मराठी बातम्या /बातम्या /मनी /नोकरी बदलताना EPF Account बाबत 'हे' काम नक्की करा; नाहीतर आर्थिक नुकसान होईल

नोकरी बदलताना EPF Account बाबत 'हे' काम नक्की करा; नाहीतर आर्थिक नुकसान होईल

तुम्ही तुमची 2 किंवा अधिक पीएफ खाती UAN द्वारे सहजपणे विलीन करू शकता. यासाठी तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

तुम्ही तुमची 2 किंवा अधिक पीएफ खाती UAN द्वारे सहजपणे विलीन करू शकता. यासाठी तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

तुम्ही तुमची 2 किंवा अधिक पीएफ खाती UAN द्वारे सहजपणे विलीन करू शकता. यासाठी तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

मुंबई, 14 जून : खासगी नोकऱ्यांमध्ये (Private Job) आता कर्मचारी वेगाने आपली कंपनी बदलतात. पगारवाढ किंवा इतर अनेक कारणांनी लोक एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीत काम करतात. मात्र जेव्हा एक कंपनी सोडून दुसऱ्या कंपनीत कर्मचारी जातो तेव्हा तो अनेकदा त्याचे पीएफ खाते (PF Account) मर्ज करण्यास विसरतो. अशा स्थितीत त्यांना व्याजाचे मोठे नुकसान सहन करावे लागते.

जर जुनी कंपनी आणि नवीन कंपनी यांचे EFP खाते मर्ज न केल्यात खात्यात जमा केलेल्या कमी रकमेवरच व्याज मिळते. तर दोन्ही खाती एकत्र केल्यास जास्त व्याज मिळेल. पण काळजी करण्यासारखे काही नाही. तुम्ही तुमची 2 किंवा अधिक पीएफ खाती UAN द्वारे सहजपणे विलीन करू शकता. यासाठी तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

शेअर बाजारातील पडझडीतही राकेश झुनझुनवालांची मोठी कमाई, एकाच शेअरमधून कमावले 215 कोटी

दोन खाती एकत्र कशी करायची?

>> EPFO च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

>> Services टॅबवर जा आणि One Employee one EPF Account वर क्लिक करा.

>> यानंतर EPF खाते विलीन करण्यासाठी एक फॉर्म उघडेल.

>> येथे तुम्हाला नोंदणीकृत मोबाईल क्रमांक टाकावा लागेल.

>> त्यानंतर UAN आणि सध्याचा मेंबर आयडी एंटर करा.

>> यानंतर तुम्हाला ऑथेंटिकेशनसाठी एक ओटीपी मिळेल.

>> ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला जुने पीएफ खाते दिसेल

>> यानंतर जुने पीएफ खाते नोंदवा आणि डिक्लरेशन स्वीकारा.

>> तुमची विलीनीकरणाची विनंती स्वीकारली जाईल.

UAN अॅक्टिव्हेट करा

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही सर्व प्रक्रिया तेव्हाच शक्य होईल जेव्हा तुमचा UAN अॅक्टिव्ह होईल. तुमचा UAN अॅक्टिव्हेट नसेल तर आधी अॅक्टिव्हेट करा. यासाठी तुम्ही ईपीएफओच्या अधिकृत वेबसाइटवर जा. तेथे अॅक्टिव्हेट UAN टॅबवर क्लिक करा. तुमची UAN, जन्मतारीख आणि मोबाईल नंबर टाका. यानंतर तुम्हाला ऑथोरायझेशन पिन मिळेल, जो एंटर केल्यानंतर तुमचा UAN सक्रिय होईल.

देशातील महागाई आणखी वाढणार नाही, SBI च्या रिपोर्टमध्ये दावा; रेपो दर आणखी वाढण्याची शक्यता

UAN माहित नसल्यास काय कराल?

तुम्हाला तुमचा UAN कोणत्याही कारणास्तव माहीत नसेल, तर तो सहज शोधला जाऊ शकतो. तुमची सॅलरी स्लीप हा सर्वात सोपा मार्ग आहे. तुमच्या पगाराच्या स्लीपवर UAN छापलेले असते. याशिवाय, तुम्ही UAN पोर्टलवर जाऊन ते मिळवू शकता. यासाठी तुम्हाला तेथे काही प्राथमिक माहिती द्यावी लागेल. तुमचा UAN सुद्धा तुमच्या आधार कार्डशी जोडला गेला पाहिजे, तरच तुम्ही या सुविधेचा लाभ घेऊ शकाल.

First published:

Tags: Epfo news, Money, PF Amount