नवी दिल्ली, 20 जून : नुकतंच वर्ल्ड ऑफ स्टेटिस्टिक्सने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर जगातील सर्वात जास्त अॅक्टिव्ह 10 एयरलाइन्सची एक लिस्ट जारी केली. यामध्ये अमेरिकन एयरलाइन्स पहिल्या क्रमांकावर आहे. चला तर मग विमानांची दुनिया या सिरीजमधून जाणून घेऊया जगातील सर्वात जास्त अॅक्टिव्ह टॉप 10 एयरलाइन्स कोणत्या आहेत. अॅक्टिव्ह एयरलाइन्सच्या यादीमध्ये अमेरिकन एयरलाइंस, डेल्टा एयरलाइन्स, यूनायटेड एयरलाइन्स, साउथ वेस्ट एयरलाइन्स, रायनएयर, चायना ईस्टर्न एयरलाइन्स, चायना साउदर्स एयरलाइन्स, इंडिगो, तुर्की एयरलाइन्स आणि बीजिंग एयरलाइन्ससारख्या नावांचा समावेश आहे.
Most active airlines (daily flights):
— World of Statistics (@stats_feed) June 18, 2023
🇺🇸 American Airline: 5,251
🇺🇸 Delta Air Lines: 4,630
🇺🇸 United Airlines: 4,098
🇺🇸 Southwest Airlines: 4,078
🇮🇪 Ryanair: 3,034
🇨🇳 China Eastern Airlines: 2,144
🇨🇳 China Southern Airlines: 2,027
🇮🇳 IndiGo: 1,844
🇹🇷 Turkish Airlines: 1,767
🇨🇳…
अमेरिकन एअरलाइन्स जगातील सर्वात अॅक्टिव्ह आहे अॅक्टिव्ह एअरलाइन्सच्या बाबतीत अमेरिकन एअरलाइन्स पहिल्या क्रमांकावर आहे. अमेरिकन एअरलाइन्स दररोज 5,251 उड्डाणे चालवतात. या यादीत अमेरिकेच्या डेल्टा एअरलाइन्सचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. ही कंपनी दररोज 4,603 उड्डाणे चालवते.
First Aiport : देशातील पहिलं एयरपोर्ट कुठेय? 90 वर्षांपूर्वी उतरलं पहिलं विमान; पाहा आता कशासाठी होतो वापरयुनायटेड एअरलाइन्स तिसऱ्या क्रमांकावर आहे युनायटेड एअरलाइन्स वर्ल्ड ऑफ स्टॅटिक्सच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे आणि ती दररोज 4,098 उड्डाणे चालवते. साउथवेस्ट एअरलाइन्स चौथ्या स्थानावर आहे. ते दररोज 4,078 उड्डाणे चालवते. रोज 3,034 रोजच्या उड्डाणांसह अॅक्टिव्ह एयरलाइन्सच्या यादीत Ryanair पाचव्या क्रमांकावर आहे. चायना इस्टर्न एअरलाइन्स (रोज 2,144 फ्लाइट्स) आणि चायना सदर्न एअरलाइन्स (रोजच्या 2,027 फ्लाइट्स) अनुक्रमे सहा आणि सातव्या क्रमांकावर आहेत.
Aeroplane Mode: प्लेनमध्ये फोन फ्लाइट मोडमध्ये नाही ठेवला तर काय होतं? पाहून तुम्हीही व्हाल चकितआठव्या क्रमांकावर IndiGo या लिस्टमध्ये इंडिगो आठव्या क्रमांकावर आहे. भारतातील ही एकमेव विमान कंपनी आहे जिचा टॉप-10 यादीत समावेश आहे. ही कंपनी दररोज 1,844 उड्डाणे चालवते. रोज 1,767 उड्डाणे असलेल्या अॅक्टिव्ह एयरलाइन्सच्या यादीमध्ये तुर्की एअरलाइन्स नवव्या क्रमांकावर आहे. अॅक्टिव्ह एअरलाइन्सच्या यादीत बीजिंग एअरलाइन्स 10 व्या क्रमांकावर आहे. ते दररोज 1,562 उड्डाणे चालवते.