Home /News /money /

Adani Wilmar IPO 1.05 पट सबस्क्राईब, तज्ज्ञांचं मत काय? वाचा सविस्तर

Adani Wilmar IPO 1.05 पट सबस्क्राईब, तज्ज्ञांचं मत काय? वाचा सविस्तर

अदानी विल्मरच्या IPO मध्ये (Adani Wilmar IPO) 1 रुपयांच्या फेस वॅल्यूवर 3600 कोटींचे नवीन इक्विटी शेअर्स जारी केले जातील. या इश्यूमध्ये ऑफर फॉर सेल (OFS) ठेवण्यात आलेली नाही.

    मुंबई, 28 जानेवारी : अदानी समूहाची (Adani Group) कंपनी अदानी विल्मरचा (Adani Wilmar IPO) आयपीओ दुसऱ्या दिवशी पूर्णपणे सबस्क्राइब झाला. इश्यूच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 28 जानेवारी रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत 1.05 वेळा सबस्क्राइब केले गेले. गुंतवणूकदारांनी 8.75 कोटी शेअर्ससाठी बोली लावली असून 5.03 कोटी शेअर ऑफर आहेत. 31 जानेवारीपर्यंत गुंतवणूकदार अदानी विल्मरच्या IPO मध्ये गुंतवणूक करू शकतात. 2022 चा हा दुसरा IPO आहे. IPO च्या माध्यमातून 3600 कोटी रुपये उभारण्याचा कंपनीचा मानस आहे. कंपनीने यासाठी 218-230 रुपये प्रति शेअर किंमत बँड निश्चित केला आहे. पहिल्या दिवशी म्हणजेच गुरुवारी गुंतवणूकदारांनी आयपीओबाबत फारसा उत्साह दाखवला नाही. पण, शुक्रवारी त्याकडे गुंतवणूकदारांचा चांगलाच कल दिसून आला. ब्रोकरेज हाऊसेस या आयपीओबाबत आधीच सकारात्मक आहेत. शेअर सबस्क्राईब करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. प्रत्येक वर्गातून चांगला प्रतिसाद IPO मध्ये क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल इनवेस्टर्ससाठी (Qualified Institutional Investors) 50 टक्के हिस्सा राखीव आहेत. हा भाग दुपारी 4 वाजेपर्यंत 32 पट भरला. नॉन इन्स्टिट्युशनल इनवेस्टर्ससाठी (Non Institutional Investors) 15 टक्के हिस्सा राखीव आहे आणि हा भाग सायंकाळपर्यंत 84 पट भरला गेला. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी (Retail Investors) 35 टक्के राखीव ठेवण्यात आले असून ते दुपारी 4 वाजेपर्यंत 1.74 वेळा भरले गेले. कर्मचाऱ्यांसाठी राखीव वाटा 14 पट आणि भागधारकांसाठी 82 पट आहे. एकूणच हा इश्यू 1.05 पट सबस्क्राईब झाला आहे. Budget 2022 आधी 'या' 10 शेअर्समध्ये गुंतवणुकीची ब्रोकरेज फर्मची शिफारस, चांगल्या कमाईची संधी फ्रेश इक्विटी शेअर्स जारी होणार अदानी विल्मरच्या IPO मध्ये 1 रुपयांच्या फेस वॅल्यूवर 3600 कोटींचे नवीन इक्विटी शेअर्स जारी केले जातील. या इश्यूमध्ये ऑफर फॉर सेल (OFS) ठेवण्यात आलेली नाही. यापूर्वी कंपनीने आयपीओचा आकार 4500 कोटी रुपये ठेवला होता, परंतु नंतर तो 3600 कोटी रुपये करण्यात आला. कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी 107 कोटी रुपयांचे शेअर्स ठेवण्यात आले आहेत. कंपनी बिडिंगमध्ये कर्मचाऱ्यांना प्रति शेअर 21 रुपये सूट देत आहे. Adani Wilmar IPO बाबत तज्ज्ञ बुलिश इकॉनॉमिक टाईम्सच्या अहवालानुसार, Swastika Investmart Ltd. चे सीनियर अॅनालिस्ट आयुष अग्रवाल यांनी कंपनीच्या IPO मध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. त्यांचे म्हणणे आहे की कंपनीची रेव्हेन्यू हिस्ट्री चांगली आहे. अदानी विल्मार हे FMCG क्षेत्रातील एक प्रस्थापित नाव आहे. खाद्यतेल आणि पॅकेज्ड फूडमध्ये ही कंपनी बाजारात आघाडीवर आहे. आयपीओचे मूल्यांकन चांगले दिसत आहे. त्यामुळे हे लॉन्ग टर्म आणि लिस्टिंग गेन दोन्ही दृष्टीने सबस्क्राईब केले जाऊ शकते. येत्या 1 फेब्रुवारीपासून काही नियम बदलणार, तुमच्या खर्चावर काय परिणाम होणार? चेक करा चॉईस ब्रोकिंग देखील IPO सबस्क्राईब करण्याची शिफारस करत आहेत. ब्रोकरेज फर्मचे म्हणणे आहे की खाद्यतेल आणि इतर खाद्यपदार्थांच्या बाबतीत कंपनीची बाजारपेठ मजबूत आहे. कंपनीचा कच्चा माल आणि उत्पादन क्षमता देखील मोठी आहे. त्यामुळे गुंतवणूकदार त्यात गुंतवणूक करू शकतात.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Investment, Money, Share market

    पुढील बातम्या