नवी दिल्ली, 8 ऑक्टोबर : धनत्रयोदशी-दिवाळी दरम्यान सोने-चांदी दरात तेजी होती. शुक्रवारी सोने दरात जवळपास 570 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदीमध्ये जवळपास 1700 रुपये प्रति किलो वाढ झाली.
सोन्या-चांदीचे दर जाहीर करणारी वेबसाइट ibjarates.com वर शुक्रवारी 99.9 शुद्धतेच्या सोन्याचा भाव 47,702 रुपये प्रति तोळा होता. तर 99.5 शुद्धतेच्या सोन्याचा भाव 47,511 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. 99.9 शुद्धतेच्या चांदीची किंमत 63,551 रुपये होती.
सोन्या-चांदीचे रेट जारी करणारी वेबसाइट गुड रिटर्ननुसार (goodreturns.in), शुक्रवारी गोल्ड रेट 47,250 रुपये प्रति 10 ग्रॅम होता.
फेस्टिव्ह सीजननंतर आता सराफा बाजारात सोने दरात काहीशी तेजी आहे. goodreturns नुसार, एक ग्रॅम सोन्याचा दर मागील आठवड्याच्या तुलनेत काहीशा वाढीनंतर 22 कॅरेटचा दर 4726 रुपयांवर ट्रेड करत आहे. तर 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचा दर 51,560 रुपये आहे.
ibjarates.com वर आज 22 कॅरेट सोन्याचा दर 4370 रुपये प्रति ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट गोल्ड रेट 4770 रुपये प्रति ग्रॅम आहे.
आज नवी दिल्लीत 22 कॅरेटचा दर 47,260 रुपये, कोलकातामध्ये 47,510 रुपये, मुंबईत 46,220 रुपये आणि चेन्नईत 45,420 रुपयांवर ट्रेड करत आहे.
सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी सरकारकडून एक App तयार करण्यात आलं आहे. 'BIS Care app' असं या App चं नाव असून ग्राहक याद्वारे सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या App वर सोन्याची शुद्धताच नाही, तर यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकतात. लायसन्स, रजिस्ट्रेशन, हॉलमार्क नंबर चुकीचा आढळल्यास ग्राहक याची तक्रार करू शकतात.
सोन्या-चांदीचा दर घरबसल्या केवळ मिस्ड कॉलद्वारे जाणून घेता येऊ शकतात. 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर, फोनवर मेसेज येईल. या मेसेजमध्ये सोन्याच्या लेटेस्ट किमतीबाबत माहिती दिली जाईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.