहेत.

=====================================================================================

VIDEO : अजित पवारांच्या आरोपांना चंद्रकांत पाटलांचं प्रत्युत्तर, म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: bankingrbi
First Published: Sep 28, 2019 09:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading