जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Petrol-Diesel Price Today: पेट्रोल डिझेलचे आजचे दर काय? वाचा सविस्तर

Petrol-Diesel Price Today: पेट्रोल डिझेलचे आजचे दर काय? वाचा सविस्तर

Petrol-Diesel Price Today: पेट्रोल डिझेलचे आजचे दर काय? वाचा सविस्तर

आज मुंबईत पेट्रोलचे (Fuel Price in mumbai) राष्ट्रीय दर 109.98 रुपये प्रति लिटर, तर डिझेल 94.14 रुपये प्रतिलिटर विकले जात आहे. काल म्हणजे रविवारीही दरात कोणतीही वाढ झालेली नाही.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 8 नोव्हेंबर : पेट्रोल-डिझेलच्या दरात रोज बदल असल्याने त्याची माहिती नागरिकांना असणे आवश्यक आहे. IOCL ने आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी (8 नोव्हेंबर) पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर केले. आजही इंधनाच्या दरात कोणताही बदल झालेले नाही. नवीन दरानुसार आज मुंबईत पेट्रोलचे राष्ट्रीय दर 109.98 रुपये प्रति लिटर, तर डिझेल 94.14 रुपये प्रतिलिटर विकले जात आहे. काल म्हणजे रविवारीही दरात कोणतीही वाढ झालेली नाही. दिवाळीच्या एक दिवस आधी सरकारने पेट्रोलवर प्रतिलिटर 5 रुपये आणि डिझेलवर 10 रुपयांची कपात करण्याची घोषणा केली होती. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केल्यामुळे ही कपात झाली आहे. यासोबतच अनेक राज्यांतील राज्य सरकारांनीही आपापल्या पातळीवर किमती कमी केल्या आहेत. उदाहरणार्थ उत्तर प्रदेशमध्ये पेट्रोल आणि डिझेल 12-12 रुपयांनी स्वस्त झाले आहे. याआधी केवळ ऑक्टोबरमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सात रुपयांनी वाढ झाली होती. आता किमती कमी झाल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. देशातील चार प्रमुख शहरांमधील पेट्रोल डिझेलचे दर » दिल्ली पेट्रोल 103.97 रुपये आणि डिझेल 86.67 रुपये प्रति लिटर » मुंबई पेट्रोल 109.98 रुपये आणि डिझेल 94.14 रुपये प्रति लिटर » चेन्नई पेट्रोल 101.40 रुपये आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लिटर » कोलकाता पेट्रोल 104.67 रुपये आणि डिझेल 89.79 रुपये प्रति लिटर

Share Market : आज शेअर बाजारात गुंतवणूकदारांची ‘या’ शेअर्सवर असेल नजर, कारणेही वाचा

किंमत दररोज 6 वाजता बदलते

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होतो. सकाळी 6 वाजल्यापासून नवे दर लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळपास दुप्पट होते. 25 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या 3 स्टॉक्सनी गुंतवणूकदारांना केलं मालामाल, या शेअरने तर दिला 14850% चा रिटर्न इंधनाचे दरांची माहिती कशी मिळवाल? तुम्ही एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे रोजचे दर देखील जाणून घेऊ शकता (How to check diesel petrol price daily). इंडियन ऑइलचे ग्राहक 9224992249 या क्रमांकावर RSP लिहून आणि BPCL चे ग्राहक 9223112222 या क्रमांकावर RSP लिहून माहिती मिळवू शकतात. तसेच, HPCL ग्राहक 9222201122 या क्रमांकावर HPPprice पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात