जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Aeroplane Mode: प्लेनमध्ये फोन फ्लाइट मोडमध्ये नाही ठेवला तर काय होतं? पाहून तुम्हीही व्हाल चकित

Aeroplane Mode: प्लेनमध्ये फोन फ्लाइट मोडमध्ये नाही ठेवला तर काय होतं? पाहून तुम्हीही व्हाल चकित

फ्लाइट मोड

फ्लाइट मोड

Aeroplane Mode: फ्लाइट मोड हा एक ऑप्शन आहे. ज्यामध्ये तुमचा फोन नेटवर्कच्या बाहेर राहतो म्हणजे फोन बंदही नसतो आणि स्विच ऑफ प्रमाणे काम करतो.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

Aeroplane Mode: तुम्ही फ्लाइटमध्ये प्रवास करता तेव्हा प्रवास सुरू होण्यापूर्वी तुम्हाला फ्लाइट अटेंडंटकडून काही मार्गदर्शक तत्त्वे दिली जातात. बेल्ट बांधण्यासह अनेक गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातात, ज्यामध्ये फ्लाइट दरम्यान फोन बंद करा किंवा फ्लाइट मोडमध्ये ठेवण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. तुम्ही फोनमध्ये हे देखील पाहिले असेल की फोनमध्ये फ्लाइट मोडचे फंक्शन आहे. ज्यामुळे तुमचा फोन नेटवर्कपासून दूर जातो. पण, तुम्हाला माहित आहे का की फ्लाइटमध्ये प्रवास करताना तुम्हाला असे का सांगितले जाते. जर कोणी असे केले नाही तर काय होईल होईल? विमानांची दुनिया या सिरीजमध्ये जाणून घ्या फ्लाइट मोडविषयी सर्व काही…

फ्लाइट मोड म्हणजे काय?

फ्लाइट मोड हा एक ऑप्शन आहे. ज्यामध्ये तुमचा फोन नेटवर्कच्या बाहेर राहतो म्हणजे फोन बंदही नसतो आणि बंद केल्याप्रमाणे काम करतो. तो चालू केल्यानंतर, तुम्ही फोन वापरू शकता. परंतु नेटवर्क वापरू शकत नाही. यामुळे तुमच्या फोनमध्ये इंटरनेट काम करू शकत नाही आणि तुम्ही कॉलवर कोणाशीही बोलू शकत नाही. मात्र, एअरप्लेन मोड ऑन केल्यानंतरही तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवर लोकल अॅप्लिकेशन्स, व्हिडिओ, म्यूझिक आणि इतर गोष्टी वापरू शकता.

Airplane Facts : इमर्जन्सी लँडिंगमध्ये पायलट का सांडून देतो विमानाचं इंधन, याचं कारण माहितीये का?

काही डिव्हाइसमध्ये तुम्ही वायफाय आणि ब्लूटूथ देखील वापरू शकता. फ्लाइटमध्ये असताना, लोक अनेकदा प्रवाशांसाठी प्रदान केलेले वायफाय वापरतात. अशा वेळी हे खास फीचर फ्लाइटमध्ये खास काम करतं. ज्यामुळे तुमचा फोन नेटवर्कच्या बाहेर राहतो.

फ्लाइट मोड चालू न केल्यास काय होईल?

तुम्ही फ्लाइट मोड चालू केला नाही तर यामुळे अडचण निर्माण होऊ शकते. फोन फ्लाइट मोडवर ठेवला नाही तर विमान कोसळेल, असे नाही. पण, यामुळे विमान उडवणाऱ्या पायलटला नक्कीच त्रास होणार आहे. फ्लाइट उडताना मोबाईल कनेक्शन ऑन ठेवल्याने विमानाच्या सिग्नल यंत्रणेवर परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे पायलटला त्रास होऊ शकतो.

Flight Attendants Rules: फ्लाइट अटेंडेंट्सला परफ्यूम लावण्याचीही नसते परवानगी, फॉलो करावे लागतात हे कठोर नियम

विमान प्रवासादरम्यान वैमानिक नेहमीच रडार आणि कंट्रोल रूमच्या संपर्कात असतात. परंतु, फोन चालू राहिल्यास त्यांना समस्यांना सामोरे जावे लागते आणि त्यांना स्पष्टपणे सूचना मिळू शकत नाहीत. फोन चालू राहिल्यास त्यांच्या कनेक्शनमध्ये अडचणी निर्माण होतात. अशा वेळी फ्लाइट दरम्यान तुमचा मोबाईल किंवा लॅपटॉप चालू राहिल्यास पायलटला मिळणाऱ्या रेडिओ फ्रिक्वेन्सीमध्ये अडथळा येतो. समजा अनेकांनी फ्लाइटमध्ये असे केले तर त्यांना ते खूप अवघड जाते. अशा वेळी जेव्हाही तुम्ही फ्लाइटमध्ये प्रवास करता तेव्हा तुमचा फोन फ्लाइट मोडवरच ठेवा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात