जाहिरात
मराठी बातम्या / मनी / First Aiport : देशातील पहिलं एयरपोर्ट कुठेय? 90 वर्षांपूर्वी उतरलं पहिलं विमान; पाहा आता कशासाठी होतो वापर

First Aiport : देशातील पहिलं एयरपोर्ट कुठेय? 90 वर्षांपूर्वी उतरलं पहिलं विमान; पाहा आता कशासाठी होतो वापर

देशातलं पहिलं विमानतळ कोणतं?

देशातलं पहिलं विमानतळ कोणतं?

First Airport of India : भारतातील पहिलं कमर्शियल एयरपोर्ट मुंबईमध्ये तयार करण्यात आलं होतं. ज्याचं नाव जुहू एयरोड्रोम आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 15 जून : देशात कमर्शियल फ्लाइट्सची सुरुवात JRD टाटा यांनी केली होती. त्यांनी देशातील पहिले नागरिक उड्ड्यन विमानतळाची स्थापना केली होती. ज्याचं नाव जुहू एयरोड्रोम आहे. याची स्थापना 1998 मध्ये झाली होती. 1932 मध्ये जेआरडी टाटा येथे पहिली फ्लाइंट घेऊन उतरले होते. ही पहिली अनुसूचित कमर्शियल मेल सर्व्हिस होती. ते कराची येथून मुंबईला आले होते. दुसऱ्या महायुद्धात या विमानतळाने महत्त्वाची भूमिका बजावली होती. ब्रिटिश लष्कराच्या आशियातील हवाई कारवायांना येथून बरीच मदत मिळाली होती. विमानांची दुनिया या सिरीजमधून जाणून घेऊया सविस्तर…

News18लोकमत
News18लोकमत

हे विमानतळ अजुनही सुरु आहे. येथील 2 रनवे ऑपरेशनल आहेत. येथे नेते किंवा मंत्र्यांसह इतर व्हीआयपींची विमाने उतरवली जातात. यासोबतच येथून हेलिकॉप्टरही उड्डाण भरतात. येथे बॉम्बे फ्लाइंग क्लब पायटलला प्रशिक्षणही देते. हे विमानतळ दिल्लीच्या पालम विमानतळासारखेच काम करते.

मिलिट्री ऑपरेशनसाठी वापर

AAI (Airport Authority of India) कडून या विमानतळाला पुन्हा कमर्शियल विमानतळामध्ये रूपांतरित करण्यासाठी बरेच प्रयत्न करण्यात आले. परंतु हे अभियान यशस्वी होऊ शकले नाही. हे विमानतळ लष्करी कारवाईसाठी राखीव ठेवण्यात आलेय. मुंबईची CSMIA कमर्शियल आणि कार्गो उड्डाणे सांभाळते. यामुळेच CSMIA हे जगातील सर्वात व्यस्त विमानतळ आहे. या विमानतळाने काही वर्षांपूर्वी लंडनच्या गॅटविक एयरपोर्टला या प्रकरणात मागे टाकलं होतं.

Aeroplane knowledge: जगातील सर्वात महागडी फ्लाइट, हवेतील महाल आहे हे विमान; तिकीट पाहून येईल चक्कर

जास्त काळ होऊ शकलं नाही परिचालन

जुहू एरोड्रोमवर जास्त काळ कमर्शियल उड्डाणे चालू शकली नाहीत. 1937 आणि 1938 मध्ये येथे आणखी दोन रनवे टाकले गेले. परंतु काही मूलभूत समस्या कायमच राहिल्या. पावसाळ्याच्या दिवसात पाणी साठत असल्याने येथे विमाने लँड होत नव्हती.

Airplane Fact : रिटायर झाल्यानंतर विमान शेवटचे उड्डाण कुठे करते? कसे वेगळे केले जातात पार्ट?

 काँक्रीटचा रनवे करून हा प्रश्न सुटला होता. तरी प्रवाशांची वाढती संख्या पाहता एक डेडिकेटेड विमानतळाची गरज आहे असं अधिकाऱ्यांना वाटले. दरम्यान, महायुद्ध सुरू झाले आणि या विमानतळाचा लष्करी कारणांसाठी वापर करण्यात आला. त्याचवेळी सांताक्रूझ विमानतळावर व्यावसायिक विमानांचे लँडिंग सुरू झाले. सांताक्रूझ विमानतळ 1947-48 मध्ये औपचारिकपणे कमर्शियल विमानतळ बनले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात